Jonny Bairstow Record : इंग्लंड आणि न्यूझीलंड (England vs New Zealand) यांच्यातील कसोटी मालिकेतील तिसरा आणि अखेरचा सामना जिंकत इंग्लंडने मालिका 3-0 ने जिंकली आहे. दरम्यान या वेळी तिसऱ्या आणि अखेरच्या सामन्यात इंग्लंडचा दमदार फलंदाज जॉनी बेअरस्टो (Jonny bairstow) याने एक खास रेकॉर्ड स्वत:च्या नावावर केला आहे. त्याने सामन्यातील दुसऱ्या डावात वेगवान अर्धशतक ठोकलं आहे. 30 चेंडूत त्याने अर्धशतक ठोकलं असून इतक्या वेगाने अर्धशतक ठोकणारा तो इंग्लंडचा दुसरा फलंदाज ठरला आहे.

  

बेअरस्टोने तिसरे टेस्टमधील पहिल्या डावात 157 चेंडूचा सामना करत 162 धावा ठोकल्या.  तर दुसऱ्या डावातही त्याने महत्त्वपूर्ण अशा नाबाद 71 धावा केल्या. त्याने 44 चेंडूचा सामना करताना 9 चौकार आणि 3 षटकार ठोकले. बेअरस्टोने या डावातच रेकॉर्ड केला. त्याने 30 चेंडूत अर्धशतक पूर्ण करत इंग्लंडकडून कसोटी सामन्यात वेगवान अर्धशतक झळकावण्यांच्या यादीत दुसरा क्रमांक पटकावला आहे. या यादीत पहिल्या स्थानावर माजी खेळाडू इयान बॉथम असून त्यांनी भारताविरुद्ध दिल्लीमध्ये 1981 साली 28 चेंडूत अर्धशतक झळकावलं होतं. 

कसोटीमध्ये इंग्लंडसाठी सर्वाधिक वेगाने अर्धशतक ठोकणारे

खेळाडू सामना अर्धशतक
इयान बॉथम भारत विरुद्ध इंग्लंड (1981, दिल्ली) 28 चेंडूत 
जॉनी बेअरस्टो इंग्लंड विरुद्ध न्यूझीलंड (2022, लीड्स ) 30 चेंडूत 
इयान बॉथम इंग्लंड विरुद्ध न्यूझीलंड (1986, द ओव्हल ) 32 चेंडूत

 हे देखील वाचा-