Rohit Sharma Most Sixes Record : रोहितचा झंझावात, आता युनिवर्स बॉसचा षटकारांचा विक्रम केला ध्वस्त
Rohit Sharma Most Sixes Record : भारताचा कर्णधार रोहित शर्माने न्यूझीलंडविरोधात झंझावत सुरुवात केली. ट्रेंट बोल्ट आणि साऊदी या आघाडीच्या गोलंदाजांची लाईन लेंथ बिघडवत भारताची धावसंख्या वेगाने वाढवली.
Rohit Sharma Most Sixes Record : भारताचा कर्णधार रोहित शर्माने न्यूझीलंडविरोधात झंझावत सुरुवात केली. ट्रेंट बोल्ट आणि साऊदी या आघाडीच्या गोलंदाजांची लाईन लेंथ बिघडवत भारताची धावसंख्या वेगाने वाढवली. रोहित शर्माने वानखेडे मैदानावर चौकार आणि षटकारांचा पाऊस पाडला. रोहित शर्माने विश्वचषकात 50 षटकार लगावण्याचा विक्रम केला आहे. विश्वचषकात आतापर्यंत एकाही फलंदाजाला 50 षटकार मारता आलेले नाहीत. ख्रिस गेल याने याआधी विश्वचषकात 49 षटकार लगावले होते. रोहितच्या वादळात युनिवर्स बॉस ख्रिस गेलचा विक्रम ध्वस्त झाला. आता विश्वचषकात सर्वाधिक षटकार मारण्याचा विक्रम रोहितच्या नावावर जमा झालाय.
त्याशिवाय एकाच विश्वचषकात सर्वाधिक षटकार मारण्याचा विक्रमही रोहित शर्माने केला आहे. रोहित शर्माने आपल्या छोटेखानी खेळीत अनेक विक्रम ध्वस्त केले आहे. विश्वचषकाच्या इतिहासात 50 षटकार मारणारा रोहित शर्मा पहिला खेळाडू ठरलाय. त्याशिवाय एका विश्वचषक हंगामात सर्वाधिक षटकाराची नोंदही रोहितच्या नावावर झाली आहे. याआधी हा विक्रम वेस्ट इंडिजच्या ख्रिस गेलच्या नावावर होता. गेलने 2015 च्या विश्वचषकात 26 षटकार लगावले होते. रोहित शर्माने आज हा विक्रम मोडला आहे. रोहितने पहिल्या चेंडूपासूनच आक्रमक रुप धारण केले होते.
Rohit Sharma records today:
— Johns. (@CricCrazyJohns) November 15, 2023
- Most sixes in a single edition of World Cup.
- Most sixes in World Cup history. pic.twitter.com/hd9laOqjxn
रोहित शर्माचा हा तिसरा विश्वचषक आहे. 2015 मध्ये रोहित शर्माने विश्वचषकात पदार्पण केले होते. त्यानंतर 2019 विश्वचषकात सर्वाधिक धावा काढणारा फलंदाज ठरला होता. आता 2023 मध्ये रोहितच्या बॅटमधून धावांचा पाऊस पडतो. रोहितने सेमीफायनलच्या सामन्यात बोल्ट, साऊदी आणि मिचेल सँटनर यासारख्या गोलंदाजांचा समाचार घेतला. रोहितसमोर हे तिन्ही गोलंदाज फिके दिसत होते. रोहित शर्माने वादळी फलंदाजी करता भारताची धावसंख्या वेगाने वाढवली.
ROHIT SHARMA BECOMES THE FIRST PLAYER TO HIT 50 SIXES IN WORLD CUP HISTORY. pic.twitter.com/rxpJYuoVx1
— Johns. (@CricCrazyJohns) November 15, 2023
नाणेफेक जिंकून रोहित शर्माने प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. पहिल्याच षटकात ट्रेंट बोल्ट याला दोन खणखणीत चौकार लगावत रोहितने आपले इरादे स्पष्ट केले होते. त्यानंतर साऊदीचाही त्याने समाचार घेतला. रोहित शर्माच्या वादळी फलंदाजीमुळे भारताच्या सात षटकात 61 धावा झाल्या होत्या. बोल्टला 4 षटकात 29 धावा निघाल्या. तर साऊदीला दोन षटकात 21 धावा लुटल्या. सँटनरच्या एका षटकात 11 धावा वसूल केल्या. रोहित शर्माने बोल्टला दोन षटकार लगावले तर सँटनर आणि साऊदीला एक एक षटकार मारला.
रोहित शर्माच्या वादळी खेळीमुळे भारताने 7 षटकात बिनबाद 61 धावा केल्या आहेत. यामध्ये रोहितचा वाटा 47 धावांचा आहे. रोहितने 28 चेंडूत चार चौकार आणि चार षटकारांच्या मदतीने 47 धावा केल्या आहे. शुभमन गिल 11 धावांवर खेळत आहे.