IND vs NZ, Playing 11 : शमी, सिराजला विश्रांती, न्यूझीलंडविरुद्ध तिसऱ्या वन-डे सामन्यात दोन्ही संघाच्या प्लेईंग 11 मध्ये बदल
IND vs NZ: मालिकेतील पहिले दोन्ही सामने भारताने जिंकल्यामुळे मालिका आधीच भारताने नावावर केली आहे. त्यामुळे आज महत्त्वाच्या गोलंदाजांना संधी देत भारताने दोन बदल अंतिम 11 मध्ये केली आहे.
India vs New Zealand ODI : भारत विरुद्ध न्यूझीलंड (IND vs NZ) तिसऱ्या एकदिवसीय सामन्याला सुरुवात झाली असून नाणेफेक जिंकत न्यूझीलंडने प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे. ज्यामुळे भारतीय संघ प्रथम फलंदाजीसाठी मैदानात उतरला आहे. दरम्यान मालिकेतील पहिले दोन्ही सामने भारताने जिंकल्यामुळे मालिका आधीच भारताने नावावर केली आहे. 2-0 अशी विजयी आघाडी भारताने घेतली असून त्यामुळे आज महत्त्वाच्या गोलंदाजांना संधी देत भारताने दोन बदल अंतिम 11 मध्ये केले आहेत.
यामध्ये भारताने सध्या दमदार गोलंदाजी करणाऱ्या मोहम्मद सिराज आणि मोहम्मद शमी या वेगवान गोलंदाजांना विश्रांती दिली आहे. त्यांच्या जागी युवा वेगवान गोलंदाज उमरान मलिक आणि फिरकीपटू युजवेंद्र चहल यांना संधी दिली आहे. विशेष म्हणजे आज पुन्हा एकदा कुलदीप आणि चहल ची कुल्चा जोडी मैदानावर उतरणार आहे. हे भारताच्या प्लेईंग 11 वरुन दिसून येत आहे. न्यूझीलंड संघानेही एक बदल केला असून जॅकॉब डफीला हेन्री शिप्ले याच्या जागी संधी दिली आहे. तर नेमकी दोन्ही संघाची अंतिम 11 कशी आहे जाणून घेऊ...
भारतीय संघ- रोहित शर्मा (कर्णधार), शुभमन गिल, विराट कोहली, इशान किशन (विकेटकिपर), सूर्यकुमार यादव, हार्दिक पांड्या, वॉशिंग्टन सुंदर, शार्दुल ठाकूर, कुलदीप यादव, उमरान मलिक, युजवेंद्र चहल
न्यूझीलंडचा संघ - फिन ऍलन, डेव्हॉन कॉनवे, हेन्री निकोल्स, डॅरिल मिशेल, टॉम लॅथम (कर्णधार आणि विकेटकिपर), ग्लेन फिलिप्स, मायकेल ब्रेसवेल, मिशेल सॅंटनर, जॅकॉब डफी, लॉकी फर्ग्युसन, ब्लेअर टिकनर
View this post on Instagram
भारत विरुद्ध न्यूझीलंड Head to Head
भारत आणि न्यूझीलंड या दोन्ही संघांमध्ये आतापर्यंत एकूण 115 एकदिवसीय सामने खेळवण्यात आले आहेत. यामध्ये भारतीय संघाने 57 सामने जिंकले आहेत, तर न्यूझीलंडने 50 सामने जिंकले आहेत. याशिवाय 7 सामन्यांमध्ये कोणताही निकाल लागला नाही आणि एक सामना बरोबरीत सुटला.
कुठे पाहू शकता लाईव्ह सामना?
भारत विरुद्ध न्यूझीलंड एकदिवसीय सामन्याचं लाईव्ह टेलिकास्ट स्टार स्पोर्ट्स नेटवर्कच्या विविध चॅनलवर होईल. तसेच हॉटस्टार अॅपद्वारे या सामन्याचं लाईव्ह स्ट्रिमिंग पाहता येऊ शकतं. याशिवाय https://marathi.abplive.com/ येथेही तुम्हाला सामन्याचे अपडेट्स पाहता येतील. .
हे देखील वाचा-