मायकेल वॉन मुंबईत गल्ली क्रिकेट खेळला; तो चेंडू पाहून कसोटी खेळपट्टीसोबत केली तुलना, Video
Michael Vaughan News Marathi News: इंग्लंडचा माजी कर्णधार मायकेल वॉन याचाही गल्ली क्रिकेट खेळतानाचा एक व्हिडीओ सध्या व्हायरल होत आहे.
Michael Vaughan News Marathi News: दरवर्षी इंडियन प्रीमिअर लीगच्या (आयपीएल 2024) काळात अनेक परदेशी खेळाडू गल्ली क्रिकेट खेळताना पाहायला मिळतात. गतवर्षी एबी डिव्हिलीएर्सचा असाच एक गल्ली क्रिकेट खेळणार व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला होता. याचदरम्यान इंग्लंडचा माजी कर्णधार मायकेल वॉन याचाही गल्ली क्रिकेट खेळतानाचा एक व्हिडीओ सध्या व्हायरल होत आहे.
सध्या आयपीएलच्या 17व्या पर्वाचा थरार रंगला आहे. देश विदेशातील माजी खेळाडू देखील विविध माध्यमांतून या स्पर्धेशी जोडले गेले आहेत. यामध्ये मायकेल वॉन देखील सामील आहे. भारतातल्या अनेक ठिकाणी वेळ काढून मायकेल वॉन फिरताना दिसून येत आहे. यातच त्याने काल मुंबईतल्या गल्ली क्रिकेटचा आनंद घेतला. याचा व्हिडीओ देखील त्याने सोशल मीडियाद्वारे शेअर केला आहे. वॉनचा हा व्हिडीओ आता मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे.
Kids just so happy to play the game anywhere in #Mumbai … surely it should be one hand one bounce of the motorbike … #India pic.twitter.com/l3RvfH944h
— Michael Vaughan (@MichaelVaughan) April 3, 2024
सोशल मीडियावर व्हायरल होत असलेल्या व्हिडीओमध्ये इंग्लंडचा माजी कर्णधार मायकेल वॉन हा देशाची आर्थिक राजधानी मुंबईत गल्ली क्रिकेट खेळताना दिसत आहे. मायकल वॉन लहान मुलांसोबत गल्ली क्रिकेट खेळत असून एक चिमुकला त्याला गोलंदाजी करत आहे. व्हिडीओ शेअर करताना मायकेल वॉनने एक भन्नाट कॅप्शन दिले. मायकेल वॉनने भन्नाट कॅप्शन देत म्हटले की, मुंबईत लहानग्यांसोबत क्रिकेट खेळून आनंद वाटला... कसोटी सामन्यांमधील आणि येथील खेळपट्टी समान आहे.
Loved playing with the kids in #Mumbai .. similar pitch to the Test pitches 😜😜 #India pic.twitter.com/Z3R1zsoSlN
— Michael Vaughan (@MichaelVaughan) April 3, 2024
कोण आहे मायकेल वॉन?
मायकेल पॉल वॉन (जन्म 29 ऑक्टोबर 1974) हा एक इंग्लिश क्रिकेट समालोचक आणि माजी क्रिकेटपटू आहे ज्याने खेळाचे सर्व स्वरूप खेळले. त्याने 2003 ते 2008 पर्यंत कसोटी संघाचा इंग्लंडचा कर्णधार, 2003 ते 2007 पर्यंत एकदिवसीय आंतरराष्ट्रीय संघाचा कर्णधार आणि 2005 ते 2007 पर्यंत इंग्लंडचा पहिला टी-20 कर्णधार म्हणून काम केले.
संबधित बातम्या:
18 वर्षांच्या अंगक्रिश रघुवंशीने दिल्लीला अस्मान दाखवलं; आई-वडिलांनी केलंय भारताचं प्रतिनिधित्व
आंद्रे रसेलची पत्नी आहे सुपरमॉडेल; सोशल मीडियावर नेहमी असते चर्चेत, Photos