माजी कर्णधार राहुल द्रविडला (Rahul Dravid) भारतीय संघाचा मुख्य प्रशिक्षक केल्यानंतर बीसीसीआयनं (BCCI) आणखी एका माजी खेळाडूला नवी जबाबदारी दिली आहे. राहुल द्रविडनं मुख्य प्रशिक्षकाचं पद सांभाळल्यानंतर राष्ट्रीय क्रिकेट अकादमी म्हणजेच एनसीएमधील अध्यक्षपद रिकामं झालं होतं. या जागेवर आता माजी क्रिकेटपटू व्ही.व्ही. एस लक्ष्मणची (vvs laxman) निवड करण्यात आली आहे. बीसीसीआय अध्यक्ष सौरव गांगुली (Sourav Ganguly) यांनी याबाबतची माहिती दिली आहे. एएनआयसोबत बोलताना गांगुलीनं लक्ष्मण एनसीएचं अध्यक्षपद सांभाळणार असल्याचं सांगितलं. भारत अ संघाच्या दक्षिण आफ्रिका दौऱ्यानंतर लक्ष्मण एनसीएची सुत्रे सांभाळण्याची शक्यता आहे.  लक्ष्मण भारत अ, अंडर-19 आणि एनसीएची जबाबदारी स्विकारण्याची शक्यता आहे. तर न्यूझीलंड दौऱ्यापासून राहुल द्रविड मुख्य प्रशिक्षक म्हणून पदभार स्विकारणार आहे. 


बीसीसीआय अध्यक्ष सौरव गांगुली आणि सचिव जय शाह यांच्या मते द्रविडचा वारसा चालवण्यासाठी द्रविडसारख्याच एखादा माजी खेळाडू हवा. सौरव गांगुलीनं लक्ष्मणसोबत दीर्घ बातचीत करुन त्याला तयार केलं. द्रविड आणि लक्ष्मण यांच्यात बऱ्याच गोष्टींमध्ये साम्य आहे. शिवाय, दोघांचं ट्युनिंगही उत्तम आहे. द्रविड आणि लक्ष्मण जोडीमुळे बोर्ड आणि एनसीएमधील ताळमेळ उत्तम होईल, अशी अशा गांगुलीला आहे. लक्ष्मणशिवाय अन्य स्टाफही लवकरात लवकर भरला जाणार आहे. कारण, दोन महिन्यानंतर अंडर-19 विश्वचषक होणार आहे.   


एनसीएचं अध्यक्षपद स्विकारल्यानंतर लक्ष्मणला हैदराबादवरुन बंगळरुला शिफ्ट व्हावं लागेल. तसेच इतर अन्य ठिकाणावरुनही राजीनामा द्यावा लागणार आहे. लक्ष्मण सध्या आयपीएलमध्ये हैदराबाद संघाचा मँटोर म्हणून काम पाहतोय. तसेच आंतरराष्ट्रीय सामन्यात समालोचक म्हणूनही लक्ष्मण काम करतो. एनसीएचं अध्यक्षपद स्विकारल्यानंतर लक्ष्मणला या सर्वांना अलविदा म्हणावं लागेल.  






Rahul Dravid : 'तो माझ्यासाठी अभिमानाचा क्षण नव्हता'; राहुल द्रविड जेव्हा चिडून टोपी फेकतो....


सचिन, गांगुली, लक्ष्मणचा लेटरबॉम्ब, रवी शास्त्रींवर नाराजी?


कोहली मारत होता, तेव्हा धोनी शांत का होता?: VVS लक्ष्मण