England vs New Zealand Kane Williamson Devon Conway 3rt Test: इंग्लंड आणि न्यूझीलंड (ENG vs NZ) यांच्यात सध्या तीन सामन्यांची कसोटी मालिका खेळवली जात आहे. या मालिकेतील पहिल्या दोन्ही सामन्यात न्यूझीलंडला पराभव पत्करावा लागला असून तिसऱ्या सामन्यापूर्वी महत्त्वाचे फलंदाज मुकण्याची शक्यता होती. कर्णधार केन विल्यमसन (Kane Willamson) आणि दमदार फलंदाज डेवॉन कॉन्वे (Devon Conway) यांना कोरोनाची लागण झाल्याने दोघेही विलगीकरणात होते. पण आता दोघेही तिसऱ्या कसोटीसाठी उपलब्ध असल्याची माहिती समोर येत आहे. 


कर्णधार विल्यमसन दुसऱ्या टेस्टआधीच कोरोनाबाधित आढळला होता. तर तिसऱ्या सामन्यासाठी न्यूझीलंडचा संघ लंडन येथे दाखल झाल्यानंतर खेळाडूंची पीसीआर टेस्ट (PCR Test) करण्यात आली. यावेळी कॉन्वे कोरोना पॉझिटिव्ह आढळला होता. पण आता समोर येणाऱ्या माहितीनुसार केन विल्यमसन तिसऱ्या कसोटीपूर्वी संघात सामिल झाला असून अंतिम 11 मध्ये नक्कीच असू शकतो. कॉन्वे देखील उपलब्ध झाला असून तोही अंतिम 11 मध्ये असण्याची दाट शक्यता आहे.


न्यूझीलंड मालिकेत 2-0 ने मागे


सध्या न्यूझीलंडचा संघ इंग्लंड दौऱ्यावर असून यावेळी तीन कसोटी सामन्यांची कसोटी मालिका खेळवली जात आहे. वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप अर्थात WTC च्या दृष्टीने महत्त्वाची असणारी ही मालिका सध्या इंग्लंडच्या पारड्यात झुकली आहे. पहिल्या कसोटीमध्ये इंग्लंडने 5 विकेट्सने विजय मिळवला. दुसरा सामना तर अत्यंत अटीतटीचा झाला दोन्ही संघानी दमदार खेळीचं प्रदर्शन घडवलं. पण अखेर सामना इंग्लंडनेच 5 विकेट्सने जिंकला. या मालिकेत जो रुट तुफान फॉर्ममध्ये दिसून येत आहे. दरम्यान आता तिसरा सामना 23 जूनपासून हेंडिग्ले, लीड्स याठिकाणी खेळवला जाणार आहे.


हे देखील वाचा-