Jasprit Bumrah Surgery: जसप्रीत बुमराहच्या पाठीची शस्त्रक्रिया यशस्वी; विश्वचषकापूर्वी तंदुरुस्त होण्याची शक्यता
Jasprit Bumrah Successful Surgery: भारताचा स्टार वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराहची न्यूझीलंडमध्ये शस्त्रक्रिया यशस्वी झाली आहे.
Jasprit Bumrah Successful Surgery: टीम इंडिया (Team India) आणि क्रीडाप्रेमींसाठी आनंदाची बातमी. टीम इंडियाचा स्टार वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराहच्या (Jasprit Bumrah) पाठीची शस्त्रक्रिया यशस्वी झाली आहे. न्यूझीलंडमध्ये बुमराहच्या पाठीवर यशस्वी शस्त्रक्रिया पार पडली. आता या शस्त्रक्रियेनंतर बुमराहला मैदानात परतण्यासाठी किमान 6 महिने लागू शकतात. अशा परिस्थितीत बुमराह यंदाच्या एकदिवसीय विश्वचषकापूर्वी तंदुरुस्त झाल्यानंतर टीम इंडियात पुनरागमन करु शकतो, असं बोललं जात आहे.
बुमराहची शस्त्रक्रिया यशस्वी
भारताचा स्टार वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराहची न्यूझीलंडमध्ये शस्त्रक्रिया यशस्वी झाली आहे. या शस्त्रक्रियेनंतर आता एकदिवसीय विश्वचषक 2023 मध्ये त्यांच्या सहभागासंदर्भातील आशा वाढल्या आहेत. मात्र, बुमराहला मैदानात परतण्यासाठी 6 महिन्यांचा कालावधी लागणार आहे. त्यामुळे बुमराह वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप फायनलमध्ये खेळताना दिसणार नाही हे मात्र नक्की आहे. पण विश्वचषकात बुमराह नक्कीच खेळताना दिसेल, असं बोललं जात आहे.
पाठीच्या समस्येमुळे जसप्रीत बुमराह आधीच आयपीएल 2023 मधून बाहेर पडला आहे. पण याच वर्षी होणाऱ्या विश्वचषकात मात्र जसप्रीत बुमराह खेळण्याची शक्यता असल्याचं बोललं जात आहे.
2023 मध्ये, 50 षटकांचा विश्वचषक ऑक्टोबर-नोव्हेंबरमध्ये भारतात खेळवला जाणार आहे. असं असलं तरी पाठीच्या समस्येपासून सुटका व्हायला खूप वेळ लागतो. बुमराहला त्याच्या पायावर उभं राहण्यासाठी चार आठवडे लागतील, असं अधिकृतपणे सांगितलं जात आहे. परंतु त्याला संपूर्णपणे बरं होण्यासाठी आणखी काही दिवसांची विश्रांती आवश्यक असणार आहे. बुमराहची रिकव्हरी झाल्यानंतर रिहॅबिलिटेशन सुरू होणार आहे. ज्यामध्ये तीन ते 5 महिन्यांचा वेळ लागू शकतो. त्यामुळे जसप्रीत बुमराहला विश्वचषकापूर्वी पूर्णपणे तंदुरुस्त होण्यासाठी अनेक कठिण आव्हानांचा सामना करावा लागणार आहे.
बुमराहची न्यूझीलंडमध्ये याच डॉक्टरांनी शस्त्रक्रिया केली आहे. जिथे इंग्लंडचा स्टार वेगवान गोलंदाज जोफ्रा आर्चरवर उपचार करण्यात आले. तसेच, याच डॉक्टरांकडेही न्यूझीलंडचा दिग्गज वेगवान गोलंदाज शेन बाँडनंही उपचार घेतले होते. दरम्यान, बुमराहची शस्त्रक्रिया यशस्वी झाली आहे.
जसप्रीत बुमराह म्हणजे, टीम इंडियाचा स्टार गोलंदाज. बुमराह गोलंदाजीसाठी उतरला की, भल्या भल्या फलंदाजांना धडकी भरते. आपल्या आगळ्यावेगळ्या शैलीनं सामना फिरवण्याची क्षमता बुमराहमध्ये आहे. टीम इंडियासाठी बुमराहनं तिनही फॉरमॅट खेळले आहेत. त्यानं टीम इंडियासाठी 30 कसोटी सामन्यांत 128 विकेट्स, 71 एकदिवसीय सामन्यांत 121 विकेट्स आणि 60 टी-20 सामन्यात 70 विकेट्स घेतल्यात.
महत्त्वाच्या इतर बातम्या :