ICC WTC Points Table : दक्षिण आफ्रिका-इंग्लंड मालिकेनंतर कशी आहे WTC गुणतालिका? भारताचा क्रमांक कितवा?
World Test Championship : दक्षिण आफ्रिका आणि इंग्लंड यांच्यात नुकत्याच पार पडलेल्या कसोटीमध्ये इंग्लंडनं दक्षिण आफ्रिकेला 9 विकेट्सने मात देत मालिका 2-1 ने आपल्या नावावर केली आहे.
WTC Points Table : कसोटी क्रिकेटचा विश्वचषक म्हणजेच वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप (WTC). या स्पर्धेची फायनल कोणते दोन संघ यंदा खेळणार, यासाठी वर्षभर विविध कसोटी सामने पार पडतात. दरम्यान आता नुकतीच पार पडलेली दक्षिण आफ्रिका विरुद्ध इंग्लंड (SA vs ENG) ही कसोटी मालिका पार पडली. अखेरच्या कसोटीमध्ये इंग्लंडनं दक्षिण आफ्रिकेला 9 विकेट्सने मात देत मालिका 2-1 ने आपल्या नावावर केली आहे. इंग्लंडच्या विजयामुळे WTC गुणतालिकेत बदल झाले आहेत.
इंग्लंडविरुद्धची मालिका गमावल्यानंतर दक्षिण आफ्रिकेचा संघ वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप पॉईंट टेबलमध्ये दुसऱ्या स्थानावर घसरला आहे. त्यामुळे आता ऑस्ट्रेलिया वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप पॉईंट टेबलमध्ये पहिल्या क्रमांकावर पोहोचली आहे. त्याच वेळी,तर WTC गुणतालिकेबद्दल बोलायचं तर, ऑस्ट्रेलिया, दक्षिण आफ्रिका आणि श्रीलंका या संघाचा टॉप-3 मध्ये समावेश आहे. त्यापाठोपाठ भारत, पाकिस्तान, वेस्ट इंडिज, न्यूझीलंड आणि बांग्लादेश यांचा क्रमांक लागतो. पण नेमके कोणते दोन संघ अंतिम सामना खेळणार हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे.
WTC गुणतालिकेत टॉपवर आहे ऑस्ट्रेलिया
वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप गुणतालिकेत ऑस्ट्रेलिया 70 टक्के गुणांसह अव्वल स्थानावर आहे. त्यापाठोपाठ दक्षिण आफ्रिकेचा क्रमांक लागतो. त्याचबरोबर टीम इंडियाचा विचार केला असता भारतीय संघ 52.08 गुणांसह चौथ्या क्रमांकावर आहे. पाकिस्तान 51.85 टक्के गुणांसह पाचव्या स्थानावर आहे. वेस्ट इंडिजचा संघ 50 गुणांसह 6 व्या क्रमांकावर आहे, तर न्यूझीलंडचे 25.93 आणि बांगलादेशचे 13.33 टक्के गुण आहेत. दक्षिण आफ्रिकेविरुद्धची मालिका जिंकूनही इंग्लंड 38.6 टक्के गुणांसह सातव्या स्थानावर आहे.
अशी आहे WTC गुणतालिका
टीम |
विजयी टक्केवारी |
गुण |
विजय |
पराभव |
अनिर्णित |
NR |
ऑस्ट्रेलिया |
70.00 |
84 |
6 |
1 |
3 |
0 |
दक्षिण आफ्रीका |
60.00 |
72 |
6 |
4 |
0 |
0 |
श्रीलंका |
53.33 |
64 |
5 |
4 |
1 |
0 |
भारत |
52.08 |
75 |
6 |
4 |
2 |
0 |
पाकिस्तान |
51.85 |
56 |
4 |
3 |
2 |
0 |
वेस्ट इंडीज |
50 |
54 |
4 |
3 |
2 |
0 |
इंग्लंड |
38.60 |
88 |
7 |
8 |
4 |
0 |
न्यूझीलंड |
25.93 |
28 |
2 |
6 |
1 |
0 |
बांग्लादेश |
13.33 |
16 |
1 |
8 |
1 |
0 |
हे देखील वाचा-