Australia WTC Final 2025 : ऑस्ट्रेलियाने सिडनी कसोटीच्या तिसऱ्या दिवशी पाहुण्या भारताचा 6 गडी राखून पराभव करून वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप फायनलमध्ये आपली जागा निश्चित केली आहे. ऑस्ट्रेलियाने भारताला 3-1 ने पराभूत करून मालिका जिंकली. सध्या, वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप पॉइंट टेबलमध्ये दक्षिण आफ्रिकेने 11 कसोटी सामन्यांमध्ये 9 विजय आणि 66.67 विजयाच्या टक्केवारीसह अंतिम फेरीचे तिकीट आधीच निश्चित केले आहे. त्याच वेळी, ऑस्ट्रेलिया 17 कसोटी सामन्यांमध्ये 9 विजय आणि 63.73 विजयाच्या टक्केवारीसह गुणतालिकेत दुसऱ्या स्थानावर आहे. 


जूनमध्ये खेळल्या जाणाऱ्या WTC फायनलमध्ये ऑस्ट्रेलियाचा सामना दक्षिण आफ्रिकेशी होणार हे जवळपास स्पष्ट झाले आहे. पण ऑस्ट्रेलियाने 2023 मध्ये जी चूक केली होती, तीच चूक केल्यास त्याला पुन्हा फायनलमधून ते बाहेर जाऊ शकतात. याआधी दक्षिण आफ्रिकेने सेंच्युरियनमधील बॉक्सिंग-डे कसोटीत पाकिस्तानचा दोन गडी राखून पराभव करत अंतिम फेरीत धडक मारली होती. 






पॉइंट टेबलमध्ये ऑस्ट्रेलियाचे स्थान मजबूत असले तरी कांगारू संघ अंतिम फेरीतून बाहेर जाऊ शकतो, हेही वास्तव आहे. सध्या ऑस्ट्रेलियाची विजयाची टक्केवारी 63.73 आहे आणि ती इतर संघांपेक्षा पुढे आहे. आणि सध्याची परिस्थिती पाहता त्याला मागे टाकणे पाकिस्तान, वेस्ट इंडिज आणि श्रीलंकेसाठी खूप कठीण जाईल असे दिसत आहे. पण श्रीलंकेने ऑस्ट्रेलियावर 2-0 असा विजय मिळवल्यास विजयाची टक्केवारी 53.85 वर जाईल. या परिस्थितीतही, ऑस्ट्रेलियाची 57.02 ची विजयी टक्केवारी अंतिम फेरीत नेण्यासाठी पुरेशी असेल.






...पण पुन्हा ती चूक झाली तर कांगारू संघाला पडणार महागात! 


खरंतर, स्लो-ओव्हर रेटमुळे ऑस्ट्रेलियाचे अंतिम फेरीचे गणित बिघडू शकते. उरलेल्या दोन कसोटी सामन्यांमध्ये स्लो-ओव्हर रेटमुळे कांगारू संघाने आठ गुण गमावल्यास. आणि जर श्रीलंकेने मालिका 2-0 ने जिंकली तर लंकेचा संघ कांगारूंना मागे टाकून WTC फायनलमध्ये पोहोचेल.


स्लो-ओव्हर रेटमुळे ऑस्ट्रेलियाने 2023 च्या ऍशेस मालिकेदरम्यान चौथ्या कसोटीत दहा गुण गमावले. त्याचबरोबर इंग्लिश संघालाही संपूर्ण मालिकेत 19 गुणांचे नुकसान सहन करावे लागले. त्याच वर्षी बांगलादेशविरुद्धच्या मालिकेतही पाकिस्तानला सहा गुणांचा फटका बसला होता. 


हे ही वाचा -


Ind vs Eng T20 Series : टीम इंडिया होणार मोठी उलथापालथ! इंग्लंडविरुद्ध मालिकेसाठी BCCI 'या' खेळाडूंना देणार संधी? जाणून घ्या शेड्यूल अन् सर्वकाही