एक्स्प्लोर

IND Vs SL Live Score : वानखेडेवर भारत आणि श्रीलंका यांच्यात लढत, लाईव्ह अपडेट एका क्लिकवर

भारत आणि श्रीलंका यांच्यामध्ये आज वानखेडेच्या मैदानावर आमनासामना होणार आहे. 2011 च्या विश्वचषकाची फायनल या दोन्ही संघामध्ये याच मैदानावर झाली होती.

LIVE

Key Events
IND Vs SL Live Score : वानखेडेवर भारत आणि श्रीलंका यांच्यात लढत, लाईव्ह अपडेट एका क्लिकवर

Background

ODI World Cup 2023, IND Vs SL : भारत आणि श्रीलंका यांच्यामध्ये आज वानखेडेच्या मैदानावर आमनासामना होणार आहे. 2011 च्या विश्वचषकाची फायनल या दोन्ही संघामध्ये याच मैदानावर झाली होती. आता पुन्हा एकदा हे दोन्ही संघ वानखेडेच्या मैदानात भिडणार आहेत. लागोपाठ सहा सामन्यात विजय मिळवत टीम इंडियाने सेमीफायनलचे तिकिट जवळपास निश्चित केलेय. गुणतालिकेत टीम इंडिया दुसऱ्या स्थानावर आहे. दुसरीकडे श्रीलंका संघाने पाचपैकी तीन सामने गमावले आहेत. त्यांना फक्त दोन सामन्यात विजय मिळवता आलाय. श्रीलंकेला सेमीफायनलमध्ये प्रवेश करण्यासाठी पुढील प्रत्येक सामन्यात विजय मिळवायचाच आहे. यंदाच्या विश्वचषकात अजय असणारा टीम इंडिया एकमेव संघ आहे. भारत आणि श्रीलंका यांच्यातील सामना रंजक होणार आहे. हेड टू हेड, पिच रिपोर्ट, वेदर अपडेट अन् बरेच काही जाणून घेऊयात....

वानखेडेवरचा रेकॉर्ड काय ?

मुंबईतील वानखेडे स्टेडिअमवर भारत आणि श्रीलंका यांच्यातील सामना होणार आहे. वानखेडे स्टेडिअमवर विश्वचषकातील दोन सामने झाले आहेत. दक्षिण आफ्रिकाने प्रथम फलंदाजी कताना 380 पेक्षा जास्त धावा केल्या होत्या. आयपीएलमध्येही या मैदानावर चौकार-षटकारांचा पाऊस पडत असल्याचे आकडेवारी सांगते. वानखेडेचे मैदान हायस्कोरिंग आहे. त्यामुळे पहिल्यांदा फलंदाजी करुन मोठी धावसंख्या उभारण्याचा मानस प्रत्येक संघाचा असतो. 

IND vs SL, World Cup 2023: Pitch report 

IND vs SL, World Cup 2023: Weather update 

मुंबईमध्ये आज पावसाची शक्यता थोडीही नाही. हवामान एकदम क्लिअर असेल. त्यामुळे सामन्यात पावसाचा कोणताही व्यत्यय येणार आहे. तापमान 29 डिग्रीच्या आसपास असेल.

India vs Sri Lanka Head to Head in ODI World Cup

विश्वचषकाच्या मैदानात भारत आणि श्रीलंका संघामध्ये नऊ वेळा आमनासामना झालाय. दोन्ही संघाने प्रत्येकी चार चार सामन्यात विजयस मिळवला आहे. एक सामना रद्द झाला होता.

हेड टू हेड आकडे काय सांगतात ?

भारत आणि श्रीलंका संघामध्ये आतापर्यंत 167 वनडे सामने झाले आहेत. यामध्ये टीम इंडियाने 98 सामन्यात विजय मिळवलाय. तर श्रीलंकेच्या संघाने 57 सामन्यात बाजी मारली आहे. दोन्ही संघातील 11 सामन्यात कोणताही निकाल लागला नाही. तर एक सामना बरोबरीत सुटला.  

मागील पाच सामन्यातील काय निकाल लागला ?
भारत आणि श्रीलंका यांच्यातील मागील पाच सामन्याचा निकाल एकतर्फी लागलाय. पाचही सामन्यात टीम इंडियाने विजय मिळवला आहे. आशिया चषकातही भारताने श्रीलंकेचा दारुण पराभव केला होता. 

लाईव्ह कुठे पाहाल ?
भारत आणि श्रीलंका यांच्यातील सामना  टिव्हीवर  स्टार स्पोर्ट्स चॅनलवर सामना पाहता येईल.  स्टार स्पोर्ट्स 1, स्टार स्पोर्ट्स एचडी, स्टार स्पोर्ट्स हिंदी सह इतर भाषांमध्येही सामन्याचा आनंद घेता येईल. मोबईलवर डिज्नी प्लस हॉटस्टार अॅपवर हा सामना मोफत पाहता येईल. त्यासाठी कोणतेही सब्सक्रिप्शन चार्ज लागणार नाही. फ्रीमध्ये या सामन्याचा आनंद घेता येईल. त्याशिवाय एबीपी माझाच्या संकेतस्थळावर सामन्यासंदर्भात सर्व माहिती वाचता येईल.

भारतीय संघाची संभाव्य प्लेईंग 11 - 

रोहित शर्मा (कर्णधार), शुभमन गिल, विराट कोहली, ईशान किशन, केएल राहुल (विकेटकीपर), सूर्यकुमार यादव, रविंद्र जाडेजा, कुलदीप यादव, मोहम्मद शमी, जसप्रीत बुमराह आणि मोहम्मद सिराज

श्रीलंका संघाची संभाव्य प्लेईंग 11 -

दिमुथ करुणारत्ने, पथुम निसांका, कुसल मेंडिस (कर्णधार), सदीरा समरविक्रमा, चरिथ असलांका, एंजेलो मॅथ्यूज, धनंजय डी सिल्वा, महीश तिक्षाना, दिलशान मदुशंका, कसून राजिथा आणि दुष्मंता चमीरा

20:36 PM (IST)  •  02 Nov 2023

भारताचा लंकेवर विजय

भारताचा लंकेवर विजय.. सेमीफायनलमध्ये प्रवेश

20:26 PM (IST)  •  02 Nov 2023

मोहम्मद शामीचा पंजा, लंकेला नववा धक्का

मोहम्मद शामीचा पंजा, लंकेला नववा धक्का

20:04 PM (IST)  •  02 Nov 2023

लंकेला आठवा धक्का

लंकेला आठवा धक्का.. शामीने घेतली चौथी विकेट

19:57 PM (IST)  •  02 Nov 2023

लंकेला सातवा धक्का

मोहम्मद शामीने लंकेला दिला सातवा धक्का

19:37 PM (IST)  •  02 Nov 2023

श्रीलंकेला सहावा धक्का

श्रीलंकेला सहावा धक्का... शामीच्या लागोपाठ दोन विकेट्स

Load More
New Update
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Walmik Karad Property: कोटींच्या कोटी खंडणी, संपत्ती मापता येईना, वाल्मिक कराडच्या बार्शीतील शेती सांभाळणाऱ्यांना तीन महिन्यांपासून दीडदमडी सुद्धा नाही; कामगारांनी सांगितली आपबिती
कोटींच्या कोटी खंडणी, संपत्ती मापता येईना, वाल्मिक कराडच्या बार्शीतील शेती सांभाळणाऱ्यांना तीन महिन्यांपासून दीडदमडी सुद्धा नाही; कामगारांनी सांगितली आपबिती
मोठी बातमी! वाल्मिक कराडच्या जामीन अर्जावरील सुनावणी लांबणीवर, 20 तारखेला होणार पुढची सुनावणी 
मोठी बातमी! वाल्मिक कराडच्या जामीन अर्जावरील सुनावणी लांबणीवर, 20 तारखेला होणार पुढची सुनावणी 
Nashik Crime : खोट्या गुन्ह्यात फसवणं भोवलं, नाशिकमधील माजी नगरसेवक शिवाजी चुंबळेंच्या मुलावर ॲट्रॉसिटी दाखल, नेमकं प्रकरण काय?
खोट्या गुन्ह्यात फसवणं भोवलं, नाशिकमधील माजी नगरसेवक शिवाजी चुंबळेंच्या मुलावर ॲट्रॉसिटी दाखल, नेमकं प्रकरण काय?
Rohit Sharma : बीसीसीआयनं बायका पोरांसाठी नियम आणला, सोबत नेल्यास खिशातून पैसा मोजावा लागणार! कॅप्टन रोहित म्हणाला, 'अरे यार सगळ्यांचा फोन येतोय, त्यामुळे आता....'
बीसीसीआयनं बायका पोरांसाठी नियम आणला, सोबत नेल्यास खिशातून पैसा मोजावा लागणार! कॅप्टन रोहित म्हणाला, 'अरे यार सगळ्यांचा फोन येतोय, त्यामुळे आता....'
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

ABP Majha Marathi News Headlines 05 PM TOP Headlines 05 PM 18 January 2024Saif Ali Khan Case Update : सैफ अली खान हल्ला प्रकरणात एक संशयित मध्य प्रदेशातून ताब्यातSantosh Deshmukh Accse Update : संतोष देशमुख हत्याप्रकरणातील ६ आरोपींना १४ दिवसांची न्यायालयीन कोठडीABP Majha Marathi News Headlines 04 PM TOP Headlines 04 PM 18 January  2024

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Walmik Karad Property: कोटींच्या कोटी खंडणी, संपत्ती मापता येईना, वाल्मिक कराडच्या बार्शीतील शेती सांभाळणाऱ्यांना तीन महिन्यांपासून दीडदमडी सुद्धा नाही; कामगारांनी सांगितली आपबिती
कोटींच्या कोटी खंडणी, संपत्ती मापता येईना, वाल्मिक कराडच्या बार्शीतील शेती सांभाळणाऱ्यांना तीन महिन्यांपासून दीडदमडी सुद्धा नाही; कामगारांनी सांगितली आपबिती
मोठी बातमी! वाल्मिक कराडच्या जामीन अर्जावरील सुनावणी लांबणीवर, 20 तारखेला होणार पुढची सुनावणी 
मोठी बातमी! वाल्मिक कराडच्या जामीन अर्जावरील सुनावणी लांबणीवर, 20 तारखेला होणार पुढची सुनावणी 
Nashik Crime : खोट्या गुन्ह्यात फसवणं भोवलं, नाशिकमधील माजी नगरसेवक शिवाजी चुंबळेंच्या मुलावर ॲट्रॉसिटी दाखल, नेमकं प्रकरण काय?
खोट्या गुन्ह्यात फसवणं भोवलं, नाशिकमधील माजी नगरसेवक शिवाजी चुंबळेंच्या मुलावर ॲट्रॉसिटी दाखल, नेमकं प्रकरण काय?
Rohit Sharma : बीसीसीआयनं बायका पोरांसाठी नियम आणला, सोबत नेल्यास खिशातून पैसा मोजावा लागणार! कॅप्टन रोहित म्हणाला, 'अरे यार सगळ्यांचा फोन येतोय, त्यामुळे आता....'
बीसीसीआयनं बायका पोरांसाठी नियम आणला, सोबत नेल्यास खिशातून पैसा मोजावा लागणार! कॅप्टन रोहित म्हणाला, 'अरे यार सगळ्यांचा फोन येतोय, त्यामुळे आता....'
Beed News : बीडमध्ये महिला सरपंचाकडे खंडणीची मागणी, महिलेचा गंभीर इशारा; म्हणाल्या, आम्हाला न्याय द्या,नाहीतर...
बीडमध्ये महिला सरपंचाकडे खंडणीची मागणी, महिलेचा गंभीर इशारा; म्हणाल्या, आम्हाला न्याय द्या,नाहीतर...
Team India Announced for Champion Trophy 2025 : शुभमान गिल उपकॅप्टन, विकेटकीपिंगसाठी के एल राहुलला प्राधान्य, चॅम्पियन्स ट्रॉफीच्या टीमची 5 वैशिष्ट्ये!
शुभमान गिल उपकॅप्टन, विकेटकीपिंगसाठी के एल राहुलला प्राधान्य, चॅम्पियन्स ट्रॉफीच्या टीमची 5 वैशिष्ट्ये!
India Squad For Champions Trophy Live : तब्बल 14 महिन्यांनी टीम इंडियाच्या तोफेची वापसी, बुम बुम बुमराह सुद्धा फिट; चॅम्पियन्स ट्रॉफीसाठी कोणाकोणाला मिळाली संधी?
तब्बल 14 महिन्यांनी टीम इंडियाच्या तोफेची वापसी, बुम बुम बुमराह सुद्धा फिट; चॅम्पियन्स ट्रॉफीसाठी कोणाकोणाला मिळाली संधी?
Israeli attacks on Gaza : 50 हजार निष्पाप जीव गेल्यानंतर तब्बल 469 दिवसांनी इस्रायलची शस्त्रसंधीला मान्यता; पहिल्या टप्प्यात हमास 33 ओलिसांची सुटका करणार
50 हजार निष्पाप जीव गेल्यानंतर तब्बल 469 दिवसांनी इस्रायलची शस्त्रसंधीला मान्यता; पहिल्या टप्प्यात हमास 33 ओलिसांची सुटका करणार
Embed widget