Mohammed Shami Sacrifice Biryani : टीम इंडियात पुन्हा स्थान मिळवण्यासाठी मोहम्मद शमीचं मोठं 'बलिदान'; कोचने सांगितली इनसाईड स्टोरी
2025 च्या चॅम्पियन्स ट्रॉफीसाठी टीम इंडियाची घोषणा करण्यात आली आहे, ज्यामध्ये वेगवान गोलंदाज मोहम्मद शमीने अखेर पुनरागमन केले आहे.
Mohammed Shami Sacrifice Biryani : 2025 च्या चॅम्पियन्स ट्रॉफीसाठी टीम इंडियाची घोषणा करण्यात आली आहे, ज्यामध्ये वेगवान गोलंदाज मोहम्मद शमीने अखेर पुनरागमन केले आहे. फिटनेसच्या समस्येमुळे शमी बराच दिवसापासून संघाबाहेर होता. पण आता तो तंदुरुस्त झाला आहे आणि संघात परतला आहे. दरम्यान बंगालचे वेगवान गोलंदाजी प्रशिक्षक शिव शंकर पॉल यांनी मोहम्मद शमीबद्दल मोठा खुलासा केला आहे. संघात पुनरागमन करण्यासाठी त्याने किती त्याग केले हे सांगितले आहे.
बंगालचे वेगवान गोलंदाजी प्रशिक्षक शिव शंकर पॉल म्हणाले की, ' खरंतर, वेगवान गोलंदाजांना दुखापतीतून सावरण्यासाठी खूप वेळ लागतो. पण शमी पुनरागमन करण्यासाठी इतका उत्सुक होता की सामना संपल्यानंतरही 30 ते 45 मिनिटे अधिक गोलंदाजी करत होता. देशांतर्गत टी-20 सामन्यांमध्ये सामन्याच्या दिवशी सकाळी 6 वाजता संघातील इतर खेळाडूंआधी मैदानावर पोहोचणारा तो पहिला खेळाडू होता.
तुम्ही शमीकडून अनेकदा ऐकले असेल की त्याला बिर्याणी खूप आवडते आणि तो ती अनेकदा खातो. पण टीम इंडियामध्ये पुनरागमन करण्यासाठी मोहम्मद शमीने त्याची आवडती बिर्याणी खाणे सोडून होते. प्रशिक्षक म्हणाले की, फिटनेस मिळवण्यासाठी शमीने गेल्या 2 महिन्यांपासून बिर्याणीला स्पर्शही केलेला नाही. तो खूप कडक आहार घेत होता. मी त्याला दिवसातून फक्त एकदाच जेवताना पाहिले. त्याला बिर्याणी खूप आवडते, पण तो पुन्हा खेळायला आल्यापासून गेल्या दोन महिन्यांत मी त्याला बिर्याणी खाताना पाहिलेले नाही.
चॅम्पियन्स ट्रॉफी संघात शमीचा समावेश
याआधी शमीने देशांतर्गत क्रिकेटद्वारे व्यावसायिक क्रिकेटमध्ये पुनरागमन केले होते. गेल्या वर्षी नोव्हेंबरमध्ये, भारतीय वेगवान गोलंदाजाने बंगालसाठी स्थानिक क्रिकेट खेळण्यास सुरुवात केली. शमीने बंगालकडून रणजी ट्रॉफी सामने खेळून आपल्या कारकिर्दीची सुरुवात केली. यानंतर तो सय्यद मुश्ताक अली ट्रॉफी आणि विजय हजारे ट्रॉफी खेळला.
जवळजवळ दीड वर्षानंतर मोहम्मद शमी अखेर टीम इंडियामध्ये परतला आहे. 2025 च्या चॅम्पियन्स ट्रॉफीसाठी निवडलेल्या संघात त्याचा समावेश करण्यात आला आहे. आता या मेगा स्पर्धेत जसप्रीत बुमराह आणि मोहम्मद शमी ही वेगवान जोडी बऱ्याच काळानंतर एकत्र दिसणार आहे. याआधी शमी इंग्लंडविरुद्ध खेळल्या जाणाऱ्या एकदिवसीय मालिकेतही अॅक्शन करताना दिसणार आहे.
हे ही वाचा -