Team India : भारताचे माजी दिग्गज फलंदाज सुनील गावस्कर (Sunil Gavaskar) यांनी भारतीय संघातील दिग्गज खेळाडूंबाबत एक मोठं वक्तव्य केलं आहे. काही खेळाडू दोन-अडीच महिने आयपीएल खेळल्यानंतर देशाकडून खेळताना महत्त्वाच्या मालिकांपूर्वी विश्रांती घेतात, याबद्दल बीसीसीआयने विचार करायला हवा, असं गावस्कर म्हणाले आहेत. 


नुकत्याच समोर येणाऱ्या माहितीनुसार भारताचा माजी कर्णधार विराट कोहली आणि काही वरिष्ठ खेळाडूंनी या महिन्याच्या शेवटी होणाऱ्या वेस्ट इंडिजविरुद्धच्या दौऱ्यादरम्यान विश्रांती देण्याची विनंती बीसीसीआयकडे (BCCI) केली आहे. यानंतरच गावस्करानीी हे वक्तव्य केलं आहे. 


काय म्हणाले गावस्कर?


मागील बऱ्याच काळापासून भारत विविध देशांसोबत सामने खेळताना बरेच वरिष्ठ खेळाडू दुखापतीमुळे विश्रांती घेत असल्याचं समोर येत आहे, याबद्दल बोलताना गावस्कर म्हणाले,"मला हे अजिबात पटत नाही, की तुम्ही आयपीएल सुरु असताना विश्रांती करत नाही. पण भारताकडून सामने खेळताना मात्र त्यांना विश्रांती करायची असते. आयपीएल टी20 सामन्यांवेळी त्यांच्या शरीरावर ताण येत नाही, पण भारताकडून खेळताना त्यांना जमत नाही. दिग्गज खेळाडूंच्या वारंवार याप्रकारे विश्रांती घेण्यावर बीसीसीआयने योग्य ती उपायोजना करायला हवी.''  


'कोणती कंपनी काम न करण्यासाठी पगार देते का?'


पुढे बोलताना गावस्कर म्हणाले, "प्रत्येक ए-ग्रेड तसंच ए प्लस ग्रेड खेळाडूंना बीसीसीआय दरवर्षी कॉन्ट्रॅक्ट तयार करताना एक योग्य ती रिटेनर फी देते. अशामध्ये खेळाडू विश्रांती घेण्यासाठी सामने खेळत नाहीत. आता मला सांगा कोणती कंपनी अशी आहेका जी कंपनी काम न करता कर्मचाऱ्यांना पगार देते? त्यामुळे याकडे बीसीसीआयने लक्ष द्यायला हवं.''


 हे देखील वाचा-