IND vs NZ 1st T20 : पृथ्वी शॉला संघात संधी मिळणार का? टी20 मालिकेसाठी कशी असेल भारताची प्लेईंग 11?
India vs New Zealand : भारत (Team India) आणि न्यूझीलंड (New Zealand) यांच्यातील T20 मालिकेतील पहिला सामना आज रांची येथे होणार असून बऱ्याच काळानंतर भारतीय संघात पृथ्वी शॉ याला संधी दिली आहे.
Team India Probable 11 : भारत (Team India) आणि न्यूझीलंड (IND vs NZ) यांच्यातील टी-20 मालिकेला आजपासून सुरुवात होत आहे. दोन्ही संघ पहिल्या सामन्यासाठी रांचीला पोहोचले आहेत. हार्दिक पांड्याच्या नेतृत्वाखाली टीम इंडिया मैदानात उतरणार असून युवा खेळाडूंना संधी यावेळी देण्यात आली आहे. विशेष म्हणजे, या मालिकेसाठी बऱ्याच काळानंतर भारतीय संघात पृथ्वी शॉ याला संधी दिली आहे. पृथ्वीचं बऱ्याच काळानंतर संघात पुनरागमन झालं आहे. काही वेळापासून त्याने देशांतर्गत सामन्यांमध्ये सातत्याने चांगली कामगिरी केली आहे. मात्र, असं असूनही पृथ्वीला प्लेइंग इलेव्हनमध्ये स्थान मिळण्याची शक्यता फारच कमी आहे. ऋतुराज गायकवाड (Ruturaj Gaikwad) याच्या दुखापतीची माहिती समोर येत असल्याने नेमकं चित्र नाणेफेकीनंतरचं स्पष्ट होईल.
भारत आणि न्यूझीलंड यांच्यातील तीन सामन्यांच्या मालिकेतील पहिला सामना आज रांची येथे होणार आहे. या सामन्यात भारत ईशान किशन आणि शुभमन गिल यांना सलामीची संधी देऊ शकतो. शुभमनने अलीकडच्या सामन्यांमध्ये चांगली कामगिरी केली आहे. तर ईशाननेही स्वत:ला सिद्ध केलं आहे. टीम इंडियात राहुल त्रिपाठीला नंबर 3 साठी संधी दिली जाऊ शकते. तर सूर्यकुमार यादव चौथ्या क्रमांकावर फलंदाजी करू शकतो. तसंच युवा खेळाडू जितेश शर्माला विकेटकीपिंगची संधी मिळू शकते.
दरम्यान, या सर्वांत पृथ्वी शॉला प्लेईंग इलेव्हनमध्ये स्थान मिळणं कठीण आहे. तसं पाहायला गेलं तर शॉ सध्या चांगल्या फॉर्मात आहे आणि त्याने देशांतर्गत सामन्यांमध्ये चांगली कामगिरी केली आहे. तो मुंबईकडून खेळला आणि आसामविरुद्धच्या सामन्यात त्याने 379 धावा केल्या. पण पृथ्वी 2021 नंतर टीम इंडियात पुनरागमन करू शकला नाही. जुलै 2021 मध्ये श्रीलंकेविरुद्ध शेवटचा टी-20 आंतरराष्ट्रीय सामना खेळला होता. हाही त्याचा पदार्पणाचा सामना होता. आज पृथ्वीला संधी मिळावी अशी आशा त्याच्या फॅन्सना आहे.
भारताची संभाव्य प्लेईंग इलेव्हन - ईशान किशन, शुभमन गिल, राहुल त्रिपाठी, सूर्यकुमार यादव (उपकर्णधार), हार्दिक पांड्या (कर्णधार), जितेश शर्मा (विकेटकीपर), दीपक हुडा, कुलदीप यादव, शिवम मावी, उमरान मलिक, अर्शदीप सिंग.
कधी, कुठे पाहू शकता सामना?
भारत विरुद्ध न्यूझीलंड टी20 सामन्याचं लाईव्ह टेलिकास्ट सोनी स्पोर्ट्स नेटवर्कच्या विविध चॅनलवर होईल. तसेच Sony Liv अॅपद्वारे या सामन्याचं लाईव्ह स्ट्रिमिंग पाहता येऊ शकतं. याशिवाय https://marathi.abplive.com/ येथेही तुम्हाला सामन्याचे अपडेट्स पाहता येतील.
महत्त्वाच्या इतर बातम्या :
IND vs NZ, T20 Live Streaming: आजपासून टी20 मालिकेला सुरुवात; कधी, कुठे पाहाल पहिला टी20 सामना?