Mohammed Siraj : 'मी कधी कोणाचेही वाईट करू इच्छित नाही...', मोहम्मद सिराज असं का म्हणाला? व्हिडिओ व्हायरल
Ind vs Eng 5th Test : मोहम्मद सिराज सध्या क्रिकेट विश्वात चर्चेचा विषय बनला. इंग्लंडविरुद्धच्या पाचव्या टेस्ट सामन्यात भारताला ऐतिहासिक विजय मिळवून देण्यात त्याचा सिंहाचा वाटा होता.

Mohammed Siraj Ind vs Eng 5th Test : मोहम्मद सिराज सध्या क्रिकेट विश्वात चर्चेचा विषय बनला आहे. इंग्लंडविरुद्धच्या पाचव्या आणि निर्णायक टेस्ट सामन्यात भारताला ऐतिहासिक विजय मिळवून देण्यात त्याचा सिंहाचा वाटा होता. या सामन्यात त्याने पहिल्या डावात 4 तर दुसऱ्या डावात 5 बळी घेतले. एकूण 9 विकेट्ससह भारताच्या ऐतिहासिक विजयाचा नायक ठरलेल्या सिराजला 'प्लेयर ऑफ द मॅच' पुरस्काराने गौरवण्यात आले.
Yeh #NayaIndia hain, ye haar kar, phir jeetna jaanta hai 💙
— Sony Sports Network (@SonySportsNetwk) August 4, 2025
Mohammed Siraj lands the winning blow to script a historic victory at The Oval 🔥#SonySportsNetwork #ENGvIND #NayaIndia #DhaakadIndia #TeamIndia #ExtraaaInnings | @mdsirajofficial pic.twitter.com/rmoemQV7e0
प्रेस कॉन्फरन्समध्ये दिला मनाला भिडणारा संदेश
सामना संपल्यानंतर मोहम्मद सिराज कर्णधार शुभमन गिलसोबत पत्रकार परिषदेला हजर होता. यावेळी त्याने देशासाठी खेळण्यावर एक भावनिक वक्तव्य केलं. वर्कलोड मॅनेजमेंट आणि वर्क एथिक्सबद्दल विचारलेल्या प्रश्नाला उत्तर देताना सिराज म्हणाला की, मी माझ्या खेळावर चांगल्या हेतूने खूप मेहनत घेतो. मी कोणाचेही वाईट करू इच्छित नाही. माझा एकच विचार असतो, देशासाठी किती चांगलं करू शकतो हे बघायचं. 140 कोटींपेक्षा अधिक लोकसंख्येच्या देशात देशाचं प्रतिनिधित्व करण्याची संधी मिळणं, ही खूप मोठी गोष्ट आहे."
185.3 overs - 'Not a problem when you're playing for the country'
— ESPNcricinfo (@ESPNcricinfo) August 4, 2025
Mohammed Siraj 🙌 #ENGvIND pic.twitter.com/pZ13PT57kE
"आज संपूर्ण भारताचं हास्य माझ्यासाठी सर्वकाही"
सिराज पुढे म्हणाला, "आज संपूर्ण भारतवासीयांच्या चेहऱ्यावर आनंद आहे. माझ्यासाठी तेच सगळ्यात मोठं बक्षीस आहे. मी एवढंच सांगू इच्छितो की, तुम्ही कोणतंही काम करत असाल, तर त्या कामात प्रामाणिक राहा. स्वतःवर विश्वास ठेवा, तुम्ही करू शकता. एक प्रोफेशनल खेळाडूसाठी ही गोष्ट फार महत्त्वाची आहे. विश्वासाशिवाय काहीही शक्य होत नाही."
मालिकेतील सर्वोत्तम गोलंदाज
भारत-इंग्लंड मालिकेत मोहम्मद सिराज सर्वाधिक विकेट घेणारा गोलंदाज ठरला. पाच सामन्यांत त्याने 23 बळी घेतले आणि 185.3 षटकं टाकली. विशेष म्हणजे, या मालिकेत सर्व सामने खेळणारा तो खेळाडू होता.
For his relentless bowling display and scalping nine wickets, Mohd. Siraj bags the Player of the Match award in the 5th Test 👏👏
— BCCI (@BCCI) August 4, 2025
Scorecard ▶️ https://t.co/Tc2xpWNayE#TeamIndia | #ENGvIND | @mdsirajofficial pic.twitter.com/GyUl6dZWWp
हे ही वाचा -





















