Mohammed Shami Wicketless On His Comeback : इंग्लंडविरुद्धच्या तिसऱ्या टी-20 सामन्यात टीम इंडियाला 26 धावांनी पराभव स्वीकारावा लागला. या टी-20 सामन्यात, नाणेफेक जिंकल्यानंतर टीम इंडियाचा कर्णधार सूर्यकुमार यादवने प्लेइंग इलेव्हनमध्ये बदल केल्याबद्दल सांगितले, जे ऐकून भारतीय चाहते आनंदाने उड्या मारू लागले. हा बदल म्हणजे वेगवान गोलंदाज अर्शदीप सिंगच्या जागी मोहम्मद शमीचे संघात पुनरागमन केले. मोहम्मद शमीला 14 महिन्यांनी टीम इंडियात परतण्याची संधी मिळाली आणि भारतीय चाहत्यांना आशा होती की शमी याच्या जुन्या फॉर्ममध्ये दिसेल. पण असं काहीही झालं नाही.
शमीची निराशाजनक कामगिरी
इंग्लंडविरुद्धच्या तिसऱ्या टी-20 सामन्यात टीम इंडियाचा वेगवान गोलंदाज मोहम्मद शमीचे पुनरागमन खूपच निराशाजनक होते. शमीने या संपूर्ण सामन्यात 3 षटके टाकली, ज्यामध्ये त्याने 25 धावा दिल्या पण एकही विकेट घेऊ शकला नाही. सामन्यादरम्यान शमीची जुनी धारही गायब होती.
चॅम्पियन्स ट्रॉफीपूर्वी शमीला मिळवावा लागणार फॉर्म
टीम इंडियाला येत्या महिन्यात म्हणजेच फेब्रुवारीमध्ये आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफीमध्ये सहभागी व्हायचे आहे. जर या स्पर्धेत शमीची अवस्था अशीच राहिली, तर टीम इंडियासाठी किंवा भारतीय चाहत्यांसाठी ही बातमी चांगले नसेल. संघ निवडकर्त्यांपासून ते चाहत्यांपर्यंत सर्वांनाच शमीच्या पुनरागमनाची खूप आशा होती की, जेव्हा तो इतक्या महिन्यांनंतर गोलंदाजी करण्यासाठी मैदानात येईल तेव्हा विरोधी संघाला धक्का बसेल.
पण मैदानावर असे काहीही घडताना दिसले नाही. उलट, इंग्लंडच्या खेळाडूंनी शमीला चांगलाच धुतला. त्यामुळे शमी इंग्लिश फलंदाजांसमोर खूपच असहाय्य दिसत होता. चॅम्पियन्स ट्रॉफीसाठी निवडलेल्या खेळाडूंच्या यादीत शमीचे नाव आहे. त्यामुळे मोहम्मद शमीला इंग्लंडविरुद्धच्या एकदिवसीय मालिकेत त्याची गोलंदाजीची ताकद सिद्ध करावी लागेल अन्यथा त्याला संघाच्या प्लेइंग इलेव्हनमधून वगळले जाऊ शकते.
राजकोटमध्ये टीम इंडियाचा 26 धावांनी पराभव
सलग दोन विजयांनंतर इंग्लंडविरुद्धच्या तिसऱ्या टी-20 सामन्यात टीम इंडियाला 26 धावांनी पराभव स्वीकारावा लागला. आता चौथ्या टी-20 सामन्यात टीम इंडिया शानदार पुनरागमन करेल आणि एमसीएवर शानदार विजय मिळवून मालिका जिंकेल अशी अपेक्षा आहे.
हे ही वाचा -