New Zealand tour of West Indies 2022: तीन सामन्यांची एकदिवसीय मालिका खेळण्यासाठी न्यूझीलंडचा संघ वेस्ट इंडीज (New Zealand tour of West Indies 2022) दौऱ्यावर गेलाय. या मालिकेतील पहिला सामना काल बार्बाडोसच्या (Barbados) केन्सिंग्टन ओव्हल (Kensington Oval) मैदानावर खेळला गेला. या सामन्यात वेस्ट इंडीजच्या संघानं न्यूझीलंडचा पाच विकेट्सनं विजय मिळवून मालिकेत 1-0 अशी आघाडी घेतली. वेस्ट इंडीजच्या विजयात अकील होसेनचा (Akeal Hosein) मोलाचा वाटा आहे. या सामन्यात त्यानं 28 धावा देऊन तीन विकेट्स घेतले.वेस्ट इंडीजच्या भेदक गोलंदाजीसमोर 50 षटक खेळण्याआधीच न्यूझीलंडचा संघ 190 धावांवर ढेपाळला. यादरम्यान, न्यूझीलंडच्या डव्हॉन कॉन्वेचा विकेट्स घेतल्यानंतर अकील होसेननं मैदानात एक आगळं वेगळं सेलिब्रेशन केलं, ज्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झालाय. 


अकील होसेनचं सेलिब्रेशन
डी कॉन्वेला माघारी धाडल्यानंतर अकील होसेननं एका वृद्ध व्यक्तीची नकल केली. त्यावेळी त्यानं कंबऱ्यावर हात ठेवून खोकण्याची नकल करत विकेट घेतल्याचा आनंद साजरा केला. वेस्ट क्रिकेटनं त्यांच्या अधिकृत इन्स्टाग्राम अकाऊंटवरून अकील होसेनच्या या सेलिब्रेशनचा व्हिडिओ शेअर केलाय. तसेच या व्हिडिओ ग्रॅंडपा इज बॅक, असंही कॅपशन दिलं.


 वेस्ट इंडीज क्रिकेटची इन्स्टाग्राम पोस्ट-






 


वेस्ट इंडीजचा एकतर्फी विजय
या सामन्यात नाणेफेक जिंकून वेस्ट इंडीजच्या संघानं प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. त्यानंतर फलंदाजी करण्यासाठी मैदानात आलेल्या वेस्ट इंडीजचा संघानं डगमगत 45.2 षटकात 190 धावा केल्या. न्यूझीलंडच्या संघानं दिलेल्या लक्ष्याचा पाठलाग करण्यासाठी मैदानात उतरलेल्या वेस्ट इंडीजच्या संघानं 39 व्या षटकातच पाच विकेट्सनं सामना जिंकला. या सामन्यात 79 धावांची खेळी करणाऱ्या शाहमारह ब्रुक्सला सामनावीर म्हणून गौरवण्यात आलं.


भारताविरुद्ध टी-20 मालिकेत लाजीरवाणा पराभव
न्यूझीलंडविरुद्ध एकदिवसीय मालिकेपूर्वी वेस्ट इंडीजच्या संघानं भारताच्या टी-20 मालिकेचं यजमानपद भूषवलं होतं. पाच सामन्यांच्या टी-20 मालिकेत वेस्ट इंडीजच्या संघाला भारताकडून 4-1 असा पराभव स्वीकारावा लागला होता. 


हे देखील वाचा-


Virat Kohli: विराट कोहलीला झालंय तरी काय? म्हणतोय 'लोकांनी भरलेल्या खोलीतही वाटतंय एकटं!'


IND vs ZIM, 1st ODI: दीपक चहरचं भारतीय संघात पुनरागमन; पाहा दोन्ही संघाची प्लेईंग इलेव्हन