World Cup 2023 : वॉर्मअप सामन्याचे वेळापत्रक जारी, भारताचा सामना कधी ?
World Cup 2023 Warm-up Matches Schedule : आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषद अर्थात आयसीसीने विश्वचषकाआधी होणाऱ्या वॉर्मअप सामन्याचे वेळापत्रक जारी केले आहे.
World Cup 2023 Warm-up Matches Schedule : आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषद अर्थात आयसीसीने विश्वचषकाआधी होणाऱ्या वॉर्मअप सामन्याचे वेळापत्रक जारी केले आहे. 29 सप्टेंबरपासून वॉर्मअप सामन्याला सुरुवात होणार आहे. बांगलादेश आणि श्रीलंका यांच्यात गुवाहाटी येथे पहिला वॉर्मअप मॅच होणार आहे. भारतीय संघाचा पहिला वॉर्म अप सामना 30 सप्टेंबर रोजी होणार आहे. भारत आणि न्यूझीलंड यांच्यामध्ये हा सामना रंगणार आहे. भारताचा दुसरा वॉर्मअप सामना नेदरलँडविरोधात 3 ऑक्टोबर रोजी होणार आहे.
पहिल्या दिवशी 29 सप्टेंबर रोजी तीन वॉर्म अप सामने होणार आहेत. त्यामध्ये श्रीलंका-बांगलादेश यांच्याशिवाय दक्षिण आफ्रिका आणि आफगाणिस्तान आणि न्यूझीलंड-पाकिस्तान या सामन्यांचा समावेश आहे. दक्षिण आफ्रिका आणि आफगाणिस्तान यांच्यातील सामना तिरूवनंतपुरम येथे होणार आहे. तर पाकिस्तान आणि न्यूझीलंड यांच्यातील सामना हैदराबाद येथे होणार आहे. न्यूझीलंड आपला पहिला वॉर्मअप सामना गुवाहटी येथे खेळेल. अखेरचा सराव सामना पाकिस्तान आणि ऑस्ट्रेलिया यांच्यादरम्यान तीन ऑक्टोबर रोजी हैदराबाद येथे होणार आहे.
असे आहे संपूर्ण शड्युल -
बांगलादेश विरुद्ध श्रीलंका- बारसापारा क्रिकेट स्टेडियम, गुवाहाटी (29 सप्टेंबर)
दक्षिण आफ्रिका विरुद्ध अफगानिस्तान- ग्रीनफील्ड इंटरनेशनल स्टेडियम, तिरुवनंतपुरम (29 सप्टेंबर)
न्यूझीलंड विरुद्ध पाकिस्तान- राजीव गांधी अंतर्राष्ट्रीय स्टेडियम, हैदराबाद (29 सप्टेंबर)
भारत विरुद्ध इंग्लंड- बारसापारा क्रिकेट स्टेडियम, गुवाहाटी (30 सप्टेंबर)
ऑस्ट्रेलिया विरुद्ध नेदरलँड- ग्रीनफील्ड इंटरनेशनल स्टेडियम, तिरुवनंतपुरम (30 सप्टेंबर)
इंग्लंड विरुद्ध बांगलादेश- बारसापारा क्रिकेट स्टेडियम, गुवाहाटी (2 अक्टूबर)
न्यूझीलंड विरुद्ध दक्षिण आफ्रिका- ग्रीनफील्ड इंटरनेशनल स्टेडियम, तिरुवनंतपुरम (2 अक्टूबर)
अफगानिस्तान विरुद्ध श्रीलंका- बारसापारा क्रिकेट स्टेडियम, गुवाहाटी (3 अक्टूबर)
भारत विरुद्ध नेदरलँड- ग्रीनफील्ड इंटरनेशनल स्टेडियम, तिरुवनंतपुरम (3 अक्टूबर)
पाकिस्तान विरुद्ध ऑस्ट्रेलिया- राजीव गांधी अंतर्राष्ट्रीय स्टेडियम, हैदराबाद (3 अक्टूबर).
5 ऑक्टोबरपासून विश्वचषकाचा शुभारंभ -
भारतात होणारा विश्वचषकाचा पहिला सामना 5 ऑक्टोबर रोजी होणार आहे. गतविजेता इंग्लंड आणि उपविजेता न्यूझीलंड यांच्यात सलामीची लढत होणार आहे. 19 नोव्हेंबर रोजी महाअंतिम सामना रंगणार आहे. विश्वचषकाचा पहिला आणि अखेरचा सामना अहमदाबाद येथील नरेंद्र मोदी स्टेडिअमवर रंगणार आहे. भारत आणि पाकिस्तान हा हायहोल्टेज सामनाही अहमदाबाद येथेच होणार आहे. यंदाचा विश्वचषक दहा संघामध्ये राऊंड रॉबिन पद्धतीने होणार आहे. प्रत्येक संघाचे कमीतकमी नऊ सामने होणार आहेत.
The schedule of World Cup 2023 Warm-up matches: pic.twitter.com/ixedWiIWU3
— CricketMAN2 (@ImTanujSingh) August 23, 2023