एक्स्प्लोर

J&K Cricket Team Ranji Trophy Final : जम्मू-काश्मीरच्या पोरांनी करून दाखवलं, 67 वर्षांचा वनवास संपला! पहिल्यांदाच रणजी ट्रॉफीच्या फायनलमध्ये एन्ट्री; जेतेपदासाठी कोणाला भिडणार?

Jammu & Kashmir beat Bengal Ranji Trophy 2026 : रणजी ट्रॉफीच्या उपांत्य फेरीत बलाढ्य बंगालचा पराभव करत त्यांनी प्रथमच स्पर्धेच्या अंतिम फेरीत धडक मारली.

J&K Cricket Team Ranji Trophy Final : जम्मू-काश्मीर क्रिकेट संघाने इतिहास रचला आहे. रणजी ट्रॉफीच्या उपांत्य फेरीत बलाढ्य बंगालचा पराभव करत त्यांनी प्रथमच स्पर्धेच्या अंतिम फेरीत धडक मारली. चौथ्या दिवशी सकाळी 126 धावांचे लक्ष्य सहज गाठत जम्मू-काश्मीरने ही ऐतिहासिक कामगिरी पूर्ण केली. हा विजय जम्मू-काश्मीर क्रिकेटसाठी सुवर्णाक्षरांनी लिहून ठेवावा असा क्षण ठरला.

या सामन्याचा खरा हरक आकिब नबी ठरला. त्याने संपूर्ण सामन्यात एकूण 9 बळी घेत बंगालच्या फलंदाजांना गुडघे टेकायला भाग पाडले. पहिल्या डावात त्याने 5 बळी घेतले, तर दुसऱ्या डावातही अचूक आणि भेदक गोलंदाजी केली. गोलंदाजीसोबतच अब्दुल समदनेही फलंदाजीमध्ये मोलाचे योगदान दिले. पहिल्या डावात त्याने 82 धावांची महत्त्वपूर्ण खेळी केली, तर दुसऱ्या डावात नाबाद 30 धावा करत संघाला विजयाच्या उंबरठ्यावरून पार नेले.

बंगालचा दुसरा डाव अवघ्या 99 धावांत आटोपला 

सोमवार 16 फेब्रुवारीपर्यंत सामना चुरशीचा दिसत होता. मात्र मंगळवारी 17 फेब्रुवारीला चित्र पूर्णपणे बदलले. आकिब नबी डार (4/36) आणि सुनील कुमार (4/27) यांच्या भेदक गोलंदाजीसमोर बंगालचा दुसरा डाव अवघ्या 99 धावांत आटोपला. त्यामुळे जम्मू-काश्मीरला विजयासाठी 126 धावांचे लक्ष्य मिळाले.

तिसऱ्या दिवसाअखेर जम्मू-काश्मीरने 2 बाद 43 धावा केल्या होत्या. चौथ्या दिवशी त्यांना केवळ 83 धावांची गरज होती. वंशज शर्माच्या नाबाद 43 धावा आणि अब्दुल समदच्या नाबाद 30 धावांच्या जोरावर त्यांनी हे लक्ष्य सहज पार केले आणि अंतिम फेरीचे तिकीट पक्के केले.

मोहम्मद शमीला 9 विकेट्स...

या सामन्यात जम्मू-काश्मीरचा पहिला डाव 302 धावांवर संपला. बंगालकडून मोहम्मद शमीने पहिल्या डावात 90 धावांत तब्बल 8 बळी घेतले, तर दुसऱ्या डावात 1 बळी मिळवला. एकूण 9 बळी घेत शानदार कामगिरी करूनही शमीला आपल्या संघाला विजय मिळवून देता आला नाही. मात्र या प्रभावी कामगिरीमुळे त्याने भारतीय संघातील पुनरागमनासाठी आपली दावेदारी नक्कीच केली आहे.

जम्मू-काश्मीर जेतेपदासाठी कोणाला भिडणार?

या ऐतिहासिक विजयासह जम्मू-काश्मीर हा हिमालयीन पट्ट्यातील पहिला संघ ठरला आहे, ज्याने भारतातील सर्वात प्रतिष्ठेच्या प्रथम श्रेणी स्पर्धेच्या अंतिम फेरीत प्रवेश केला. आता रणजी ट्रॉफीच्या अंतिम सामन्यात त्यांचा सामना कर्नाटक आणि उत्तराखंड यांच्यातील विजेत्या संघाशी होणार आहे. जम्मू-काश्मीरसाठी हा केवळ विजय नाही, तर एका नव्या पर्वाची सुरुवात आहे.

हे ही वाचा -

Mohammed Shami News : शेर अभी जिंदा है! मोहम्मद शमीला 9 विकेट्स, रणजी सामन्यात धारदार गोलंदाजी, धुरंधर कामगिरीने BCCI चं टेन्शन वाढवलं

एबीपी माझा ऑनलाईनमध्ये कॉपी एडिटर म्हणून कार्यरत. 2022 मध्ये सकाळ ऑनलाईनमधून क्रीडा पत्रकारितेची सुरुवात. 15 ऑगस्ट 2024 पासून एबीपी माझा ऑनलाईनमध्ये कार्यरत. क्रीडा क्षेत्रात आवड, गेल्या काही वर्षांत राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय स्तरावरील अनेक मोठ्या क्रीडा स्पर्धांचं कव्हरेज.
Read More

महत्त्वाच्या बातम्या

Duleep Trophy Schedule : वैभव सूर्यवंशीच्या कारकिर्दीतील आणखी एक मोठा टप्पा! कधी अन् किती वाजता उतरणार मैदानात?, सर्व माहिती एका क्लिकवर
वैभव सूर्यवंशीच्या कारकिर्दीतील आणखी एक मोठा टप्पा! कधी अन् किती वाजता उतरणार मैदानात?, सर्व माहिती एका क्लिकवर
DY Patil Passed Away : पहिली IPL फायनल, महिला विश्वविजेतेपदाला गवसणी, नवी मुंबईतील डी वाय पाटील क्रिकेट स्टेडियमच्या निर्मितीची कहाणी!
पहिली IPL फायनल, महिला विश्वविजेतेपदाला गवसणी, नवी मुंबईतील डी वाय पाटील क्रिकेट स्टेडियमच्या निर्मितीची कहाणी!
Ind vs SL Test Series : संघात जागा मिळाली, पण प्लेइंग XI मधून OUT? आकिब नबीचं नशीब पुन्हा आडवं, 3 खतरनाक गोलंदाजांमुळे गौतम गंभीरच्या प्रायोरिटी लिस्टमध्ये पण नाही
संघात जागा मिळाली, पण प्लेइंग XI मधून OUT? आकिब नबीचं नशीब पुन्हा आडवं, 3 खतरनाक गोलंदाजांमुळे गौतम गंभीरच्या प्रायोरिटी लिस्टमध्ये पण नाही
Auqib Nabi Profile : वडील डॉक्टर बनवू इच्छित होते, मित्राने बनवलं भारताचा स्टार; आकिब नबीची काळजाला भिडणारी कहाणी
वडील डॉक्टर बनवू इच्छित होते, मित्राने बनवलं भारताचा स्टार; आकिब नबीची काळजाला भिडणारी कहाणी

व्हिडीओ

Mumbai Police Salary Scam | पोलिसात ‘घुसखोरी’ पगारात चोरी | ABP Majha Special Report
Congress On Sunetra Pawar : गूंगी गुडियाचा टोला, वाद विकोपाला | Special Report ABP Majha
Ketan Agarwal Case Update : सियाचं कांड, लग्नाआधीच गुप्तहेरांना डिमांड | Special Report ABP Majha
Sanjay Raut Delhi PC : बिहारमधील निकालावरून संजय राऊतांचा भाजपवर हल्लाबोल
Prashant Kishor Bankipur Bypoll Election : बांकीपूर पोटनिवडणुकीत भाजपचा पराभव अहंकारामुळे झाला

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Sanjay Raut: अमित शाह ज्या पद्धतीने लपून बसलेत ते पाहता गुंगा गुड्डा झालेत, मोदी सुद्धा गुंगा गुड्डा झालेत; संजय राऊतांचा हल्लाबोल
अमित शाह ज्या पद्धतीने लपून बसलेत ते पाहता गुंगा गुड्डा झालेत, मोदी सुद्धा गुंगा गुड्डा झालेत; संजय राऊतांचा हल्लाबोल
Raj Thackeray on DY Patil: 'एखादं विद्यापीठ किंवा मोठी संस्था उभी राहते तेव्हा फक्त इमारती उभ्या राहत नाही, तर..' ज्ञानयात्री डी. वाय. पाटील हरपल्यानंतर राज ठाकरेंची पोस्ट
'एखादं विद्यापीठ किंवा मोठी संस्था उभी राहते तेव्हा फक्त इमारती उभ्या राहत नाही, तर..' ज्ञानयात्री डी. वाय. पाटील हरपल्यानंतर राज ठाकरेंची पोस्ट
'पारधी समाजातील महिला अस्वच्छ, अंघोळ करत नाहीत, कुटुंबात दारुचा व्यवसाय, आमच्या बँकेत त्यांची खातीच नकोत..'; काटोलमधील बँक ऑफ इंडिया शाखेतील अधिकाऱ्यांचा मस्तवालपणाचा कळस
'पारधी समाजातील महिला अस्वच्छ, अंघोळ करत नाहीत, कुटुंबात दारुचा व्यवसाय, आमच्या बँकेत त्यांची खातीच नकोत..'; काटोलमधील बँक ऑफ इंडिया शाखेतील अधिकाऱ्यांचा मस्तवालपणाचा कळस
Kolhapur News: कोल्हापुरात बंद घरामध्ये जिलेटिनचा मोठा स्फोट, भिंतींच्या अक्षरशः ठिकऱ्या उडाल्या; सुर्वे नगरमध्ये मध्यरात्री नेमकं काय घडलं?
कोल्हापुरात बंद घरामध्ये जिलेटिनचा मोठा स्फोट, भिंतींच्या अक्षरशः ठिकऱ्या उडाल्या; सुर्वे नगरमध्ये मध्यरात्री नेमकं काय घडलं?
Sunil Tatkare and Dhananjay Munde: पालकमंत्र्यांच्या पत्रकार परिषदेत आमदाराने बाजूला बसावं, पण स्वत: भाग घेणे योग्य नाही; सुनील तटकरेंनी धनंजय मुंडेंचे कान टोचले
पालकमंत्र्यांच्या पत्रकार परिषदेत आमदाराने बाजूला बसावं, पण स्वत: भाग घेणे योग्य नाही; सुनील तटकरेंनी धनंजय मुंडेंचे कान टोचले
Eknath Shinde Shivsena: एकनाथ शिंदेंची शिवसेनेच्या चार मंत्र्यांना फायनल वॉर्निंग, काम करा नाही तर.... मंत्रिमंडळाच्या बैठकीपूर्वी काय घडलं?
एकनाथ शिंदेंची शिवसेनेच्या चार मंत्र्यांना फायनल वॉर्निंग, काम करा नाही तर.... मंत्रिमंडळाच्या बैठकीपूर्वी काय घडलं?
Eknath Shinde Shivsena: 'तुम्ही काम सुधारा, नाहीतर मला खांदेपालट करावा लागेल'; एकनाथ शिंदेंनी वॉर्निंग दिलेले 'ते' चार मंत्री कोण?
'काम सुधारा, नाहीतर मला खांदेपालट करावा लागेल'; एकनाथ शिंदेंनी वॉर्निंग दिलेले 'ते' चार मंत्री कोण?
Satish Pulekar On Nana Patekar: नाना पाटेकरांचा विषय काढताच सतीश पुळेकर बोलायचेच थांबले, मनातील दुखऱ्या नसेला धक्का लागला, म्हणाले ;'एवढी चांगली मैत्री संपली...'
नाना पाटेकरांचा विषय काढताच सतीश पुळेकर बोलायचेच थांबले, मनातील दुखऱ्या नसेला धक्का लागला, म्हणाले ;'एवढी चांगली मैत्री संपली...'
Embed widget