एक्स्प्लोर

क्रिकेटपटू शेन वॉर्नच्या आकस्मिक मृत्यूशी कोविड लसीचा संबंध? एका अहवालात डॉक्टरांचा खळबळजनक दावा

Cricketer Shane Warne News: फिरकीचा जादूगार शेन वॉर्नचा मृत्यू हृदयविकाराच्या झटक्यामुळे झाला होता. पण त्यासाठी त्यानं घेतलेली कोरोना लस जबाबदार असल्याचं डॉक्टरांनी एका अहवालात म्हटलं आहे.

Shane Warne Death Reason : ऑस्ट्रेलियन क्रिकेट संघाचा माजी लेगस्पिनर, फिरकीचा जादूगार म्हणून ओळखला जाणारा शेन वॉर्न (Shane Warne) याच्या मृत्यूवरुन अनेक प्रश्न उपस्थित झालेत. आता पुन्हा एकदा त्याच्या मृत्यूवरुन चर्चा रंगल्या आहेत. वॉर्नच्या मृत्यूशी संबंधित एक धक्कादायक अहवाल समोर आला आहे. शेन वॉर्नच्या मृत्यूचं कारण कोरोनाची लस असू शकते, असा दावा डॉक्टरांनी केला आहे. ऑस्ट्रेलियाचा माजी फिरकीपटू शेन वॉर्ननं कोरोनाची जी लस घेतली होती, त्यामुळे हृदयाशी संबंधित अनेक आजार जडण्याचा धोका असल्याचं डॉक्टरांनी अहवालात म्हटलं आहे. दरम्यान, दिग्गज क्रिकेटर शेन वॉर्नचा मृत्यू हृदयविकाराचा झटका येऊन झाला होता. 

विशेष म्हणजे, शेन वॉर्नला थायलंडमध्ये हृदयविकाराचा झटका आला होता. मृत्यूच्या सुमारे 9 महिने आधी त्यानं कोरोना प्रतिबंधक लस घेतली होती. शेन वॉर्नला मिळालेली कोरोना लस हृदयाशी संबंधित आजार वाढवते, असा दावा या अहवालात करण्यात आला आहे. एक ऑस्ट्रेलियन डॉक्टर आणि भारतीय वंशाच्या ब्रिटिश कार्डिओलॉजिस्टनी या अहवालात शेन वॉर्नच्या मृत्यूचं कारण कोरोनाची लस असू शकते, असं म्हटलं आहे.

शेन वॉर्नला COVID mRNA लस मिळाली होती. या लसीमुळे हृदयविकाराचा झटका येण्याची शक्यता अधिक वाढते. वॉर्नला त्याच्या मृत्यूच्या सुमारे 9 महिने आधी ही लस देण्यात आली होती. हृदयरोगतज्ज्ञ डॉ. असीम मल्होत्रा ​​आणि डॉ. ख्रिस नील यांनी सांगितलं की, कोविड mRNA लसीमुळे कोरोनरी रोगाचा झपाट्यानं प्रसार होऊ शकतो. विशेषत: ज्यांना आधीच हृदयाशी संबंधित आजार आहेत, त्यांना लस घेतल्यानंतर धोका अधिक वाढतो. 

डॉक्टर मल्होत्रा यांनी बोलताना सांगितलं की, "ऑस्ट्रेलियाचा माजी खेळाडू शेन वॉर्नला वयाच्या 52 व्या वर्षी अचानक हृदयविकाराचा झटका आला होता. त्यामुळे त्याचा मृत्यू झाला होता. दरम्यान, सर्वांनाच माहीत आहे की, शेन वॉर्नची लाईफस्टाईल तशी फारशी हेल्दी नव्हती. वॉर्न स्मोकिंग करत असे आणि त्याचं वजनही जास्त होतं. माझ्या वडिलांचा मृत्यूही फायझर वॅक्सिनचे दोन डोस घेतल्यानंतर झाला होता. एवढंच नाहीतर त्यांच्या हृदयाशी संबंधित समस्यांमध्ये वॅक्सिन घेतल्यानंतर वेगानं वाढ झाली होती."

शेन वॉर्नची कारकीर्द

जगातील अव्वल दर्जाचा फिरकीपटू तसंच एक दिग्गज कर्णधार अशी शेन वॉर्नची ख्याती आहे. ऑस्ट्रेलियाकडून (Australia Cricket) अनेक वर्ष क्रिकेट खेळलेला वॉर्न क्रिकेट जगतात बहुतेक सर्वांना माहित आहे. वॉर्नने 145 कसोटी सामन्यात 708 विकेट्स घेतल्या आहेत. तर 194 एकदिवसीय सामन्यात 293 गड्यांना माघारी धाडलं आहे. याशिवाय 55 आयपीएल सामन्यात वॉर्नने 57 विकेट मिळवले आहेत.  सचिनचा कट्टर प्रतिस्पर्धी असणारा शेन भारतीय क्रिकेटमध्येही चांगलाच सक्रीय होता. सर्वात पहिली आयपीएल ट्रॉफी शेन कर्णधार असणाऱ्या  राजस्थान रॉयल्सनेच उचलली होती. मुरलीधरननंतर वॉर्न हा दुसरा गोलंदाज आहे ज्याने 708 विकेट घेतल्या आहेत. 2007 साली वॉर्ननं क्रिकेटमधून निवृत्ती घेतली. वॉर्ननं क्रिकेटमधील प्रत्येक फॉर्मेटमध्ये आपली छाप सोडली आहे. 

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

China Nuclear Submarine : चीनमधील ज्या वुहानमधून जगात कोरोना गेला, त्याच वुहानमध्ये पुन्हा धडकी भरली; अमेरिकेचा सुद्धा गंभीर आरोप!
चीनमधील ज्या वुहानमधून जगात कोरोना गेला, त्याच वुहानमध्ये पुन्हा धडकी भरली; अमेरिकेचा सुद्धा गंभीर आरोप!
Nitin Gadkari: मुलाचं ऑपरेशन, बायकोने थांबवलं, पण नितीन गडकरी सगळं सोडून 'त्या' कार्यक्रमासाठी पोहोचलेच
मुलाचं ऑपरेशन, बायकोने थांबवलं, पण नितीन गडकरी सगळं सोडून 'त्या' कार्यक्रमासाठी पोहोचलेच
Eknath Khadse : खडसेंना पक्षाने स्वीकारलं असलं तरी मी स्वीकारणार नाही; राष्ट्रवादीतील बड्या नेत्याच्या वक्तव्याने नाथाभाऊंची चिंता वाढवली
खडसेंना पक्षाने स्वीकारलं असलं तरी मी स्वीकारणार नाही; राष्ट्रवादीतील बड्या नेत्याच्या वक्तव्याने नाथाभाऊंची चिंता वाढवली
Haribhau Bagde: हरिभाऊ बागडे राष्ट्रपती होणार? भाजप नेत्याची नितीन गडकरींकडे मागणी, राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण
हरिभाऊ बागडे राष्ट्रपती होणार? भाजप नेत्याची नितीन गडकरींकडे मागणी, राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Maharashtra Superfast News : महाराष्ट्र सुपरफास्ट बातम्यांचा आढावा : 04 PM 27 Sept 2024ABP Majha Headlines : 04 PM: 27 Sept 2024 : Maharashtra News :  एबीपी माझा हेडलाईन्सSanjay Shirsat Mumbai : राऊतांवर दलाल नंबर 1 पिक्चर यायला हवा, शिरसाटांचा टोलाDevendra Fadanvis Shirdi Speech : साईनगरीत लाडकी बहीण योजनेचा कार्यक्रम; देवेंद्र फडणवीस यांचं भाषण

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
China Nuclear Submarine : चीनमधील ज्या वुहानमधून जगात कोरोना गेला, त्याच वुहानमध्ये पुन्हा धडकी भरली; अमेरिकेचा सुद्धा गंभीर आरोप!
चीनमधील ज्या वुहानमधून जगात कोरोना गेला, त्याच वुहानमध्ये पुन्हा धडकी भरली; अमेरिकेचा सुद्धा गंभीर आरोप!
Nitin Gadkari: मुलाचं ऑपरेशन, बायकोने थांबवलं, पण नितीन गडकरी सगळं सोडून 'त्या' कार्यक्रमासाठी पोहोचलेच
मुलाचं ऑपरेशन, बायकोने थांबवलं, पण नितीन गडकरी सगळं सोडून 'त्या' कार्यक्रमासाठी पोहोचलेच
Eknath Khadse : खडसेंना पक्षाने स्वीकारलं असलं तरी मी स्वीकारणार नाही; राष्ट्रवादीतील बड्या नेत्याच्या वक्तव्याने नाथाभाऊंची चिंता वाढवली
खडसेंना पक्षाने स्वीकारलं असलं तरी मी स्वीकारणार नाही; राष्ट्रवादीतील बड्या नेत्याच्या वक्तव्याने नाथाभाऊंची चिंता वाढवली
Haribhau Bagde: हरिभाऊ बागडे राष्ट्रपती होणार? भाजप नेत्याची नितीन गडकरींकडे मागणी, राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण
हरिभाऊ बागडे राष्ट्रपती होणार? भाजप नेत्याची नितीन गडकरींकडे मागणी, राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण
Devendra Fadnavis : मंत्रालयात उपमुख्यमंत्र्यांच्या कार्यालयाबाहेर तोडफोड, देवेंद्र फडणवीसांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, कोणी जाणीवपूर्वक...
मंत्रालयात उपमुख्यमंत्र्यांच्या कार्यालयाबाहेर तोडफोड, देवेंद्र फडणवीसांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, कोणी जाणीवपूर्वक...
Sangli News : कवठेमहांकाळच्या माजी उपनगराध्यक्षांना घरात घुसून बेदम मारहाण; माजी खासदार संजय पाटलांवर मारहाण केल्याचा राष्ट्रवादीचा आरोप
कवठेमहांकाळच्या माजी उपनगराध्यक्षांना घरात घुसून बेदम मारहाण; माजी खासदार संजय पाटलांवर मारहाण केल्याचा राष्ट्रवादीचा आरोप
Pune Gang Rape : पुण्यात धनदांडग्या बापांच्या पोरांच्या विकृतीचा कळस; प्राध्यापकाच्या मुलीवर सामूहिक अत्याचार करत नग्नावस्थेत फोटो आणि व्हिडीओ इन्स्टाला टाकले
पुण्यात विकृतीचा कळस; प्राध्यापकाच्या मुलीवर सामूहिक अत्याचार करत नग्नावस्थेत फोटो आणि व्हिडीओ इन्स्टाला टाकले
Pune Crime News: फिल्मी स्टाईलने गुन्हेगाराला अटक करायला गेले पण...; आरोपीने पिंपरीच्या एपीआयच्या अंगावर घातली कार, जयपूरमधील थरार CCTVमध्ये कैद
फिल्मी स्टाईलने गुन्हेगाराला अटक करायला गेले पण...; आरोपीने पिंपरीच्या एपीआयच्या अंगावर घातली कार, जयपूरमधील थरार CCTVमध्ये कैद
Embed widget