ENG vs IND : भारत आणि इंग्लंड (India vs England) यांच्याच येत्या 1 जुलैपासून सामन्यांना सुरुवात होणार असून यासाठी सर्व भारतीय संघ इंग्लंडला पोहोचला आहे. पण याच वेळी संघाचा कर्णधार रोहित शर्माला कोरोनाची बाधा (Rohit Sharma Corona) झाली आहे. त्यामुळे आता बीसीसीआयने सर्व खेळाडूंना सार्वजनिक ठिकाणी जाणं टाळावं आणि काळजी घ्यावी अशा सूचना दिल्याची माहिती समोर येत आहे. एएनआय (ANI) वृत्तसंस्थेने याबाबत माहिती दिली आहे.
बीसीसीआयच्या सूत्रींनी एएनआयला दिलेल्या माहितीत सांगितले की, 'काही खेळाडू सतत सार्वजनिक ठिकाणी जात असल्याचे दिसून आले. यावेळी त्यांनी चाहत्यांसोबत फोटो घेतल्याचेही दिसून आले, या सर्वामुळे संबधित खेळाडूंना बीसीसीआयने खडेबोल सुनावले आहेत. तसंच कोरोनाचा धोका अजूनही असून या सर्वांना काळजी घेण्याच्या सूचनाही बीसीसीआयने दिल्या आहेत.'
रोहित-विराट दिसले होते फिरताना
काही दिवसांपूर्वीच सोशल मीडियावर संघाचा कर्णधार रोहित शर्मा आणि माजी कर्णधार विराट कोहली इंग्लंडच्या बाजारात फिरताना दिसले होते. यावेळी काही चाहत्यांनी त्यांच्यासोबत फोटोही काढले होते. त्यानंतरच रोहितला आता कोरोनाची बाधा झाल्याचंही समोर आलं आहे.
कसं आहे टीम इंडियाचं वेळापत्रक?
1 जुलै ते 5 जुलै दरम्यान भारत आणि इंग्लंड यांच्यात एकमेव कसोटी सामना पार पडल्यावर पुढील सामने खालीलप्रमाणे होतील.
इंग्लंड विरुद्ध भारत टी-20 मालिका वेळापत्रक-
सामना | तारीख | ठिकाण |
पहिला टी-20 सामना | 7 जुलै | एजेस बाउल |
दुसरा टी-20 सामना | 9 जुलै | एजबॅस्टन |
तिसरा टी-20 सामना | 10 जुलै | ट्रेंट ब्रिज |
इंग्लंड- भारत एकदिवसीय मालिका वेळापत्रक-
सामना | तारीख | ठिकाण |
पहिला एकदिवसीय सामना | 12 जुलै | ओव्हल |
दुसरा एकदिवसीय सामना | 14 जुलै | लॉर्ड्स |
तिसरा एकदिवसीय सामना | 17 जुलै | मँचेस्टर |
हे देखील वाचा-