Praggnanandhaa vs Magnus Carlsen: अमेरिकेच्या मियामी येथे सुरु असलेल्या एफटीएक्स क्रिप्टो कपमध्ये भारताचा 17 वर्षीय बुद्धीबळपटू प्रज्ञानानंदनं (R Praggnanandhaa) पुन्हा एकदा वर्ल्ड चॅम्पियन मेग्नस कार्लसनचा (Magnus Carlsen) पराभव केलाय. प्रज्ञानानंद आणि कार्लसन यांच्यातील सामना अतिशय रोमांचक ठरला. या सामन्यातील टायब्रेकपर्यंत कार्लसनं विजयाच्या उंबरठ्यावर उभा होता. परंतु, सामन्याच्या अखेरिस त्याच्याकडून एक झाली आणि सामना प्रज्ञानानंदनं जिंकला.
प्रज्ञानानंद आणि कार्लसन यांच्यातील सामना शेवटच्या क्षणापर्यंत पाहण्यासारखा होता . या सामन्यात कोण विजय मिळवणार? हे शेवटच्या मिनिटापर्यंत विचारात टाकणार होतं. परंतु, प्रज्ञानानंदच्या शेवटच्या चालनं कार्लसनला चकित केलं. प्रज्ञानानंदनं त्याचा पराभव केलाय, याच्यावर त्याचा विश्वास बसत नव्हता. यानंतर त्यानं हळूच हेडफोन काढले आणि प्रज्ञानंदसोबत निघून गेला.
ट्वीट-
टुर्नामेंटमध्ये प्रज्ञानानंद दुसऱ्या क्रमांकावर
प्रज्ञानानंदनं वर्ल्ड चॅम्पियनला पराभूत केलंय. परंतु, त्यांच्या एकूण स्कोरच्या आधारावर ही स्पर्धा जिंकू शकला नाही. तो दुसऱ्या क्रमांकावर राहिला. मेग्नस कार्लसनचं विजेता ठरला. प्रज्ञानानंदनं या स्पर्धेची दमदार सुरुवात केली होती. या स्पर्धेत त्यानं सलग चार सामने जिंकले होते. परंतु, पाचव्या आणि सहाव्या राऊंडमध्ये त्याला पराभव स्वीकारावा लागला होता.
पुन्हा एकदा कार्लसनला नमवलं
यापूर्वी फेब्रुवारी महिन्यात एयरथिंग मास्टर्स रेपिड चेस टुर्नामेन्टमध्ये त्यानं मेग्नस कार्लसनचा पराभव केला होता. त्यानंतर मे महिन्यात चेसेबल मास्टर्स ऑनलाईन रेपिड चेस टुर्नामेंटमध्येही प्रज्ञानानंदनं कार्लसनचा पराभव केला होता.
प्रज्ञानंद भारतातील सर्वात तरूण ग्रँडमास्टर
प्रज्ञानानंद यांनी वयाच्या 12 वर्षे, 10 महिने आणि 13 दिवसांत ग्रँड मास्टरची पदवी प्राप्त केली. तो भारताचा सर्वात तरुण ग्रँड मास्टर आहे. त्याच वेळी, 2018 मध्ये, तो जगातील दुसरा सर्वात तरुण ग्रँडमास्टर होता. त्याच्या आधी केवळ युक्रेनचा सर्गेई करजाकिन हा 1990 मध्ये वयाच्या अवघ्या 12 व्या वर्षी ग्रँडमास्टर झाला होता.
हे देखील वाचा-