VIDEO : पोलार्डचा संयम सुटला! पाकिस्तानी खेळाडूसोबत थेट मैदानात भिडला, VIDEO आला समोर
सॅम करनच्या नेतृत्वाखाली डेझर्ट वायपर्सने 4 जानेवारी रोजी ILT20 चे विजेतेपद जिंकले.

Naseem Shah vs Kieron Pollard : सॅम करनच्या नेतृत्वाखाली डेझर्ट वायपर्सने 4 जानेवारी रोजी ILT20 चे विजेतेपद जिंकले. त्यांनी अंतिम सामन्यात MI एमिरेट्सचा पराभव केला. यासह, ILT20 ला डेझर्ट वायपर्सच्या रूपात एक नवीन विजेता मिळाला. या स्पर्धेत डेझर्ट वायपर्ससाठी कॅप्टन सॅम करनने शानदार कामगिरी केली. दुबई इंटरनॅशनल स्टेडियमवर झालेल्या अंतिम सामन्यात वायपर्सने एमआय एमिरेट्सचा 46 धावांनी पराभव केला. हा डेजर्ट वायपर्सचा पहिलाच ILT20 किताब ठरला, तर दुसऱ्या हंगामातील विजेती एमआय एमिरेट्स यावेळी ट्रॉफीपासून दूर राहिली.
पोलार्डचा संयम सुटला! पाकिस्तानी खेळाडूसोबत थेट मैदानात भिडला
या अंतिम सामन्यात एका क्षणी मैदानावर वातावरण तापले. वेस्ट इंडीजचा माजी कर्णधार कीरोन पोलार्ड आणि पाकिस्तानचा वेगवान गोलंदाज नसीम शाह यांच्यात जोरदार वाद झाला. ही घटना एमआय एमिरेट्सच्या डावातील 11व्या षटकाच्या शेवटच्या चेंडूवर घडली.
डेजर्ट वायपर्सकडून गोलंदाजी करणाऱ्या नसीम शाहने टाकलेल्या चेंडूवर पोलार्ड मोठा फटका मारू शकला नाही. चेंडू बॅटच्या आतील कडेवर लागून पॅडवर आदळला आणि परत गोलंदाजाकडे गेला. त्यानंतर नसीम शाहने हसत पोलार्डची थट्टा केली, जी अनुभवी फलंदाजाला अजिबात आवडली नाही.
Sparks fly in the middle! 🧨
— International League T20 (@ILT20Official) January 4, 2026
The Final brings out many emotions, catching Naseem Shah & Kieron Pollard in the middle of it. ⚔️#Final #DVvMIE #DPWorldILT20 #WhereTheWorldPlays #AllInForCricket pic.twitter.com/PGUsSl3PaT
दोघांमध्ये मैदानात शाब्दिक वाद
यानंतर पोलार्ड थेट नसीम शाहकडे गेला आणि दोघांमध्ये तीव्र शाब्दिक वाद झाला. नसीम शाहही माघार घेण्यास तयार नव्हता. मैदानावर तणावाचे वातावरण निर्माण झाले, अखेर पंचांना हस्तक्षेप करत दोघांना वेगळे करावे लागले. मात्र काही षटकानंतर नसीम शाहनेच पोलार्डला बाद केले. पोलार्ड 28 चेंडूत 28 धावा करून पॅव्हेलियनमध्ये परतला.
सामन्यानंतर नसीम शाह म्हणाला, “फायनलचा दबाव वेगळाच असतो. फलंदाजी आणि गोलंदाजी या दोन्ही आघाड्यांवर संपूर्ण संघाचे योगदान महत्त्वाचे ठरले. आमच्याकडे चांगले पर्याय होते आणि व्यवस्थापनाने त्यांचा योग्य वापर केला. सर्वांनी शंभर टक्के मेहनत घेतली आणि त्याचा निकाल सर्वांसमोर आहे.”
सॅम करनच्या नेतृत्वाखाली डेजर्ट वायपर्सने अंतिम सामन्यात उत्कृष्ट खेळ दाखवला. प्रथम फलंदाजी करत वायपर्सने 20 षटकांत 4 गडी गमावत 182 धावा केल्या. यात कर्णधार सॅम करनच्या 74 धावांच्या शानदार खेळीचा मोठा वाटा होता. या लक्ष्याचा पाठलाग करताना एमआय एमिरेट्सचा संघ 18.3 षटकांत 136 धावांवर गारद झाला. डेव्हिड पायने आणि नसीम शाह यांनी प्रत्येकी तीन बळी घेत निर्णायक भूमिका बजावली.
हे ही वाचा -
Joe Root Record : जो रूटचा आणखी एक पराक्रम, आता सचिनचा अजेय किल्ला ढासळणार?, क्रिकेटविश्वात खळबळ





















