Virat Kohli Instagram Post: भारताचा स्टार फलंदाज विराट कोहलीनं (Virat Kohli) आजच्या दिवशी चौदा वर्षांपूर्वी आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पण केलं होतं. यादरम्यान विराट कोहलीनं क्रिकेटमधील अनेक मोठ्या विक्रमांना गवसणी घातली. विराट कोहलीच्या दमदार कामगिरीच्या जोरावर त्याला चेस मास्टर, रन मशीन अशी अनेक नवीन नावं मिळाली. आतंरराष्ट्रीय क्रिकेट पदार्पणाच्या सामन्यात विराट कोहलीची कामगिरी कशी होती? हे जाणून घेऊयात.
धोनीच्या नेतृत्वात विराटचं आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पण
विराट कोहलीच्या नेतृत्वात भारताच्या अंडर-19 विश्वचषक जिंकून दिला होता. त्यानंतर त्याची भारतीय संघात निवड झाली. भारताचा माजी कर्णधार महेंद्रसिंह धोनीच्या नेतृत्वाखाली कोहलीनं सलामीवीर म्हणून पदार्पण केलं. या सामन्यात विराट कोहलीला काही खास कामगिरी करता आली नाही. पदार्पणाच्या सामन्यात त्याला 22 चेंडूत फक्त 12 धावा करता आल्या. मात्र त्यानंतर विराट कोहलीनं दमदार कामगिरीच्या जोरावर सर्वांचं लक्ष वेधून घेतलं. या पाच एकदिवसीय सामन्यांच्या मालिकेत विराटनं 159 धावा केल्या. या मालिकेत विराट कोहली भारताकडून सर्वाधिक धावा करणारा चौथा ठरला. पदार्पणाच्या मालिकेत विराटनं 54 धावांची खेळी केली होती. ज्यामुळं भारतानं ही मालिका 3-2 च्या फरकानं जिंकली होती.
आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये 70 आंतरराष्ट्रीय शतक
विराट कोहलीनं त्याच्या आंतरराष्ट्रीय कारकिर्दीत अनेक मोठ्या विक्रमांना गवसणी घातलीय. त्यानं जून 2010 मध्ये झिम्बाब्वे दौऱ्यातून त्याने टी-20 आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पण केलं. त्यानंतर पुढच्या वर्षी 2011 मध्ये जून महिन्यातच विराट कोहलीनं आंतरराष्ट्रीय कसोटी सामना खेळला होता. विराट कोहलीनं आतापर्यंत 27 कसोटी आणि 43 एकदिवसीय क्रिकेटमध्ये एकूण 70 कसोटी सामने खेळले आहेत.
विराट कोहलीचा मागील अडीच वर्षांचा परफॉर्म
विराट कोहलीला जवळपास तीन वर्षांपासून खराब फॉर्मचा सामना करावा लागत आहे. या कालावधीत विराट कोहलीला एकही शतक झळकावता आलं नाही. विराट कोहली 20-30 धांवाचा टप्पा गाठण्यासाठी संर्घष करताना दिसत आहे. विराट कोहलीनं नोव्हेंबर 2019 मध्ये बांग्लादेशविरुद्ध खेळण्यात आलेल्या दिवस-रात्र कसोटी सामन्यात शेवटचं शतक झळकावलं होतं.
विराट कोहलीची कारकिर्द
विराट कोहलीने आतापर्यंत 102 कसोटीत 8 हजार74 धावा आणि 262 एकदिवसीय सामन्यांमध्ये 12 हजार 344 धावा केल्या आहेत. तर, 99 टी-20 आंतरराष्ट्रीय सामन्यांमध्ये 3 हजार 308 धावा केल्या आहेत. विराट कोहलीनं कसोटीत 254 धावांची सर्वोत्तम खेळी खेळली. तर एकदिवसीय क्रिकेटमधील त्याची सर्वोत्तम धावसंख्या 183 इतकी आहे. तर, टी-20 क्रिकेटमध्ये त्याला अद्याप शतक झळकावता आलं नाही.
हे देखील वाचा-