India A vs India D, 3rd Match Duleep Trophy 2024 : दुलीप ट्रॉफीमध्ये दुसऱ्या फेरीचे सामने खेळवले जात आहेत. अनंतपूर येथे भारत अ आणि भारत ड यांच्यात सामना होत आहे. ज्यामध्ये श्रेयस अय्यरच्या नेतृत्वाखालील भारत ड संघाला आणखी एक पराभवाची टांगती तलवार दिसत आहे. तिसऱ्या दिवसाचा खेळ संपेपर्यंत भारत ड संघाने 1 गडी गमावून 62 धावा केल्या होत्या. श्रेयस अय्यरच्या संघाला विजयासाठी अद्याप 426 धावांची गरज आहे. अशा स्थितीत संघासाठी पराभवाचा धोका वाढला आहे. पराभव टाळायचा असेल तर उद्या दिवसभर जोरदार फलंदाजी करावी लागेल.
भारत डी संघ पहिल्या डावात केवळ 183 धावांवर ऑलआऊट झाला. देवदत्त पडिक्कलने संघाकडून सर्वाधिक 92 धावा केल्या होत्या. मात्र, श्रेयस अय्यर आणि संजू सॅमसनसारखे वरिष्ठ खेळाडू फ्लॉप ठरले. याच कारणामुळे संघाला मोठी धावसंख्या उभारता आली नाही. भारत अ संघाकडून खलील अहमद आणि आकिब खान यांनी 3-3 बळी घेतले.
रोहितच्या लाडका तिलक वर्माने ठोकले शानदार शतक
प्रत्युत्तरात भारत अ संघाने दुसऱ्या डावात शानदार फलंदाजी करत 383 धावा केल्या. संघाच्या वतीने दोन फलंदाजांनी शतके झळकावली. कर्णधार मयंक अग्रवाल आणि प्रथम सिंग या सलामीच्या जोडीने पहिल्या विकेटसाठी 115 धावांची शानदार भागीदारी केली. मयंक अग्रवालने 87 चेंडूत 8 चौकारांच्या मदतीने 56 धावा केल्या. प्रथम सिंगने 189 चेंडूंत 12 चौकार आणि 1 षटकाराच्या मदतीने 122 धावांची शानदार खेळी केली. यानंतर तिलक वर्मा यांनीही आपली प्रतिभा दाखवली. त्याने 193 चेंडूत 9 चौकारांच्या मदतीने नाबाद 111 धावा केल्या. खालच्या फळीत शाश्वत रावतनेही 88 चेंडूत 64 धावा केल्या. या कारणामुळे संघ 380 धावा करण्यात यशस्वी ठरला.
भारत अ संघाने पहिल्या डावात 290 धावा केल्या होत्या. आणि त्यामुळे भारत ड संघाला विजयासाठी 488 धावांचे लक्ष्य मिळाले. मात्र, अवघ्या 2 धावांवर संघाने पहिली विकेट गमावली. सलामीवीर अथर्व तायडेला खातेही उघडता आले नाही. यानंतर रिकी भुई 44 धावा करून क्रीजवर उपस्थित आहे तर यश दुबेने 15 धावा केल्या आहेत.
हे ही वाचा -