Harish Salve on Vinesh Phogat : पॅरिस ऑलिम्पिक संपले पण पॅरिस ऑलिम्पिकमधील विनेश फोगाटच्या कुस्तीवरून सुरू असलेला गदारोळ आजही थांबलेला नाही. या प्रकरणी दररोज नवीन गोष्टी समोर येत आहे. विनेश फोगाटने अलीकडेच राजकारणात प्रवेश करून काँग्रेसशी हातमिळवणी केली.


दरम्यान, विनेश फोगाटचे वकील हरीश साळवे यांनी तिच्याबद्दल मोठा खुलासा केला. साळवे हे विनेश फोगाटचे CAS मध्ये वकील होते. खरंतर, 2024 पॅरिस ऑलिम्पिकमध्ये 50 किलो कुस्तीच्या अंतिम फेरीत पोहोचल्यानंतर 100 ग्रॅम जास्त वजनामुळे विनेश फोगटला अपात्र ठरवण्यात आले होते. नंतर त्यांनी या निर्णयाविरुद्ध CAS मध्ये अपील केले.


विनेश फोगाट 2024 पॅरिस ऑलिम्पिकमध्ये सुवर्णपदक जिंकण्याची प्रबळ दावेदार होती. मात्र, अंतिम सामन्याच्या दिवशी 100 ग्रॅम जास्त वजनामुळे तिला अपात्र घोषित करण्यात आले. यानंतर विनेशने रौप्य पदकासाठी सीएएस, क्रीडा प्रकरणे हाताळणाऱ्या न्यायालयाकडे दाद मागितली होती. हरीश साळवे हे विनेशची केस लढत होते. मात्र, सीएएसने विनेशची केस फेटाळली होती.


विनेशच्या वक्तव्यानंतर हरीश साळवे यांनी हे वक्तव्य केलं आहे. अलीकडेच विनेश म्हणाली होती की, पॅरिस ऑलिम्पिकच्या फायनलपूर्वी जेव्हा तिला 100 ग्रॅम जास्त वजनामुळे अपात्र ठरवण्यात आले होते, तेव्हा तिला भारतीय ऑलिम्पिक संघटनेकडून कोणताही पाठिंबा मिळाला नाही. पीटी उषाही फक्त फोटो काढण्यासाठी आल्याचे विनेशने सांगितले होते. विनेशने वकील हरीश साळवे यांच्याबद्दलही प्रतिक्रिया दिली होती. साळवे यांनी कठोर भूमिका दाखवली नाही, असे ती म्हणाली होती.


आता टाइम्स नाउला दिलेल्या मुलाखतीत हरीश साळवे म्हणाले की, विनेशसाठी भारतीय ऑलिम्पिक संघटनेने कोर्ट ऑफ आर्बिट्रेशन फॉर स्पोर्ट्सचं दार ठोठावलं होतं. पण कोर्ट ऑफ आर्बिट्रेशन फॉर स्पोर्ट्सने आंतरराष्ट्रीय ऑलिम्पिक कमिटीचं म्हणणं योग्य असल्याचं सांगितले आणि विनेशविरुद्ध निकाल दिला. 


आता वकील हरीश साळवेंनी दावा केला आहे की, भारतीय ऑलिम्पिक संघटना या विरोधात स्वीस कोर्टात आव्हान देणार होती. पण विनेशने नकार दिला. भारतीय ऑलिम्पिक असोसिएशनने नियुक्त केलेल्या एका चांगल्या लॉ फर्ममधील काही वकिलांनी सांगितले की आम्ही तुमच्याशी काहीही शेअर करणार नाही. आता वकील हरीश साळवेंच्या या वक्तव्याने खळबळ उडाली आहे. तिच्यावर खोटे बोलल्याचा आरोप होत आहे. पॅरिस ऑलिम्पिकच्या अंतिम फेरीतून अपात्र ठरल्यानंतर विनेश फोगटने कुस्तीला अलविदा केला.


हे ही वाचा -


Ishan Kishan : मुंबई इंडियन्सच्या कळपात मोठी घडामोड! इशान किशनला संघात ठेवणार कायम? शेअर केली 'ही' पोस्ट


IPL 2025 Mega Auction : 6,6,6,6,6.... IPL मेगा ऑक्शनपूर्वी इंग्लंडच्या खेळाडूने घातला धुमाकूळ, 11 चेंडूत ठोकल्या 54 धावा


India vs Pakistan Hockey : टीम इंडियाने उडवला पाकिस्तानचा धुव्वा... 'सरपंच' ठरला विजयाचा हिरो