सिराजच्या महागड्या गोलंदाजीने रोहितचे टेन्शन वाढले, हार्दिक परतल्यानंतर पत्ता कट होणार ?
World Cup 2023 : विश्वचषकात टीम इंडिया तुफान फॉर्मात आहे. सलग सहा सामन्यात विजय मिळवत गुणतालिकेत अव्वल स्थान पटकावलेय.
Mohammed Siraj Stats In World Cup 2023 : विश्वचषकात टीम इंडिया तुफान फॉर्मात आहे. सलग सहा सामन्यात विजय मिळवत गुणतालिकेत अव्वल स्थान पटकावलेय. गोलंदाजी, फलंदाजी आणि फिल्डिंगमध्ये भारतीय संघाने दमदार कामगिरी केली आहे. हार्दिकच्या अनुपस्थितीत संधी मिळालेल्या शामीनेही दोन सामन्यात नऊ विकेट घेऊन खळबळ माजवली आहे. पण सहा सामन्यात मोहम्मद सिराज प्रभावहीन दिसलाय. आयसीसी क्रमवारीत सिराजचा बोलबाला आहे, पण विश्वचषकाच्या मैदानात त्याला अद्याप हवीतशी कामगिरी करता आली नाही. मोहम्मद सिराजचा फॉर्म टीम इंडियासाठी डोकेदुखी ठरत आहे.
विश्वचषकात सिराजची गोलंदाजी कशी राहिली ?
चेन्नईमध्ये 8 ऑक्टोबर रोजी भारतीय संघाने ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या सामन्याने आपल्या विश्वचषक मोहिमेची सुरुवात केली. या सामन्यात मोहम्मद सिराजने 6.3 षटकात 26 धावा देत 1 बळी घेतला होता. अफगाणिस्तानविरुद्ध मोहम्मद सिराज महागडा ठरला. या सामन्यात त्याने अफगाणिस्तानच्या फलंदाजांना खूप धावा दिल्या. मोहम्मद सिराजच्या 9 षटकात 76 धावा खर्च केल्या, मात्र एकही विकेट मिळाली नाही. पाकिस्तानविरुद्ध मोहम्मद सिराजने 8 षटकांत 50 धावांत 2 जणांना तंबूत पाठवले. त्यानंतर बांगलादेशविरुद्ध मोहम्मद सिराजने 10 षटकांत 60 धावा देत 2 बळी घेतले. मोहम्मद सिराजच्या 10 षटकात किवी फलंदाजांनी 45 धावा दिल्या, धरमशालामध्ये फक्त एक विकेट घेता आली. इंग्लंडविरोधात लखनौच्या मैदानातही सिराज प्रभावहीन दिसला. सिराजने सहा षटकात 33 धावा खर्च केल्या, पण एकही विकेट घेता आली नाही.
हार्दिक परतल्यानंतर सिराजचा पत्ता कट होणार का ?
इंग्लंडविरोधात लखनौच्या मैदानात भारतीय संघाने 100 धावांनी विजय मिळवला. या सामन्यात भारताच्या गोलंदाजांनी टिच्चून मारा केला. मोहम्मद शामीने चार फलंदाजांना तंबूत पाठवले तर जसप्रीत बुमराहने तीन विकेट घेतल्या. पण तिसरा वेगवान गोलंदाज मोहम्मद सिराज याची विकेटची पाटी कोरीच राहिली. सिराजने सहा षटकात 33 धावा खर्च केल्या. विकेट घेण्यात सिराजला अपयश येत आहे, त्यामुळे त्याच्यावर टीकेची झोड उडत आहे. हार्दिक पांड्या परतल्यानंतर सिराजला बेंचवर बसवा, असा सल्ला काही जणांनी दिला आहे. जसप्रीत बुमराहनंतर सिराजला भारताने पसंती दर्शवली होती. पण सिरजला सहा सामन्यात विकेट घेता आल्या नाहीत, त्याशिवाय तो महागडाही ठरतोय. त्यामुळे हार्दिक परतल्यानंतर सिराजला बेंचवर बसावे लागू शकते.
Mohammed Siraj has not had the best #CWC23 thus far, and is the only Indian to concede more than 20 fours in the edition. pic.twitter.com/KxtsRaPScF
— Wisden India (@WisdenIndia) October 31, 2023