सिराज-शुभमनचा जलवा कायम, पाहा टॉप 5 गोलंदाज अन् फलंदाजाबद्दल
ODI Rankings : फलंदाज आणि गोलंदाजांच्या क्रमवारीत टॉप पाच मध्ये शुभमन गिल आणि मोहम्मद सिराज यांचा समावेश आहे.
Shubman Gill Mohammed Siraj Team India ODI Rankings : आयसीसीने एकदिवसीय क्रमवारी जारी केली आहे. फलंदाज आणि गोलंदाजांच्या क्रमवारीत टॉप पाच मध्ये शुभमन गिल आणि मोहम्मद सिराज यांचा समावेश आहे. यांचा अपवाद वगळता इतर एकाही खेळाडूचा आघाडीच्या पाच मध्ये समावेश नाही. अष्टपैलू खेळाडूमध्ये तर टॉप ५ मध्ये एकाही भारतीय खेळाडूचा समावेश आहे.
भारतीय संघाचा वेगवान गोलंदाज मोहम्मद सिराज आयसीसी वनडे रॅकिंगमध्ये दुसऱ्या क्रमांकावर आहे. सिराज टॉप १० गोलंदाजामध्ये एकमेव भारतीय खेळाडू आहे. ऑस्ट्रेलियाचा वेगवान गोलंदाज जोश हेजलवूड पहिल्या स्थानावर आहे. फलंदाजांमध्ये बाबर आझम पहिल्या स्थानावर आहे. टॉप 5 खेळाडूमध्ये पाकिस्तानच्या तीन फलंदाजांच समावेश आहे. शुभमन गिल टॉप 5 मध्ये एकमेव भारतीय खेळाडू आहे. अष्टपैलू खेळाडूच्या यादीत आघाडीच्या दहा जणांमध्ये एकाही भारतीय खेळाडूचा समावेश नाही. बांग्लादेशचा शाकिब-अल-हसन पहिल्या क्रमांकावर आहे.
आयसीसी वनडे रॅकिंगमध्ये जोश हेजलवूड गोलंदाजीत पहिल्या क्रमांकावर आहे. मोहम्मद सिराज दुसऱ्या क्रमांकावर आहे. तर ऑस्ट्रेलियाचा मिचेल स्टार्क या यादीत तिसऱ्या स्थानावर आहे. न्यूझीलंडचा ट्रेंट बोल्ट चौथ्या स्थानावर विराजमान आहे. मॅट हेनरी पाचव्या स्थानावर आहे.
टॉप पाच फलंदाजामध्ये शुभमन गिल एकमेव भारतीय खेळाडू आहे. गिल चौथ्या क्रमांकावर आहे. फलंदाजामध्ये बाबर आझम पहिल्या स्थानावर विराजमान आहे. फखर जमान दुसऱ्या स्थानावर आहे. तर दक्षिण आफ्रिकेचा वान डेर डूसेन तिसऱ्या स्थानावर आहे. गिल चौथ्या स्थानावर आहे. भारतीय दिग्गज विराट कोहली सातव्या स्थानावर विराजमान आहे तर रोहित शर्मा नवव्या स्थानावर आहे.
वनडे ऑलराउंडर्सच्या रॅकिंगमध्ये बांग्लादेशचा शाकब अल हसन पहिल्या स्थानावर विराजमान आहे. तर अफगानिस्तानचा मोहम्मद नबी दूसऱ्या स्थानावर आहे. राशिद खान तिसऱ्या क्रमांकावर आहे. झिम्बाब्वेचा सिकंदर रजा चौथ्या स्थानावर आहे. जीशान मकसूद पाचव्या क्रमांकावर आहे. जीशान ओमान देसाचा खेळाडू आहे. हार्दिक पांड्या १३ व्या क्रमांकावर आहे. आघाडीच्या २० खेळाडूत पांड्या एकमेव आहे.
Three Pakistan players in the top five ODI batters 🔥
— ICC (@ICC) May 4, 2023
The latest changes in the @MRFWorldwide ICC Men’s Player Rankings ⬇️https://t.co/1L07ZSzOZo
Mohammad Siraj moves to No.2 position in the latest ICC ODI bowling rankings - He is the highest ranked Asian ODI bowler. pic.twitter.com/W4tcAJX6Nn
— CricketMAN2 (@ImTanujSingh) May 4, 2023