Rahul Dravid : भारतीय क्रिकेटच्या इतिहासात सर्वाधिक संयमी खेळाडू म्हणून राहुल द्रविडचा (Rahul Dravid) उल्लेख केला जातो. 'द वॉल' म्हणून प्रसिद्ध असलेल्या राहुल द्रविडच्या संयमापुढे जगातले भले-भले बॉलर्स अक्षरशा रडकुंडीला यायचे. त्याने कधीही मैदानात आपला संयम गमावला नसल्याचं अनेकजण सांगतात. पण द्रविडच्या आयुष्यात एक क्षण असा आला होता की त्याने आपला संयम गमावला आणि डोक्यावरची टोपी जमिनीवर आदळली. हा टोपी आदळल्याचा क्षण आपल्या आयुष्यातील काही अभिमानाचा क्षण नसल्याचं राहुल द्रविडने नंतरच्या काळात स्पष्ट केलं. 


ही घटना 2014 सालच्या आयपीएलच्या सामन्यादरम्यान घडली. त्यावेळी राहुल द्रविड हा राजस्थान संघाचा मार्गदर्शक म्हणून काम करत होता. मुंबईच्या वानखेडे मैदानावर मुंबई आणि राजस्थान दरम्यान सामना सुरु होता. राजस्थानला तसं काही सामना जिंकण्याची गरज नव्हती. पण तो सामना 14.3 ओव्हरच्या आत मुंबईला जिंकून द्यायचा नव्हतं. तसं न झाल्यास मुंबई स्पर्धेतून बाहेर जाणार होती आणि राजस्थान उपांत्य फेरीत जाऊ शकणार होतं. 


राजस्थानच्या 190 धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना मुंबईने अक्षरश: धावांचा पाऊस पाडला. मुंबईच्या 14 ओव्हरमध्ये तिसऱ्या चेंडूमध्ये 189 धावा झाल्या. सर्वांना वाटलं की आता मुंबई बाहेर जाणार. पण तोच एक अपडेट आली की मुंबईने जर पुढच्या चेंडूवर सिक्सर मारला तर त्यांचा स्कोर 195 होईल आणि सरासरीच्या जोरावर ते राजस्थानवर मात करुन उपात्य फेरीत प्रवेश करु शकतील. 


राहुल द्रविडचा संयम सुटला
मुंबईने 14 व्या ओव्हरचा चौथा चेंडू थेट सिक्सर मारला आणि राजस्थानच्या उपांत्य फेरीत जायच्या आशा संपल्या. त्यावेळी डॉगआऊटमध्ये बसलेल्या राहुल द्रविडचा संयम सुटला. तो जागेवरुन उठला आणि डोक्यावरची टोपी खाली जमिनीवर आदळली. 


 






राहुल द्रविडसाठी तसेच त्याच्या तमाम चाहत्यांसाठी, भारतातील प्रत्येक क्रिडा रसिकासाठी हा क्षण धक्कादायक असाच होता. कारण आतापर्यंतच्या इतिहासात राहुल द्रविडने मैदानात कधीही आपला संयम सुटू दिला नव्हता. पण हे घडलं होतं.


तो क्षण आपल्या आयुष्यातील काही अभिमानाचा श्रण नव्हता असं नंतर राहुल द्रविडने 'क्रेड' साठी दिलेल्या एका मुलाखतीत सांगितलं. 


राहुल द्रविड भारतीय प्रशिक्षक होण्याचा मार्ग सुकर
भारतीय संघाच्या पुढच्या प्रशिक्षक पदासाठी टीम इंडियाचा माजी कर्णधार राहुल द्रविडचं नाव चर्चेत आहे. द्रविड टीम इंडियाचा कोच होण्यासाठी तयार असल्याची माहिती आहे.  भारतीय क्रिकेट टीमच्या प्रशिक्षकपद आता राहुल द्रविडकडे (Rahul Dravid) येणार असल्याची शक्यता आहे.. राहुल द्रविड टीम इंडियाचा कोच होण्यास तयार असल्याची माहिती मिळाली आहे. त्याला 2023 पर्यंतचं कॉन्ट्रॅक्ट मिळू शकतं. मात्र अद्याप याबाबत कुठलीही अधिकृत घोषणा झालेली नाही.  


संबंधित बातम्या :