एक्स्प्लोर

IND vs NZ, 3rd ODI, Pitch Report : इंदूरच्या होळकर मैदानात रंगणार तिसरा एकदिवसीय सामना, कशी असेल मैदानाची स्थिती? जाणून घ्या पिच रिपोर्ट

IND vs NZ : भारत आणि न्यूझीलंड यांच्यात सुरु तीन सामन्यांच्या एकदिवसीय मालिकेतील तिसरा सामना आज इंदूरच्या होळकर क्रिकेट स्टेडियमवर खेळवला जात आहे.

India vs New Zealand, 3rd ODI : भारत आणि न्यूझीलंड (IND vs NZ) यांच्यातील एकदिवसीय मालिकेतील अखेरचा सामना आज खेळवला जाणार आहे. तीन सामन्यांच्या मालिकेतील पहिला आणि दुसरा सामना भारताने जिंकत 2-0 अशी विजयी आघाडी घेतली आहे. आता तिसरा सामना आज दुपारी खेळवला जाणार आहे. मालिकेतील हा सामना इंदूरच्या होळकर क्रिकेट स्टेडियमवर खेळवला जाणार आहे. दरम्यान आजचा सामना भारताला जिंकून न्यूझीलंडला व्हाईट वॉश देता येईल तर न्यूझीलंडला सामना जिंकून मालिकेचा शेवट गोड करता येईल. यामुळे आजच्या महत्त्वाच्या सामन्यात मैदानाची खेळपट्टी (Pitch Report) कशी आहे अर्थात पिच रिपोर्ट जाणून घेऊ... 

सामना होणाऱ्या इंदूरच्या होळकर क्रिकेट स्टेडियमची खेळपट्टी फलंदाजीसाठी उपयुक्त आहे. याशिवाय येथील लहान चौकार फलंदाजांना खूप मदत करतात. वेगवान गोलंदाजांना देखील काही प्रमाणात मदत मिळते. मात्र धावा वाचवण्यासाठी गोलंदाजांना चांगलीच कसरत करावी लागणार आहे.  आतापर्यंत खेळलेल्या एकूण पाच एकदिवसीय सामन्यांमध्ये, नंतर फलंदाजी करणाऱ्या संघाने 3 वेळा विजय मिळवला आहे, तर प्रथम फलंदाजी करणाऱ्या संघाने दोनदा विजय मिळवला आहे. अशा परिस्थितीत नाणेफेक जिंकल्यानंतर गोलंदाजी करणे फायदेशीर असल्याने टॉस जिंकणारा संघ बोलिंग घेऊ शकतो. 

दमदार आहे भारताचा इंदूरमधील रेकॉर्ड

इंदूरच्या होळकर स्टेडियममध्ये भारताचाच दबदबा आजवर राहिला आहे. वनडेमध्ये भारतीय संघ आतापर्यंत एकही सामना हरलेला आहे. भारताने इंदूरमध्ये 5 पाच एकदिवसीय सामने खेळले आहेत. या सर्व सामन्यांमध्ये भारताने विजयाची नोंद केली आहे. इंदूर येथे पहिला एकदिवसीय सामना 15 एप्रिल 2006 रोजी खेळला गेला. त्यात भारताने इंग्लंडचा 7 गडी राखून पराभव केला. त्यानंतर पुढील चार सामन्यांत सलग विजय नोंदवण्यात टीम इंडियाला यश आलं आहे. या मैदानावर भारताने आतापर्यंत इंग्लंडला दोनदा तर वेस्ट इंडिज, दक्षिण आफ्रिका आणि ऑस्ट्रेलिया यांना प्रत्येकी एकदा पराभूत केलं आहे. न्यूझीलंडचा संघ इंदूरमध्ये प्रथमच एकदिवसीय सामना खेळणार आहे.

हे देखील वाचा-

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Tilak Varma : यंग ब्रिगेडचा धमाका सुरुच, संजूनंतर तिलक वर्माचं दक्षिण आफ्रिकेत शतक, रैना अन् शुभमन गिलचं रेकॉर्ड मोडलं
तिलक वर्माकडून दक्षिण आफ्रिकेच्या गोलंदाजांची धुलाई, शतक झळकावल अन् शुभमन गिलसह सुरेश रैनाचा विक्रम मोडला
विधानसभेची खडाजंगी: लातूरमध्ये शहरमध्ये अमित देशमुखांपुढे अर्चना पाटील चाकूरकरांचं आव्हान, कोण मारणार बाजी?  
विधानसभेची खडाजंगी: लातूरमध्ये शहरमध्ये अमित देशमुखांपुढे अर्चना पाटील चाकूरकरांचं आव्हान, कोण मारणार बाजी?  
शरद पवार यांच्याकडून आंबेगावच्या सभेत गद्दार असा उल्लेख,दिलीप वळसे पाटील यांचा मोठा निर्णय, थेट पत्रकार परिषद रद्द, नेमकं काय घडलं? 
शरद पवार यांच्या सभेनंतर होणारी पत्रकार परिषद दिलीप वळसे पाटील यांच्याकडून रद्द, नेमकं काय घडलं?
शरद पवारांबाबत बोलायलाच नको, भूमिका लाजते; बदलत्या भूमिकेवरुन राज ठाकरेंचा टोला
शरद पवारांबाबत बोलायलाच नको, भूमिका लाजते; बदलत्या भूमिकेवरुन राज ठाकरेंचा टोला
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Majha Gaon Majha Jilha : माझं गाव माझा जिल्हा: 7 AM :  14  नोव्हेंबर  2024 : ABP MajhaTop 100 : टॉप 100 : बातम्यांचा वेगवान  सुपरफास्ट आढावा : 6 AM :14नोव्हेंबर  2024 : ABP MajhaABP Majha Headlines :  6:30 AM : 14 नोव्हेंबर  2024 : Maharashtra News : ABP Majha एबीपी माझा हेडलाईन्सSpecial Report Maharashtra Mantri Bag Cheking : दादांच्या बॅगेत फराळ, इतरांच्या बॅगेत काय?

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Tilak Varma : यंग ब्रिगेडचा धमाका सुरुच, संजूनंतर तिलक वर्माचं दक्षिण आफ्रिकेत शतक, रैना अन् शुभमन गिलचं रेकॉर्ड मोडलं
तिलक वर्माकडून दक्षिण आफ्रिकेच्या गोलंदाजांची धुलाई, शतक झळकावल अन् शुभमन गिलसह सुरेश रैनाचा विक्रम मोडला
विधानसभेची खडाजंगी: लातूरमध्ये शहरमध्ये अमित देशमुखांपुढे अर्चना पाटील चाकूरकरांचं आव्हान, कोण मारणार बाजी?  
विधानसभेची खडाजंगी: लातूरमध्ये शहरमध्ये अमित देशमुखांपुढे अर्चना पाटील चाकूरकरांचं आव्हान, कोण मारणार बाजी?  
शरद पवार यांच्याकडून आंबेगावच्या सभेत गद्दार असा उल्लेख,दिलीप वळसे पाटील यांचा मोठा निर्णय, थेट पत्रकार परिषद रद्द, नेमकं काय घडलं? 
शरद पवार यांच्या सभेनंतर होणारी पत्रकार परिषद दिलीप वळसे पाटील यांच्याकडून रद्द, नेमकं काय घडलं?
शरद पवारांबाबत बोलायलाच नको, भूमिका लाजते; बदलत्या भूमिकेवरुन राज ठाकरेंचा टोला
शरद पवारांबाबत बोलायलाच नको, भूमिका लाजते; बदलत्या भूमिकेवरुन राज ठाकरेंचा टोला
अदानींचा काडीचाही संबंध नाही, अजित पवारांचं बीडमधून स्पष्टीकरण; मनोज जरांगेंबद्दलही बोलले
अदानींचा काडीचाही संबंध नाही, अजित पवारांचं बीडमधून स्पष्टीकरण; मनोज जरांगेंबद्दलही बोलले
विधानसभेची खडाजंगी : गेवराईत काका-पुतण्याच्या लढाईत कोण मारणार बाजी? मनसेसह अपक्ष लक्ष्मण पवारांचेही आव्हान
विधानसभेची खडाजंगी : गेवराईत काका-पुतण्याच्या लढाईत कोण मारणार बाजी? मनसेसह अपक्ष लक्ष्मण पवारांचेही आव्हान
Singham Again Worldwide BO Collection: सिंघमची बॉक्स ऑफिसवर डरकाळी, रचलेत 4 धमाकेदार रेकॉर्ड, 300 कोटींच्या क्लबमध्ये सामील होणारा अजयचा चौथा चित्रपट
सिंघमची बॉक्स ऑफिसवर डरकाळी, रचलेत 4 धमाकेदार रेकॉर्ड, 300 कोटींच्या क्लबमध्ये सामील होणारा अजयचा चौथा चित्रपट
Nana Patole on Devendra Fadnavis : आता नाना पटोलेंच्या बॅगची झाडाझडती; म्हणाले, 'मला फडणवीसांची कीव येते, नियम सगळ्यांना सारखा असेल, तर..'
आता नाना पटोलेंच्या बॅगची झाडाझडती; म्हणाले, 'मला फडणवीसांची कीव येते, नियम सगळ्यांना सारखा असेल, तर..'
Embed widget