Varun Chakravarthy Ind vs Eng 3rd T20 : इंग्लंडच्या आक्रमक गोलंदाजीपुढे टीम इंडियाचे फलंदाजी ढेपाळल्याने तिसऱ्या टी-20 क्रिकेट सामन्यात पाहुण्या संघाविरुद्ध 26 धावांनी पराभवाचा सामना करावा लागला. या विजयासह इंग्लंडने पाच टी-20 सामन्यांच्या मालिकेतील पिछाडी 1-2 अशी एकने कमी केली आहे. इंग्लंडने निर्धारित 20 षटकांत नऊ बाद 171 धावा केल्या. विजयासाठी 172 धावांच्या आव्हानासमोर भारतीय फलंदाज ठरावीक अंतराने बाद होत गेले. भारताला 20 षटकांत 9 बाद 145 धावांवर रोखत इंग्लंडने विजय मिळवला. हार्दिक पांड्याने सर्वाधिक 40 धावा केल्या पण त्यासाठी त्याने 35 चेंडू खेळले. इंग्लंडकडून जोफ्रा आर्चर आणि मार्क वूड यांनी पॉवरप्लेमध्ये प्रभावी कामगिरी केली, तर लेग-स्पिनर आदिल रशीदने मधल्या षटकांमध्ये टीम इंडियावर दबाव निर्माण केला.
पहिल्या दोन सामन्यांमध्ये आर्चरविरुद्ध आऊट होणार संजू सॅमसन या सामन्यात पण फक्त सहा चेंडूत तीन धावा काढल्यानंतर आऊट झाला. सलामीवीर अभिषेक शर्माने 14 चेंडूत 25 धावा केल्या आणि नंतर ब्रायडन कार्सने त्याला पॅव्हेलियनमध्ये परत पाठवले. कर्णधार सूर्यकुमार यादवने सात चेंडूत 14 धावा केल्या आणि पुन्हा एकदा वूडच्या गोलंदाजीवर चुकीचा शॉट खेळून त्याची विकेट स्वस्तात गमावली. फॉर्ममध्ये असलेल्या तिलक वर्माला गोलंदाजीची गती कायम ठेवता आली नाही आणि रशीदचा चेंडूवर तो आऊट झाला.
वरुण चक्रवर्तीने उघडला पंजा
जरी भारतीय संघ हा सामना हरला तरी पण वरुण चक्रवर्तीने पुन्हा एकदा आपल्या गोलंदाजीने सर्वांचे मन जिंकले. चक्रवर्तीने जोफ्रा आर्चरला गुगलीने आऊट करून टी-20 क्रिकेटमध्ये दुसऱ्यांदा पाच विकेट्स घेतल्या. आर्चर व्यतिरिक्त, जोस बटलर, जेमी स्मिथ, जेमी ओव्हरटन आणि ब्रायडन कार्स यांना आऊट केले. त्याने चार षटकांच्या स्पेलमध्ये 24 धावा देऊन पाच विकेट्स घेतल्या. चक्रवर्तीला त्याच्या कामगिरीसाठी सामनावीराचा पुरस्कार देण्यात आला.
सामनावीर झाल्यानंतर वरुण चक्रवर्ती काय म्हणाला?
वरुण चक्रवर्ती म्हणाला की, 'हा सामना जिंकता आला नाही याचे मला दुःख आहे. पण क्रिकेटमध्ये विजय-पराजय होत असतो, तो या खेळाचा भाग आहे. पुढे जाऊन पुढच्या सामन्याची तयारी करावी लागेल. जेव्हा तुम्ही देशासाठी खेळता तेव्हा तुम्हाला जबाबदारी घ्यावी लागते. मी काही प्रमाणात हे करू शकतो. गेल्या सामन्यात तुम्हाला सांगितल्याप्रमाणे, कदाचित मी चांगली गोलंदाजी केली असेल, पण पुढे जाऊन मी आणखी चांगले करू शकतो.
हे ही वाचा -