Mohammad Amir CPL 2024: पाकिस्तानचा गोलंदाज मोहम्मद अमीरने (Mohammad Amir) आतापर्यंत अनेक सामन्यांमध्ये चमकदार कामगिरी केली आहे. त्याने आंतरराष्ट्रीय तसेच देशांतर्गत क्रिकेटमध्ये चांगली कामगिरी केली आहे. सध्या मोहम्मद आमीर कॅरेबियन प्रीमियर लीग 2024 मध्ये खेळत आहे. या लीगच्या एका सामन्यात त्याने टीम इंडियाचा वेगवान गोलंदाज भुवनेश्वर कुमारचा (Bhuvneshwar Kumar) विक्रम मोडला.


मोहम्मद आमीरने (Mohammad Amir) टी-20 फॉरमॅटमध्ये सर्वाधित निर्धाव (Maiden Over) षटक टाकण्याच्या यादीत भुवनेश्वर कुमारला मागे टाकले आहे. टी-20 मध्ये सर्वाधिक निर्धाव षटक टाकण्याचा विक्रम वेस्ट इंडिजच्या सुनील नरेनच्या नावावर आहे. सुनील नरेनने 522 सामन्यांमध्ये 30 निर्धाव षटके टाकली आहेत. तर बांगलादेशचा शाकिब अल हसन दुसऱ्या स्थानावर आहे. शाकिबने 444 सामन्यात 26 निर्धाव षटके टाकली आहेत.


मोहम्मद आमीरने भुवनेश्वर कुमारला टाकलं मागे-


निर्धाव षटके टाकण्याच्या यादीत भुवनेश्वर कुमार तिसऱ्या क्रमांकावर होता. मात्र आता मोहम्मद आमिर तिसरा क्रमांक पटकावला आहे. मोहम्मद आमिरने 302 सामन्यात 25 षटकं टाकली आहेत. तर भुवनेश्वर कुमारने 286 सामन्यात 24 निर्धाव षटके टाकली आहेत. भारतीय संघाचा वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराह पाचव्या स्थानावर आहे. जसप्रीत बुमराहने 233 सामन्यात 22 निर्धाव षटके टाकली आहेत.


सामना कसा राहिला?


कॅरेबियन प्रीमियर लीगमध्ये बार्बाडोस रॉयल्स आणि अँटिग्वा यांच्यात सामना खेळवण्यात आला. मोहम्मद आमीर अँटिग्वाच्या संघात आहे. या सामन्यात अँटिग्वाने प्रथम फलंदाजी करताना 20 षटकांत 5 विकेट्स गमावून 176 धावा केल्या. तर जस्टिन ग्रेव्हजने 61 धावा केल्या. सॅम बिलिंग्सने 56 धावांची खेळी खेळली. प्रत्युत्तरात बार्बाडोसचा संघ केवळ 127 धावा करू शकला. पण तरीही बार्बाडोसने डकवर्थ लुईस नियमानूसार हा सामना 10 धावांनी जिंकला. या सामन्यात मोहम्मद आमीरने 2.3 षटके टाकली. यादरम्यान त्याने 11 धावा दिल्या आणि एक निर्धाव षटक टाकले. मोहम्मद आमिरच्या आतापर्यंतच्या कारकिर्दीवर नजर टाकली तर ती कमालीची आहे. मोहम्मद आमीरने 302 टी-20 सामन्यात 347 विकेट्स घेतल्या आहेत. मोहम्मद आमीरने 62 टी-20 आंतरराष्ट्रीय सामन्यांमध्ये 71 विकेट्स घेतल्या आहेत. आमिरने 61 एकदिवसीय सामनेही खेळले आहेत. या एकदिवसीय सामन्यात त्याने 81 विकेट्स घेतल्या आहेत. तर 36 कसोटी सामन्यात मोहम्मद आमीरने 119 विकेट्स पटकावल्या आहेत.






संबंधित बातमी:


...अन् पंतप्रधान नरेंद्र मोदी थेट खाली बसले; सर्वांचे मन जिंकले, नेमकं काय घडलं?, पाहा Video