MS Dhoni : धोनीचे चित्रपट निर्मितीत पदार्पण, पहिल्या चित्रपटाचे पोस्टर प्रदर्शित
LGM : भारताचा माजी कर्णधार एम एस धोनी याने आता मनोरंजन क्षेत्रात पदार्पण केलेय.
MS Dhoni Reveals First Look of His Production House Debut Film Let's Get Married aka LGM : भारताचा माजी कर्णधार एम एस धोनी याने आता मनोरंजन क्षेत्रात पदार्पण केलेय. धोनीने दाक्षिणात्य चित्रपटाची निर्मिती केली आहे. धोनी एलजीएम या आपल्या पहिल्या चित्रपटाचे पोस्टर प्रदर्शीत केलेय. धोनी एंटरटेनमेंट प्रोडक्शन अंतर्गत या चित्रपटाची निर्मिती होत आहे. जानेवारी 2023 मध्ये या चित्रपटाची घोषणा करण्यात आली होती. आता या चित्रपटाचे पोस्टर रिलिज झालेय.
'धोनी एन्टरटेनमेंट प्रायवेट लिमिटेड'च्या बॅनरखाली आपल्या पहिल्या-वहिल्या सिनेमाचे पोस्टर रिलिज केलेय. 'एलजीएम : लेट्स गेट मॅरिड' (Lets Get Married) असं या सिनेमाचं नाव आहे. 'लेट्स गेट मॅरिड' (Lets Get Married) हा दाक्षिणात्य सिनेमा लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. 'धोनी एन्टरटेनमेंट'ने सोशल मीडियावर या सिनेमाचे पोस्टर रिलिज केलेय.
'एलएसजी : लेट्स गेट मॅरिड'मध्ये कोणते कलाकार झळकणार?
हरीश कल्याण, इवाना, नादिया आणि योगी बाबू हे कलाकार 'एलएसजी : लेट्स गेट मॅरिड' या सिनेमात महत्त्वाच्या भूमिकेत झळकणार आहेत. रमेश थमिलमणी या सिनेमाच्या माध्यमातून दिग्दर्शन क्षेत्रात पदार्पण करणार आहेत. तसेच या सिनेमातील गाणीदेखील त्यांनीच संगीतबद्ध केली आहेत. 'एलएसजी : लेट्स गेट मॅरिड' या सिनेमात इवाना मुख्य भूमिकेत आहे. 'लव्ह टुडे' या सिनेमाच्या माध्यमातून इवानाला लोकप्रियता मिळाली होती. बॉक्स ऑफिसवर हा सिनेमा ब्लॉकबस्टर ठरला होता. या सिनेमाचे मोशन पोस्टर अॅनिमेशन स्वरुपात बनवण्यात आले आहे. महेंद्र सिंह धोनी (MS Dhoni) आपल्या पहिल्या सिनेमाची अत्यंत कमी बजेटमध्ये निर्मिती करणार आहे. हा कॉमेडी ड्रामा चित्रपट असेल. यामध्ये एक कपल आणि आई यांच्या आजूबाजूला घडणाऱ्या घटनावर आधारित हा चित्रपट असेल.
First look of #LGM is here!
— Dhoni Entertainment Pvt Ltd (@DhoniLtd) April 10, 2023
Get ready to be bowled over by this fun filled family entertainer! pic.twitter.com/JtCRXZvh45
'धोनी एन्टरटेनमेंट'बद्दल जाणून घ्या... (Dhoni Entertainment)
महेंद्र सिंह धोनीने धोनी एन्टरटेनमेंट या निर्मिती संस्थेची सुरुवात 25 जानेवारी 2019 रोजी केली आहे. आतापर्यंत या संस्थेअंतर्गत तीन शॉट फिल्मची निर्मिती करण्यात आली आहे. यात 'रोर ऑफ द लॉइन', 'बिलेज टु ग्लोरी' आणि 'द हिडन हिंदू' सारख्या शॉर्ट फिल्मचा समावेश आहे. आता नव्या सिनेमाची चाहते आतुरतेने वाट पाहत आहेत. महेंद्र सिंह धोनीने क्रिकेटविश्वात आपल्या कामाने सर्वांना थक्क केलं आहे. आता सिनेसृष्टीत झळकण्यासाठी तो सज्ज झाला आहे.
View this post on Instagram