Pakistan tour Of Netherlands: तीन सामन्यांची एकदिवसीय मालिकेत खेळण्यासाठी नेदरलँड्सच्या दौऱ्यावर गेलेल्या पाकिस्तानच्या संघानं 3-0 असा विजय मिळवला. दरम्यान, या मालिकेतील तिसऱ्या आणि शेवटच्या सामन्यात पाकिस्तानच्या फलंदाजांनी पाकिस्तानच्या संघाला अडचणीत टाकलं होतं. कर्णधार बाबर आझमशिवाय (Babar Azam) कोणत्याही फलंदाजाला 30 धावांचा टप्पा गाठता आला नाही. पाकिस्तानचा संपूर्ण संघ 206 धावांत गारद झाला. परंतु, पाकिस्तानच्या गोलंदाजांनी भेदक गोलंदाजी करत संघाला विजय मिळवून दिला. पाकिस्तानच्या विजयात नसीम शाहनं मोलाचा वाटा उचलला. त्यानं 10 षटकात 33 धावा देऊन नेदरलँड्सच्या पाच फलंदाजांना माघारी धाडलं. या सामन्यात संथ खेळी करणाऱ्या बाबरच्या नावावर नकोशा विक्रमांची नोंद झालीय. 


बाबर आझमनं 2017 पासून 80 च्या स्ट्राईक रेटनं सर्वाधिक वेळा 90 किंवा त्याहून अधिक धावा करणारा फलंदाज ठरलाय.नेदरलँड्सविरुद्ध अखरेच्या एकदिवसीय सामन्यात त्यानं 72.80 च्या स्ट्राईक रेटनं फलंदाजी केलीय. या यादीत वेस्ट इंडीजचा शाई होप दुसऱ्या क्रमांकावर आहे. तर, न्यूझीलंडचा कर्णधार केन विल्यमसन तिसऱ्या क्रमांकावर आहे. महत्वाचं म्हणजे, भारताचा माजी कर्णधार विराट कोहली त्याच्या संपूर्ण कारकिर्दीत कधीच 80 च्या स्ट्राईक रेटनं 90 किंवा त्यापेक्षा अधिक धावा केल्या नाहीत. 


80 स्ट्राईक रेटनं 90+ धावा करणारे फलंदाज (2017 पासून)
1) बाबर आझम- 4 
2) शाई होप- 4
3) केन विल्यमसन- 2
4) काइल कोएत्जेर- 2


बाबर आझमची एकदिवसीय क्रिकेटच्या मागील 10 डावातील कामगिरी
बाबर आझमनं एकदिवसीय क्रिकेटच्या मागील 10 डावात 837 धावा केल्या आहेत. यादरम्यान त्यानं नऊ वेळा 50 पेक्षा अधिक धाव केल्या आहेत. विराट कोहलीनं एकदिवसीय क्रिकेटमध्ये सलग 10 डावात पाच वेळा 800 हून अधिक धावा केल्या आहेत. त्यानं 2018 मध्ये 900 धावांचा आकडाही गाठला होता. या यादीत ऑस्ट्रेलियाचा तडाखेबाज फलंदाज डेव्हिड वार्नरनं सलग 10 डावात 857 धावा केल्या आहेत. 


एकदिवसीय क्रिकेटमधील सलग 10 डावात सर्वाधिक धावा करणारे फलंदाज-
1) विराट कोहली - 995 धावा
2) विराट कोहली - 896 धावा
3) विराट कोहली - 889 धावा
4) विराट कोहली - 860 धावा
5) डेविड वार्नर - 857 धावा
6) विराट कोहली - 850 धावा
7) बाबर आजम - 837 धावा


हे देखील वाचा-