IND-W vs NZ-W Live : भारतीय महिला विरुद्ध न्यूझीलंड महिला यांच्यात सध्या दुसरा एकदिवसीय क्रिकेटचा सामना सुरू आहे. पहिल्या सामन्यात भारतीय महिला संघाचा पराभव झाल्यानंतर या दुसऱ्या सामन्यात भारतीय संघाने सावध सुरूवात केली आहे. 50 षटकात 6 गड्यांच्या मोबदल्यात भारताने 270 धावा केल्या आहेत. विजयासाठी न्यूझीलंडसमोर 271 धावांचे लक्ष्य ठेवले आहे. यामध्ये मिताली राज आणि ऋचा घोष यांनी अर्धशतके झळकावली आहेत. मिताली राजने 81 बॉलमध्ये 66 धावांची खेळी केली आहे. ऋचा घोषने 64 बॉलमध्ये 65 धावांची खेळी केली आहे. 


मिताली राज आणि ऋचा घोष यांनी अर्धशतके झळकावल्यामुळे भारताने दुसऱ्या वनडेत न्यूझीलंडसमोर 271 धावांचे लक्ष्य ठेवले आहे. मिताली आणि ऋचा यांनी 5 व्या विकेटसाठी 108 धावांची भागीदारी केली. दरम्यान, क्वीन्सटाउन येथे सुरू असलेल्या या दुसऱ्या वनडेत भारताने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. भारताने शफाली वर्माची विकेट लवकर गमावली. त्यानंतर मिताली राज आणि ऋचाने डाव सावरण्याचा प्रयत्न केला. 


आता न्यझीलंडसमोर भारतीय संघाने 271 धावांचे लक्ष्य ठेवले आहे. त्यामुळे आता न्यूझीलंड कशी कामगार करणार याकडे लक्ष्य लागले आहे. दरम्यान पहिल्या एकदिवसीय सामन्यात भारतीय महिला संघाला पराभवाचा सामना करावा लागला होता. पहिल्या सामन्या भारतीय संघाची काामगिरी समाधानकारक राहिली नव्हती. त्यामुळे या सामन्यात भारतीय संघाला आपली कामगिरी उंचावणे महत्त्वाचे होते. त्यानुसार य सामन्यात भारतीय संघाने चांगली कामगिरी करत 271 धावा केल्या आहेत. पहिल्या सामन्यात न्यूझीलंडने भारतासमोर 275 धावांचा डोंगर उभा केला होता. त्याचा पाठलाग करताना भारतीय संघ 213 धावांवर आटोपला होता.


महत्त्वाच्या बातम्या: 



दिवसभरातील महत्त्वाच्या बातम्यांचा आढावा घेण्यासाठी एबीपी माझा लाईव्ह पाहा