New Zealand Announce Squad For Champions Trophy 2025 : 19 फेब्रुवारीपासून सुरू होणाऱ्या आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफी 2025 साठी न्यूझीलंड क्रिकेट बोर्डाने 15 सदस्यीय संघाची घोषणा केली आहे. पाकिस्तानमध्ये होणाऱ्या आगामी चॅम्पियन्स ट्रॉफीमध्ये किवी संघ आपला पहिला सामना यजमान संघाविरुद्ध खेळणार आहे. किवी संघ भारत, पाकिस्तान आणि बांगलादेशसह गट-अ मध्ये आहे. या महत्त्वाच्या स्पर्धेसाठी, किवी क्रिकेट बोर्डाने केन विल्यमसनच्या जागी फिरकी अष्टपैलू मिचेल सँटनरला त्यांच्या संघाचा कर्णधार म्हणून नियुक्त केले आहे, जो पहिल्यांदाच आयसीसी स्पर्धेत कर्णधार म्हणून खेळणार आहे. अलिकडेच, सँटनरच्या नेतृत्वाखाली न्यूझीलंड संघाने घरच्या मैदानावर श्रीलंकेविरुद्ध एकदिवसीय आणि टी-20 मालिका जिंकल्या आहेत.
ऑकलंडमधील एका हॉटेलमध्ये एका खास कार्यक्रमात न्यूझीलंड संघाची घोषणा करण्यात आली. या संघात विल्यम ओ'रोर्क, नॅथन स्मिथ आणि बेन सीयर्स यांना स्थान मिळाले आहे. हे तिन्ही गोलंदाज पहिल्यांदाच आयसीसीच्या मोठ्या स्पर्धेत खेळताना दिसतील. बेन सियर्सबद्दल बोलायचे झाले तर, गेल्या वर्षी झालेल्या आयसीसी टी-20 वर्ल्ड कपदरम्यान तो प्रवासी राखीव संघाचा भाग होता, पण यावेळी त्याला मुख्य संघात स्थान देण्यात आले आहे. न्यूझीलंडच्या या संघात युवा आणि अनुभवी खेळाडूंचे चांगले कॉम्बिनेशन आहे.
केन विल्यमसनबद्दल बोलायचे झाले तर, तो 2013 मध्ये आणि नंतर 2017 मध्ये झालेल्या आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफीमध्ये न्यूझीलंड संघाचा भाग होता, त्यामुळे त्याचा अनुभव किवी संघासाठी खूप महत्त्वाचा ठरणार आहे. याशिवाय गेल्या आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफीमध्ये टॉम लॅथम आणि मिचेल सँटनर यांनाही न्यूझीलंड संघात स्थान देण्यात आले होते. आगामी स्पर्धेत लॅथम यष्टीरक्षकाची भूमिकाही बजावेल. याशिवाय, त्याच्याकडे फलंदाजीत मार्क चॅपमन, डेव्हॉन कॉनवे, डॅरिल मिशेल यांचा पर्यायही असेल. किवी संघ 19 फेब्रुवारी रोजी पहिला गट सामना खेळेल, तर 24 फेब्रुवारी रोजी बांगलादेशविरुद्ध दुसरा सामना खेळेल आणि त्यानंतर शेवटच्या गट सामन्यात 2 मार्च न्यूझीलंड संघ रोजी भारताशी भिडले.
आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफी 2025 साठी न्यूझीलंड संघ : मिचेल सँटनर (कर्णधार), मायकेल ब्रेसवेल, मार्क चॅपमन, डेव्हॉन कॉनवे, लॉकी फर्ग्युसन, मॅट हेन्री, टॉम लॅथम, डॅरिल मिचेल, विल ओ'रोर्क, ग्लेन फिलिप्स, रचिन रवींद्र, बेन सीयर्स, नॅथन स्मिथ, केन विल्यमसन, विल यंग.
हे ही वाचा -