India tour of Zimbabwe: भारत आणि झिम्बाब्वे (IND vs ZIM) यांच्यात आज तीन सामन्यांच्या एकदिवसीय मालिकेतील तिसरा आणि अखेरचा सामना खेळला जातोय. या सामन्यात नाणेफेक जिंकून भारतानं प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतलाय. या मालिकेतील पहिल्या दोन सामन्यात विजय मिळवत भारतानं मालिका अगोदरच खिशात घातलीय. तसेच तिसरा सामना जिंकून झिम्बाब्वेच्या संघाला क्लीन स्पीप देण्याचा भारताचा प्रयत्न असेल. या सामन्यात भारताच्या संघात दोन बदल करण्यात आले आहेत. वेगवान गोलंदाज मोहम्मद सिराज आणि प्रसिद्ध कृष्णाला विश्रांती देण्यात आलीय. तर, पहिल्या एकदिवसीय सामन्यात उत्कृष्ट प्रदर्शन करणाऱ्या दीपक चहरची संघात एन्ट्री झालीय. याशिवाय, आवेश खानलाही या सामन्यात संधी देण्यात आलीय.


कधी, कुठे पाहणार सामना?
भारत आणि झिम्बाब्वे यांच्यातील दुसरा एकदिवसीय सामना 22 ऑगस्टला सोमवारी खेळवला जाई. हा सामना हरारे स्पोर्ट्स क्लबमध्ये खेळवला जाईल. भारतीय वेळेनुसार दुपारी 12.45 वाजता सुरू होईल. याच्या अर्ध्यातासपूर्वी नाणेफेक होईल. भारत आणि झिम्बाब्वे यांच्यातील तिसऱ्या एकदिवसीय सामन्याचे लाईव्ह प्रसारण भारतात सोनी स्पोर्ट्स नेटवर्कवर पाहू शकता. तर, या सामन्याचे ऑनलाईन लाईव्ह स्ट्रीमिंग तुम्ही सोनी लिव्ह अॅपवर पाहू शकता. 


भारत-झिम्बाब्वे यांच्यातील हेड टू हेड रेकॉर्ड
भारत आणि झिम्बाब्वे यांच्यात आतापर्यंत 65 एकदिवसीय सामने खेळले गेले आहेत. यापैकी 53 सामन्यात भारतानं विजय मिळवलाय. तर, झिम्बाब्वेनं 10 सामने जिंकले आहेत. दोन्ही संघातील दोन एकदिवसीय सामने अनिर्णित ठरले आहेत. भारत आणि झिम्बाब्वे यांच्यात पहिला एकदिवसीय सामना 1983 मध्ये खेळण्यात आला होता. भारत आणि झिम्बाब्वे यांच्यात आतापर्यंत आठ द्विपक्षीय मालिका खेळल्या गेल्या आहेत. यातील सात मालिकेत भारतानं विजय मिळवलाय. तर, एक मालिका झिब्बाब्वेनं जिंकली आहे. झिम्बाब्वेने 1996-97 मध्ये भारताविरुद्ध खेळण्यात आलेल्या दोन सामन्यांच्या एकदिवसीय मालिकेत 1-0 असा विजय मिळवला होता. या मालिकेतील पहिला सामना झिम्बाब्वे आठ विकेट्सनं जिकंला होता. तर, दुसरा सामना रद्द झाला होता. 


संघ-


भारताची प्लेईंग इलेव्हन:
शिखर धवन, केएल राहुल (कर्णधार), शुभमन गिल, इशान किशन, दीपक हुडा, संजू सॅमसन (विकेटकिपर), अक्षर पटेल, शार्दुल ठाकूर, दीपक चहर, कुलदीप यादव, आवेश खान.


झिम्बाब्वेची प्लेईंग इलेव्हन:
ताकूदझ्वँनशी केईतानो, इनोसंट काया, टोनी मुनयोंगो, रेगीस चकाब्वा (कर्णधार), सिकंदर रझा, सिम विल्यम्स, रायन बुर्ल, ल्यूक जाँगवे, ब्रॅडली इवांस, व्हिक्टर एनवायुची,  रिचर्ड येनगारावा, 


हे देखील वाचा-