World Cup 2023 : राहुल-सूर्याला संधी, विश्वचषकाच्या 15 शिलेदारांची घोषणा, पाहा टीम इंडिया
World Cup Squad 2023 : विश्वचषकासाठीच्या 15 शिलेदांराची घोषणा आज करण्यात आली.
![World Cup 2023 : राहुल-सूर्याला संधी, विश्वचषकाच्या 15 शिलेदारांची घोषणा, पाहा टीम इंडिया ODI World Cup 2023 India Squad Announced BCCI Rohit Sharma KL Rahul Hardik Pandya Check Full Players List World Cup 2023 : राहुल-सूर्याला संधी, विश्वचषकाच्या 15 शिलेदारांची घोषणा, पाहा टीम इंडिया](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2023/09/05/0907f67689e67193f27b3ba47da791721693901343745732_original.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=1200&height=675)
Team India ODI World Cup Squad 2023 : विश्वचषकासाठीच्या 15 शिलेदांराची घोषणा आज करण्यात आली. निवड समितीचे अध्यक्ष अजित आगरकर आणि रोहित शर्मा यांनी पत्रकार परिषद घेत भारतीय शिलेदारांची नावे जाहीर केली. आपेक्षाप्रमाणे 15 खेलाडूंची निवड करण्यात आली आहे. युजवेंद्र चहल आणि आर. अश्विन यांना अंतिम 15 खेळाडूमध्ये स्थान मिळाले नाही. सूर्यकुमार यादव याला संधी देण्यात आली आहे. दुसरीकडे भारतीय संघ फक्त एकच प्रमुख फिरकी गोलंदाजासह विश्वचषकात उतरणार आहे. कुलदीप यादव याच्या खांद्यावर फिरकीची जबाबदारी असेल. तर इशान किशन आणि केएल राहुल विकिकेटकिपर म्हणून भूमिका बजावतील.
5 ऑक्टोबर रोजी विश्वचषकाचा पहिला सामना रंगणार आहे. 19 नोव्हेंबर रोजी अखेरचा सामना रंगणार आहे. भारतीय संघ आपल्या विश्वचषकाच्या अभियानाला आठ ऑक्टोबर रोजी ऑस्ट्रेलियाविरोधातील सामन्याने होणार आहे. हा सामना चेन्नई येथे रंगणार आहे.
India ODI World Cup Squad Live: भारतीय संघाचे कॉम्बिनेशन
विश्वचषकासाठी भारतीय संघाचे कॉम्बिनेशन चांगले दिसत आहे. संघामध्ये पाच फलंदाज आहेत. दोन विकेटकिपर आहेत. 4 अष्टपैलू खेळाडू आणि चार गोलंदाजासह भारतीय संघ विश्वचषकात उतरणार आहे.
विश्वचषकासाठी भारताचे 15 शिलेदार
रोहित शर्मा (कर्णधार), शुभमन गिल, विराट कोहली, श्रेयस अय्यर, इशान किशन (विकेटकीपर), केएल राहुल(विकेटकीपर), हार्दिक पांड्या (उपकर्णधार), सूर्यकुमार यादव, रविंद्र जाडेजा, अक्षर पटेल, शार्दूल ठाकूर, जसप्रीत बुमराह, मोहम्मद शामी, मोहम्मद सिराज आणि कुलदीप यादव
संजू-तिलक यांचा पत्त कट
विश्वचषकाच्या अंतिम 15 खेळाडूमध्ये संजू सॅमसन आणि तिलक वर्मा यांना संधी मिळाली नाही. त्याशिवाय प्रसिद्ध कृष्णा यालाही स्थान मिळवण्यात यश आले नाही. भारताच्या 15 जणांच्या चमूमध्ये एकही ऑफ स्पिनर गोलंदाजाला स्थान दिले नाही. युजवेंद्र चहल आणि आर. अश्विन यांनाही अंतिम 15 खेळाडूमध्ये संधी देण्यात आली नाही.
India ODI World Cup Squad Live: केएल राहुल पूर्णपणे तंदुरुस्त
विकेटकीपर फलंदाज केएल राहुल याची विश्वचषकासाठी निवड झाली आहे. निवड समितीचे अध्यक्ष अजित आगरकर यांनी केएल राहुल याच्या फिटनेसबाबतही अपडेट दिली. केएल राहुल याने एनसीएमध्ये फिटनेसवर काम केलेय. त्याने फिटनेस टेस्ट पास केली आहे. तो खेळण्यासाठी पूर्णपणे तंदुरुस्त आहे, असे अजित आगरकर यांनी पत्रकार परिषदेत सांगितले.
विश्वचषकातील भारताचे वेळापत्रक -
8 ऑक्टोबर ऑस्ट्रेलिया - चेन्नई
11 ऑक्टोबर दिल्ली - अफगाणिस्थान
14 ऑक्टोबर अहमदाबाद - पाकिस्तान
19 ऑक्टोबर - पुणे - बांगलादेश
22 ऑक्टोबर - धर्मशाला - न्यूझीलंड
29 ऑक्टोबर - लखनौ - इंग्लंड
2 नोव्हेंबर - मुंबई - श्रीलंका
5 नोव्हेंबर कोलकाता - दक्षिण आफ्रिका
12 नोव्हेंबर बेंगलोर - नेंदरलँड
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)