एक्स्प्लोर

ना छापा, ना काटा... टॉसदरम्यान 'शोले'ची आठवण, नाणं जमिनीवर सरळ पडलं!

क्रिकेटमध्ये खेळाची सुरुवात नाणेफेकीने होते. त्यानंतरच कोणता संघ पहिल्यांदा फलंदाजी करणार आणि कोणता संघ क्षेत्ररक्षण करणार हे निश्चित होतं.

मुंबई : नाणेफेक केल्यावर नाणं सरळ जमिनीवर पडल्याचं तुम्ही कधी पाहिलं आहे? खरंतर हिंदी चित्रपटांमध्ये अशाप्रकारचे सीन तयार केले जातात. मेगाब्लॉकबस्टर 'शोले'मधला असा सीन अनेकांनी पाहिला असेल. परंतु मलेशियात झालेल्या अंडर 19 क्रिकेट सामन्यात हे प्रत्यक्षात घडलं. क्रिकेटमध्ये खेळाची सुरुवात नाणेफेकीने होते. त्यानंतरच कोणता संघ पहिल्यांदा फलंदाजी करणार आणि कोणता संघ क्षेत्ररक्षण करणार हे निश्चित होतं. परंतु मंगळवारी (9 जुलै) असा एक सामना झाला, ज्यात नाणेफेक तर झाली पण नाणं खाली पडलं तेव्हा कमालच झाली. नेपाळ आणि हाँगकाँग यांच्यात अंडर 19 एसीसी (एशियन क्रिकेट काऊंसिल) ईस्टर्न रीजन 2019 चा अंतिम सामना मंगळवारी खेळवण्यात आला. नाणेफेकीसाठी नाणं उडवून हेड किंवा टेल (छापा-काटा) विचारण्यात आलं. पण नाणं खाली आल्यावर ते कोणाच्याच बाजूने पडलं नाही. नाणं जमिनीवर सरळ पडलं. सामनाधिकाऱ्यांनी यानंतर पुन्हा नाणेफेक करण्यास सांगितलं. यावेळी नेपाळने नाणेफेक जिंकून क्षेत्ररक्षणाचा निर्णय घेतला. या धम्माल प्रकारावर आयसीसीचीही नजर गेली. आयसीसीने एशियन क्रिकेट काऊंसिलचं ट्वीट रिट्वीट करुन, "तुम्ही यापूर्वी असं कधी पाहिलं होतं का?" असं म्हटलं आहे. हा सामना मलेशियाच्या किनरारा ओवलमध्ये खेळवण्यात आला होता. नेपाळने हाँगकाँगला पहिल्यांदा फलंदाजीसाठी निमंत्रण दिलं. हाँगकाँगचा डाव 43.1 षटकात 95 धावांवर आटोपला. हाँगकाँग संघाने नेपाळसमोर विजयासाठी 96 धावांचं आव्हान ठेवलं. नेपाळने अवघ्या 16.1 षटकात 96 धावा करुन सामन्यासह ही स्पर्धाही जिंकली. याआधी नेपाळने मलेशियाला सात विकेट्सनी पराभूत केलं होतं. तर हाँगकाँगने डकवर्थ लुईस नियमानुसार सिंगापूरचा 51 धावांनी पराभव केला होता. नेपाळ आता 2 ऑगस्टपासून श्रीलंकेत सुरु होणाऱ्या आशिया चषकात सहभागी होणार आहे.

महत्त्वाच्या बातम्या

Ajinkya Rahane : निवृत्ती जाहीर करताच सचिन तेंडुलकरचा पहिला फोन...; क्रिकेटच्या देवाचा काय होता अजिंक्य रहाणेला शेवटचा मेसेज, केला मोठा खुलासा
निवृत्ती जाहीर करताच सचिन तेंडुलकरचा पहिला फोन...; क्रिकेटच्या देवाचा काय होता अजिंक्य रहाणेला शेवटचा मेसेज, केला मोठा खुलासा
77 चेंडूत 0 धावा, सामन्यात पुढे जे काही घडलं, मैदानातील सगळे चकीत; क्रिकेट इतिहासातील सर्वात धक्कादायक अन् लाजिरवाणा विक्रम
77 चेंडूत 0 धावा, सामन्यात पुढे जे काही घडलं, मैदानातील सगळे चकीत; क्रिकेट इतिहासातील सर्वात धक्कादायक अन् लाजिरवाणा विक्रम
SL vs IND 1st Test : कर्णधार शुभमन गिल मांडी घालून बसला, कोच गौतम गंभीर थेट समोर जाऊन बसला! कॅमेऱ्यात कैद झाली दोघांची ‘गंभीर’ चर्चा, पाहा VIDEO
कर्णधार शुभमन गिल मांडी घालून बसला, कोच गौतम गंभीर थेट समोर जाऊन बसला! कॅमेऱ्यात कैद झाली दोघांची ‘गंभीर’ चर्चा, पाहा VIDEO
Ind vs SL Test Series: श्रीलंकेचे 5 धोकादायक खेळाडू; टीम इंडियासाठी ठरू शकतात घातक, एकाच्या नावावर 23 सामन्यांत 125 विकेट्स
श्रीलंकेचे 5 धोकादायक खेळाडू; टीम इंडियासाठी ठरू शकतात घातक, एकाच्या नावावर 23 सामन्यांत 125 विकेट्स

व्हिडीओ

Sharad Pawar NCP MP Meet PM Modi : मोदींच्या दरबारी कोणती 'तुतारी'? Special Report
Nitesh Rane : जरांगे, राज ठाकरे, फडणवीस-जयंतरावांचा एकत्र प्रवास ते पवारांचे खासदार; राणेंचं भाष्य!
Bajrang Sonawane On PM Modi Meet : पंतप्रधान मोदींची भेट कशासाठी? खासदार बजरंग सोनवणेंचा खुलासा
Shivsena: ठाकरेंच्या फुटलेल्या 6 खासदारांच्या विलिनीकरणाला स्थगिती मिळणार?; आज सुप्रीम कोर्टात सुनावणी
Raj Thackeray Special Report : मुंबई-गोवा महामार्गावरुन राज ठाकरेंचे सरकारला खडेसवाल : ABP Majha

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Sachin Ahir Shivsena: इकडे सचिन अहिरांनी मुंबईत शिंदेंची शिवसेना बांधायला घेतली तिकडे भावाचीही बैठकांना हजेरी, सुनील अहिरही उद्धव ठाकरेंची साथ सोडणार?
इकडे सचिन अहिरांनी मुंबईत शिंदेंची शिवसेना बांधायला घेतली तिकडे भावाचीही बैठकांना हजेरी, सुनील अहिरही उद्धव ठाकरेंची साथ सोडणार?
Sunetra Pawar: रेवती-सारंगच्या रिसेप्शनला पार्थ-जयची उपस्थिती, पण सुनेत्रा पवार का नव्हत्या? राष्ट्रवादीच्या नेत्याने कारण सांगितलं
रेवती-सारंगच्या रिसेप्शनला पार्थ-जयची उपस्थिती, पण सुनेत्रा पवार का नव्हत्या? राष्ट्रवादीच्या नेत्याने कारण सांगितलं
Tejasvee Ghosalkar Gen Z: भाजपच्या तेजस्वी घोसाळकरांची जेन झी साठी महत्त्वाची मागणी, लोकल ट्रेनमधील तीन डबे आरक्षित करा, थेट रेल्वेमंत्र्यांना धाडलं पत्र
भाजपच्या तेजस्वी घोसाळकरांची जेन झी साठी महत्त्वाची मागणी, लोकल ट्रेनमधील तीन डबे आरक्षित करा, थेट रेल्वेमंत्र्यांना धाडलं पत्र
AR Rahman Son AR Ameen Car Accident: ए. आर. रहमान यांचा मुलगा अमीनच्या गाडीचा भीषण अपघात; गायकाची पोर्शे कार एका कॅबला धडकली, अन्...
ए. आर. रहमान यांचा मुलगा अमीनच्या गाडीचा भीषण अपघात; पोर्शे कार एका कॅबला धडकली, अन्...
Hardik Pandya Trade : हार्दिक पांड्याला घेण्यासाठी संघांची पैशांची जुळवाजुळव, पण मुंबई इंडियन्सने अद्याप पत्तेच उघडले नाहीत! KKR-CSKच्या प्लॅनला ब्रेक, नेमकं काय घडलं?
हार्दिक पांड्याला घेण्यासाठी संघांची पैशांची जुळवाजुळव, पण मुंबई इंडियन्सने अद्याप पत्तेच उघडले नाहीत! KKR-CSKच्या प्लॅनला ब्रेक, नेमकं काय घडलं?
ODI World Cup 2027 : कधीकाळी क्रिकेट विश्वावर राज्य, आता वर्ल्ड कप खेळण्यासाठी संघर्ष! 5 ICC ट्रॉफी जिंकणाऱ्या वेस्ट इंडिजची दाणादाण
कधीकाळी क्रिकेट विश्वावर राज्य, आता वर्ल्ड कप खेळण्यासाठी संघर्ष! 5 ICC ट्रॉफी जिंकणाऱ्या वेस्ट इंडिजची दाणादाण
Maharashtra Live blog updates: नाशिकसह पालघरमध्ये पुन्हा भूकंपाचे धक्के; जव्हार-विक्रमगड परिसर हादरला
Maharashtra Live blog updates: नाशिकसह पालघरमध्ये पुन्हा भूकंपाचे धक्के; जव्हार-विक्रमगड परिसर हादरला
PM Modi and Rohit Pawar: PM मोदी स्टेजवर येताच सुप्रिया सुळेंनी रोहित पवारांना हाताला धरुन खेचलं, पुढे काय घडलं?; सगळीकडे चर्चा, पाहा 38 सेकंदाचा VIDEO
PM मोदी स्टेजवर येताच सुप्रिया सुळेंनी रोहित पवारांना हाताला धरुन खेचलं, पुढे काय घडलं?; सगळीकडे चर्चा, पाहा 38 सेकंदाचा VIDEO
Embed widget