IND vs WI 1st T20: भारत आणि वेस्ट इंडिज (IND vs WI) यांच्यात 16 फेब्रुवारीपासून कोलकाता येथील ईडन गार्डनवर टी-20 मालिका होणार आहे. दरम्यान, बंगाल क्रिकेट असोसिएशननं (CAB) गुरुवारी भारतीय क्रिकेट नियामक मंडळाला (BCCI) वेस्ट इंडिजविरुद्धच्या तीन सामन्यांच्या मालिकेतील शेवटच्या दोन टी-20 सामन्यांसाठी ईडन गार्डनवर प्रेक्षकांना परवानगी देण्याची विनंती केली.


"बीसीसीआयने पहिल्या सामन्यासाठी प्रायोजक आणि प्रतिनिधींसाठी फक्त हॉस्पिटॅलिटी बॉक्सेसना परवानगी दिली आहे. याचदरम्यान बंगाल क्रिकेट असोसिएशननं बीसीसीआयला यावर पुनर्विचार करण्याची आणि अखेरच्या दोन सामन्यांसाठी प्रेक्षकांना परवानगी देण्याची विनंती केलीय. तसेच बोर्डाकडून परवानगी मिळताच प्रेक्षकांना कळवण्यात येईल, असंही बंगाल क्रिकेट असोसिएशननं त्यांच्या निवेदनात म्हटलंय. 


भारतानं एकदिवसीय मालिकेत चांगली कामगिरी करून दाखवली आहे. भारतानं 3 एकदिवसीय सामन्याच्या मालिकेत वेस्ट इंडीजच्या संघाला 3-0 च्या फरकानं पराभूत केलंय. वेस्ट इंडीजच्या संघाकडून जेसन होल्डरनं चांगली खेळी केल. ज्यामुळं आयपीएल फ्रँचायझीं लखनौ सुपर जायंट्सनं खरेदी केलंय. होल्डरची मूळ किंमत 1.50 कोटी होती. परंतु, ऑक्शनमध्ये लखनौच्या संघानं त्याला 8.75 कोटीत विकत घेतलंय. 


भारतविरुद्ध वेस्ट इंडीज टी-20 मालिका वेळापत्रक
पहिला टी-20 सामना- 16 फेब्रुवारी (कोलकाता, ईडन गार्डन)
दुसरा टी-20 सामना- 18 फेब्रुवारी (कोलकाता, ईडन गार्डन)
तिसरा टी-20 सामना- 20 फेब्रुवारी (कोलकाता, ईडन गार्डन)


हे देखील वाचा- 



LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोडी पाहा लाईव्ह - ABP Majha