World Badminton Championship 2022: बर्मिंगहॅम येथे पार पडलेल्या कॉमनवेल्थ स्पर्धेत देशासाठी सुवर्णपदक जिंकणाऱ्या लक्ष्य सेनची (Lakshya Sen) विजयी घौडदौड सुरुच आहे. टोकियोमध्ये सुरु असलेल्या बीडब्लूएफ जागतिक बॅडमिंटन चॅम्पियनशिपमध्ये लक्ष्य सेननं विजयानं स्पर्धेची सुरुवात केलीय. बीडब्लूएफ जागतिक बॅडमिंटन चॅम्पियनशिपच्या पुरुष एकेरीच्या पहिल्या फेरीत लक्ष्य सेननं डेन्मार्कच्या हंस-क्रिस्टियन विटिंगसचा (Hans-Kristian Vittinghus) 21-12, 21-11 असा पराभव केलाय. या विजयासह त्यानं पुरुष एकेरीच्या दुसऱ्या फेरीत प्रवेश केलाय. 


एएनआयचं ट्वीट-



अश्विनी पोनप्पा- एन सिक्की रेड्डी जोडीची विजयी सुरुवात 
भारताच्या आघाडीच्या बॅडमिंटनपटू अश्विनी पोनप्पा आणि एन सिक्की रेड्डी यांनी महिला दुहेरीच्या दुसऱ्या फेरीत मालदीवच्या अमिनाथ नबिहा अब्दुल रज्जाक आणि फातिमाथ नबाहा अब्दुल रज्जाक यांचा 21-7 आणि 21-9 च्या फरकाने पराभव केला आहे. आता अश्विनी आणि सिक्की यांना दुसऱ्या फेरीत चीनच्या चेन किंग चेन आणि जिया यी फॅन यांचा सामना करावा लागणार आहे.


जर्मनीविरुद्ध तनीषा क्रास्टो आणि ईशान भटनागर जोडीचा विजय
भारताची मिश्र जोडी तनीषा क्रास्टो आणि ईशान भटनागर यांनी मिश्र दुहेरीमध्ये जर्मनीच्या पॅट्रिक स्कील आणि फ्रांजिस्का वोल्कमॅन यांना 29 मिनिटं चाललेल्या सामन्यात 21-13 आणि 21-13 अशा फरकाने मात देत स्पर्धेची दमदार सुरुवात केली आहे. यानंतर आता भारताची ही मिश्र जोडी पुढील फेरीत थायलंडच्या सुपक जोमकोह आणि सुपिसारा पावसमप्रान यांच्याशी सामना करावा लागणार आहे.


मालविका बनसोड पहिल्याच फेरीतून बाहेर
बी सुमित रेड्डी आणि मनू अत्री यांना पुरुष दुहेरीत मासायुकी ओनोदेरा आणि हिरोकी ओकामुरा यांच्याकडून 11-21, 21-19, 15-21 असा पराभव पत्करावा लागला. महिला एकेरीत मालविका बनसोडनंही डेन्मार्कच्या लेन क्रिस्टोफरसनचा पहिल्या फेरीत 14-21, 12-21 असा पराभव केला.


हे देखील वाचा-