India VS England T20 Series 2025 : ऑस्ट्रेलियाविरुद्ध 5 जानेवारी रोजी संपलेल्या सिडनी कसोटीनंतर भारतीय संघाला आता विश्रांतीसाठी 16 दिवसांचा ब्रेक आहे. त्यानंतर आता भारतीय संघाला घरच्या मैदानावर इंग्लंडविरुद्ध टी-20 मालिका खेळायची आहे. घरच्या मैदानावर होणाऱ्या या 5 सामन्यांच्या मालिकेसाठी इंग्लंडने आपला संघ जाहीर केला आहे. आता बीसीसीआय पण लवकरच संघाची घोषणा करणार आहेत.
ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर गेलेला कसोटी संघात आणि आता टी-20 संघात मोठा बदल होणार आहे. दौऱ्यावर असलेले अभिमन्यू ईश्वरन, यष्टिरक्षक फलंदाज ध्रुव जुरेल, सरफराज खान, देवदत्त पेडिकल, ऋषभ पंत या खेळाडूंना इंग्लंडविरुद्धच्या मालिकेतून बाहेर ठेवण्यात येणार असल्याचे निश्चित मानले जात आहे. सूर्यकुमार यादवच्या नेतृत्वाखालील संघात अभिषेक शर्मा, यशस्वी जैस्वाल, संजू सॅमसन, रिंकू सिंग, तिलक वर्मा, हार्दिक पांड्या यांची निवड निश्चित आहे.
गोलंदाजीबद्दल बोलायचे झाले तर इथेही बदल होऊ शकतात. फिरकीपटू अक्षर पटेल, रवी बिश्नोईसह वेगवान गोलंदाज अर्शदीप, मयंक यादव, हर्षित राणा यांना इंग्लंडविरुद्ध संधी दिल्या जाऊ शकते. इंग्लंडने भारत दौऱ्यासाठी टी-20 आणि एकदिवसीय संघांची घोषणा केली आहे, जोस बटलर संघांचा कर्णधार असेल.
इंग्लंडचा संघ जानेवारीच्या अखेरीस भारताच्या दौऱ्यावर येणार आहे, या दौऱ्यात इंग्लंड संघ 3 सामन्यांच्या एकदिवसीय मालिकेसह 5 टी-20 सामन्यांची मालिका खेळणार आहे. इंग्लंडचा भारत दौरा 22 जानेवारीपासून सुरू होत आहे, तर या दौऱ्यातील शेवटचा सामना 12 फेब्रुवारीला होणार आहे.
भारत विरुद्ध इंग्लंड टी-20 मालिकेचे वेळापत्रक -
- पहिला टी-20 सामना : 22 जानेवारी 2025, कोलकाता (ईडन गार्डन्स)
- दुसरा टी-20 सामना : 25 जानेवारी 2025, चेन्नई (एमए चिदंबरम स्टेडियम)
- तिसरा टी-20 सामना : 28 जानेवारी 2025, राजकोट (सौराष्ट्र क्रिकेट असोसिएशन स्टेडियम)
- चौथा टी-20 सामना: 31 जानेवारी 2025, पुणे (महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशन स्टेडियम)
- पाचवा टी-20 सामना : 2 फेब्रुवारी 2025, मुंबई (वानखेडे स्टेडियम)
(सर्व टी-20 सामने भारतीय वेळेनुसार संध्याकाळी 7 वाजता सुरू होतील)
भारत विरुद्ध इंग्लंड वनडे मालिकेचे वेळापत्रक -
- पहिली वनडे : 6 फेब्रुवारी 2025, नागपूर (विदर्भ क्रिकेट असोसिएशन स्टेडियम)
- दुसरी वनडे : 9 फेब्रुवारी 2025, कटक (बाराबती स्टेडियम)
- तिसरी वनडे : 12 फेब्रुवारी 2025, अहमदाबाद (नरेंद्र मोदी स्टेडियम)
(सर्व एकदिवसीय सामने भारतीय वेळेनुसार दुपारी 1:30 वाजता सुरू होतील)
भारत विरुद्ध इंग्लंड संघ -
भारताचा संभाव्य टी-20 संघ - अभिषेक शर्मा, यशस्वी जैस्वाल, संजू सॅमसन (यष्टीरक्षक), सूर्यकुमार यादव (कर्णधार), रिंकू सिंग, हार्दिक पांड्या, अक्षर पटेल, रवी बिश्नोई, शिवम दुबे, ऋतुराज गायकवाड, अर्शदीप सिंग, हर्षित राणा, मयंक यादव, तिलक वर्मा आणि नितीशकुमार रेड्डी!
इंग्लंडचा टी-20 संघ : जोस बटलर (कर्णधार), रेहान अहमद, जोफ्रा आर्चर, गस ऍटकिन्सन, जेकब बेथेल, हॅरी ब्रूक, ब्रायडन कार्सी, बेन डकेट, जेमी ओव्हरटन, जेमी स्मिथ, लियाम लिव्हिंगस्टोन, आदिल रशीद, साकिब महमूद, फिल सॉल्ट, मार्क वुड.
इंग्लंड एकदिवसीय संघ : जोस बटलर (कर्णधार), जोफ्रा आर्चर, गुस ऍटकिन्सन, जेकब बेथेल, हॅरी ब्रूक, ब्रायडन कार्स, बेन डकेट, जेमी ओव्हरटन, जेमी स्मिथ, लियाम लिव्हिंगस्टोन, आदिल रशीद, जो रूट, साकिब महमूद, फिल सॉल्ट, मार्क वुड.
हे ही वाचा -
Rishi Dhawan : अश्विननंतर 'या' भारतीय खेळाडूने घेतली निवृत्ती, सामन्यानंतर अचानक तडकाफडकी राजीनामा