...तर राहुलच्या नावावर होणार लाजिरवाणा विक्रम, विराटची करणार बरोबरी
IND vs SA 1st T20 : भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यात 9 जूनपासून पाच सामन्याच्या टी 20 मालिकेला सुरुवात होणार आहे.
IND vs SA 1st T20 : भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यात 9 जूनपासून पाच सामन्याच्या टी 20 मालिकेला सुरुवात होणार आहे. दक्षिण आफ्रिकेचा संघ भारतात दाखल झाला असून पहिल्या सामन्याची तयारी सुरु केली आहे. दिल्लीच्या अरुण जेटली स्टेडिअममध्ये भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यात पहिला सामना होणार आहे. रोहित शर्माच्या अनुपस्थितीत केएल राहुलकडे भारतीय संघाचं नेतृत्व सोपवण्यात आलेय. विराट कोहली, रोहित शर्मा, जसप्रीत बुमराह आणि मोहम्मद शामी यासारख्या दिग्गज खेळाडूंना या मालिकेतून आराम देण्यात आलाय.
राहुलची खराब कामगिरी -
केएल राहुलच्या नेतृत्वाखाली भारतीय संघाला आतापर्यंत एकही सामना जिंकता आला नाही. राहुलनं दक्षिण आफ्रिका दौऱ्यावर एक कसोटी आणि तीन एकदिवसीय सामन्यांचं नेतृत्व केलं होतं. या चारही सामन्यात केएल राहुलच्या नेतृत्वाखाली भारताला पराभव पत्कारावा लागला होता
असा करणारा दुसरा कर्णधार ठरणार -
दक्षिण आफ्रिकाविरोधात पहिल्या टी 20 सामन्यात भारताचा पराभव झाल्यास राहुलच्या नावावर नकोशा विक्रमाची नोंद होणार आहे. जर पहिल्या सामन्यात पराभव झाल्यास क्रिकेटच्या तिन्ही प्रकारात कर्णधार म्हणून पहिला सामना हरण्याचा विक्रम राहुलच्या नावावर जमा होणार आहे. याआधी हा नकोसा विक्रम विराट कोहलीच्या नावावर जमा आहे. क्रिकेटच्या तिन्ही प्रकरणात कर्णधार असताना पहिला सामना गमावण्याचा नकोसा विक्रम विराट कोहलीच्या नावावर आहे. 2014 मध्ये धोनीनं अचानक निवृत्ती घेतल्यानंतर विराट कोहलीकडे कसोटी कर्णधारपद आले होते. पण पहिल्याच सामन्यात भारताचा पराभव झाला होता. त्यानंतर 2013 मध्ये विराट कोहलीला एकदिवसीय सामन्यात नेतृत्वाची संधी मिळाली होती. त्या सामन्यात भारताचा पराभव झाला होता. 2017 मध्ये कोहलीने टी 20 मध्ये भारतीय संघाचं नेतृत्व सांभालं होतं. या सामन्यातही भारताचा पराभव झाला होता.
कर्णधारपदासह फलंदाजीवरही द्यावं लागल लक्ष
टी-20 मालिकेत केएल राहुलच्या कर्णधारपदाची अग्निपरीक्षा आहे. याचबरोबर त्याची फलंदाजीची शैली कशी आहे? हेही पाहावे लागेल.आयपीएलच्या पंधराव्या हंगामात केएल राहुलनं लखनौ सुपर जायंट्सचं नेतृत्व केलं. जिथं संघ प्लेऑफमध्ये पोहोचला. या हंगामात केएल राहुलनं 600 हून अधिक धावा केल्या आहेत. याआधी केएल राहुलच्या संथ फलंदाजीबद्दल प्रश्न उपस्थित केले गेले होते. टी-20 मालिकेत राहुलला या उणिवा दूर करण्याची संधी असेल.
भारतीय टी20 संघ-
केएल राहुल (कर्णधार), ऋतुराज गायकवाड, ईशान किशन, दीपक हुडा, श्रेयस अय्यर, ऋषभ पंत (विकेटकीपर), दिनेश कार्तिक, हार्दिक पंड्या, वेंकटेश अय्यर, युझवेंद्र चहल, कुलदीप यादव, अक्षर पटेल, रवी बिश्नोई, भुवनेश्वर कुमार, हर्षल पटेल, आवेश खान, अर्शदीप सिंह, उमरान मलिक.
टेम्बा बावुमा (कर्णधार), क्विंटन डी कॉक (विकेटकिपर), रीझा हेंड्रिक्स, हेनरिक क्लासेन, केशव महाराज, एडन मार्कराम, डेव्हिड मिलर, लुंगी एनगिडी, अॅनरिक नोर्किया, वेन पारनेल, ड्वेन प्रिटोरियस, कागिसो रबाडा, तबरेज शम्सी, ट्रिस्टन स्टब्स, रासी वॅन डर डसन, मार्को जॅनसेन.