IPL 2025 Mega Auction : आयपीएल 2025 च्या मेगा ऑक्शनपूर्वी इंग्लंडच्या खेळाडूने क्रिकेटच्या मैदानात धुमाकूळ घातला आहे. कार्डिफ येथे खेळल्या गेलेल्या इंग्लंड आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील टी-20 मालिकेतील दुसऱ्या सामन्यात लियाम लिव्हिंगस्टोन स्फोटक खेळी खेळली. त्याने 5 षटकार आणि 6 चौकारांच्या मदतीने 87 धावा केल्या आहेत. लिव्हिंगस्टोनला या सामन्यातील सर्वोत्तम खेळाडू म्हणूनही निवडण्यात आले. तो सध्या आयपीएलमध्ये पंजाब किंग्जचा भाग आहे.
खरंतर, टी-20 मालिकेतील दुसऱ्या सामन्यात ऑस्ट्रेलियाने 194 धावांचे लक्ष्य दिले होते. प्रत्युत्तरात इंग्लंडने 19 षटकांत 7 गडी गमावून लक्ष्याचा यशस्वी पाठलाग केला. सामन्यादरम्यान लिव्हिंगस्टोन चौथ्या क्रमांकावर फलंदाजीला आला होता. त्याने 47 चेंडूत 87 धावा केल्या. यादरम्यान त्याने 6 चौकार आणि 5 षटकार मारले. म्हणजेच त्याने फक्त षटकार आणि चौकारच्या 11 चेंडूत 54 धावा केल्या. यादरम्यान, लिव्हिंगस्टोनचा स्ट्राइक रेट 185.11 होता. त्याच्यासोबत जेकब बेथेलनेही धावा केल्या. त्याने 24 चेंडूत 44 धावा केल्या. इंग्लंडने हा सामना ३ विकेटने जिंकला.
लिव्हिंगस्टोन लिलावात पडणार पाऊस....
आयपीएल 2025 पूर्वी मेगा लिलाव होणार आहे. डिसेंबर महिन्यात त्याचे आयोजन केले जाऊ शकते. याआधी अनेक संघ खेळाडूंना सोडतील. फक्त काही खेळाडूंना कायम ठेवता येईल. लिव्हिंगस्टोन सध्या पंजाब किंग्जचा भाग आहे. त्याला पंजाबने 2022 मध्ये 11.50 कोटी रुपयांना विकत घेतले आणि नंतर 2023 मध्ये कायम ठेवले. 2024 मध्येही कायम ठेवले. पण आता ते त्याला सोडतील. लिव्हिंगस्टोन लिलावात आला तर त्याला मोठी रक्कम मिळू शकते.
लिव्हिंगस्टोनची आयपीएल कारकीर्द....
लिव्हिंगस्टोनची आयपीएल कारकीर्द फार मोठी नाही. पण त्याने अनेक प्रसंगी चमकदार कामगिरी केली आहे. त्याने 2019 मध्ये पदार्पण केले आणि आतापर्यंत 39 सामने खेळले आहेत. या कालावधीत 939 धावा केल्या आहेत. लिव्हिंगस्टोनने 6 अर्धशतके केली आहेत. गोलंदाजीतही त्याने कमाल दाखवली आहे. लिव्हिंगस्टोनने आयपीएलच्या 22 डावांमध्ये गोलंदाजी केली आहे. या कालावधीत 11 विकेट घेतल्या आहेत.
हे ही वाचा -