Kuldeep Yadav : कुलदीप यादवचा अचानक घेतलेला निर्णय चर्चेत; आफ्रिका दौऱ्यातच टीम इंडियाला सोडणार, BCCIकडे केली सुट्टीची मागणी
Kuldeep Yadav Marathi News : सुट्टीची परवानगी मिळाल्यास कुलदीप सीरीजच्या मध्यातच संघातून बाहेर जाऊ शकतात.

Kuldeep Yadav Requests Leave Wedding : टीम इंडियाचा स्टार फिरकीपटू कुलदीप यादव लवकरच विवाहबद्ध होणार आहे. याच कारणासाठी त्याने बीसीसीआयकडे काही दिवसांच्या सुट्टीची मागणी केली आहे. सध्या भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यातील कसोटी मालिकेला सुरुवात झाली असून त्यानंतर वनडे आणि टी20 सीरीजही खेळल्या जाणार आहेत. सुट्टीची परवानगी मिळाल्यास कुलदीप सीरीजच्या मध्यातच संघातून बाहेर जाऊ शकतात.
कुलदीपची BCCI कडे खास विनंती
‘टाईम्स ऑफ इंडिया’च्या अहवालानुसार, कुलदीप महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात लग्नाच्या तयारीत आहेत आणि त्यासाठी त्याने BCCI कडे रजा मागितली आहे. आयपीएल काही दिवसांनी पुढे ढकललं गेल्यामुळे त्यांचा लग्नाचा प्लॅन आधी रद्द झाला होता. आता परत योग्य वेळ मिळाल्याने ते लग्न करणार आहेत.
सूत्रांच्या माहितीनुसार, कुलदीपला नोव्हेंबरच्या शेवटच्या आठवड्यात सुट्टी हवी आहे. 22 नोव्हेंबरला गुवाहाटीत दुसरा कसोटी सामना होणार आहे. 30 नोव्हेंबरला रांची येथे पहिला वनडे होणार आहे, लग्नासाठी सुट्टी मिळाल्यास ते हे दोन्ही सामने मिस करू शकतात. कुलदीपची साखरपुडा त्याची मैत्रीण वंशिकासोबत झाला आहे. वंशिका एलआयसीमध्ये काम करते.
पहिल्या कसोटीमध्ये आतापर्यंत काय घडलं?
पहिल्या दिवसाच्या लंचपर्यंत दक्षिण आफ्रिकेने तीन विकेटांच्या मोबदल्यात 105 धावा केल्या आहेत. पहिल्या सत्रात एकूण 27 षटकांचा खेळ झाला. सध्या टोन डी जॉर्जी 15 धावांवर आणि वियान मुल्डर 22 धावांवर खेळत आहेत. भारताकडून जसप्रीत बुमराहने दोन विकेट घेतल्या, तर कुलदीप यादवने एक विकेट मिळवली.
जसप्रीत बुमराहने रेयान रिकेल्टन आणि एडेन मार्करम यांना पॅव्हिलियनचा रस्ता दाखवला. रिकेल्टन 23 धावा तर मार्करम 31 धावा करून बाद झाले. 11व्या षटकात बुमराहने रिकेल्टनला बोल्ड केले. त्यानंतर 13व्या षटकात मार्करमला विकेटकीपर ऋषभ पंतकडून झेलबाद करून घेतले. त्याचवेळी कुलदीप यादवने दक्षिण आफ्रिकेचा कर्णधार बावुमाला लेग स्लिपमध्ये ध्रुव जुरेलच्या हातून झेलबाद केले. बावुमा फक्त 3 धावा करू शकला.
Lunch on Day 1.
— BCCI (@BCCI) November 14, 2025
2⃣ wickets for Jasprit Bumrah and 1⃣ wicket for Kuldeep Yadav in an entertaining first session of the series 👌
We will be back soon with the 2nd session 👍
Scorecard ▶️ https://t.co/okTBo3qxVH#TeamIndia | #INDvSA | @IDFCFIRSTBank pic.twitter.com/G0rMk1w0dz
हे ही वाचा -




















