एक्स्प्लोर

Mohammed Shami News : शेर अभी जिंदा है! मोहम्मद शमीला 9 विकेट्स, रणजी सामन्यात धारदार गोलंदाजी, धुरंधर कामगिरीने BCCI चं टेन्शन वाढवलं

Mohammed Shami 9 Wickets Ranji Trophy 2026 : भारतीय संघाचा स्टार वेगवान गोलंदाज मोहम्मद शमी सध्या निवडकर्त्यांच्या रडारबाहेर असल्याचं चित्र आहे.

Mohammed Shami 9 Wickets News : भारतीय संघाचा स्टार वेगवान गोलंदाज मोहम्मद शमी सध्या निवडकर्त्यांच्या रडारबाहेर असल्याचं चित्र आहे. बीसीसीआयच्या सेंट्रल कॉन्ट्रॅक्टमधूनही त्याचं नाव वगळण्यात आलं. मात्र, निवृत्तीच्या उंबरठ्यावर असल्याच्या चर्चांदरम्यानही शमीची धार अजिबात कमी झालेली नाही. उलट त्याने रणजी ट्रॉफीत आपल्या घातक गोलंदाजीने अक्षरशः धुमाकूळ घातला आहे. सेंट्रल कॉन्ट्रॅक्टमधून बाहेर पडल्यानंतर जम्मू-काश्मीरविरुद्ध पहिल्या डावात त्याने 8 विकेट्स घेत विक्रमी कामगिरी करत टीकाकारांना जोरदार प्रत्युत्तर दिलं.

2025 चॅम्पियन्स ट्रॉफीनंतर संघाबाहेर...

गेल्या वर्षाच्या सुरुवातीला शमी 2025 चॅम्पियन्स ट्रॉफीचा भाग होता. त्या स्पर्धेत तो चक्रवर्तीसह संयुक्तरीत्या सर्वाधिक बळी घेणारा गोलंदाज ठरला होता. मात्र, या स्पर्धेनंतर त्याला भारतीय संघातून वगळण्यात आलं. फिटनेससंदर्भातील संभ्रमामुळे त्याने संघ व्यवस्थापनावरही प्रश्नचिन्ह उपस्थित केले होते. देशांतर्गत क्रिकेटमध्ये सातत्याने दमदार कामगिरी करूनही गेल्या वर्षभरात त्याला टीम इंडियात पुनरागमनाची संधी मिळाली नाही. एवढंच नव्हे, तर सेंट्रल कॉन्ट्रॅक्टमधूनही त्याला बाहेरचा रस्ता दाखवण्यात आला.

रणजी उपांत्य फेरीत शमीचा कहर 

रणजी ट्रॉफीच्या उपांत्य फेरीत बंगाल आणि जम्मू-काश्मीर यांच्यात सामना रंगला आहे. या सामन्यात शमीचा भेदक अवतार पाहायला मिळाला. पहिल्याच डावात त्याने तब्बल 8 विकेट्स घेत प्रतिस्पर्धी संघाची कंबर मोडली. पारस ढोगरा आणि अब्दुल समद यांनी अर्धशतकं झळकावत जम्मू-काश्मीरचा डाव 302 धावांपर्यंत नेला, मात्र शमीच्या 8 आणि मुकेश कुमारच्या 2 बळींमुळे संपूर्ण संघ 302 धावांवर गारद झाला.

फलंदाजीनेही लक्ष वेधून घेतले....

शमी केवळ गोलंदाजीनेच नाही, तर फलंदाजीनेही लक्ष वेधून घेत आहे. अलीकडेच त्याने तुफानी अर्धशतक झळकावत सर्वांना आश्चर्यचकित केलं होतं. जम्मू-काश्मीरविरुद्ध बंगालची सुरुवात काहीशी खराब झाली. त्यामुळे शमीला पुन्हा फलंदाजीची संधी मिळाल्यास तो काय कमाल करतो, याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे. या सामन्यात त्याने एकूण 9 विकेट्स घेतले. दुसऱ्या डावात त्याने फक्त 1 विकेट घेतला.

जम्मू आणि काश्मीर क्रिकेट संघाने इतिहास रचला

जम्मू आणि काश्मीर क्रिकेट संघाने इतिहास रचला आहे. 2025-26 रणजी ट्रॉफीच्या दुसऱ्या उपांत्य सामन्यात त्यांनी बंगालवर 6 विकेट्सने दणदणीत विजय मिळवला. यासह, संघाने स्पर्धेच्या इतिहासात प्रथमच अंतिम फेरीत स्थान निश्चित केले. जम्मू आणि काश्मीरसमोर 126 धावांचे लक्ष्य होते, जे त्यांनी फक्त 4 विकेट्स गमावून साध्य केले.

हे ही वाचा -

IND vs NED Playing 11 : जसप्रीत बुमराहसह 3 स्टार खेळाडू OUT, नेदरलँड्सविरुद्ध अशी असेल टीम इंडियाची प्लेइंग-11

एबीपी माझा ऑनलाईनमध्ये कॉपी एडिटर म्हणून कार्यरत. 2022 मध्ये सकाळ ऑनलाईनमधून क्रीडा पत्रकारितेची सुरुवात. 15 ऑगस्ट 2024 पासून एबीपी माझा ऑनलाईनमध्ये कार्यरत. क्रीडा क्षेत्रात आवड, गेल्या काही वर्षांत राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय स्तरावरील अनेक मोठ्या क्रीडा स्पर्धांचं कव्हरेज.
Read
आणखी वाचा
Sponsored Links by Taboola
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Ind vs Nz Final Update : बुमराहचा धमाका, ॲलननंतर रचिन OUT..., न्यूझीलंडसमोर 256 धावांचे लक्ष्य; टीम इंडिया होणार चॅम्पियन?
बुमराहचा धमाका, ॲलननंतर रचिन OUT..., न्यूझीलंडसमोर 256 धावांचे लक्ष्य; टीम इंडिया होणार चॅम्पियन?
IND vs NZ : जेम्सची ओव्हर हॅट्र्टीक, 16 व्या षटकात भारताच्या तीन विकेट; टीम इंडियाच्या धावांच्या गतीला ब्रेक
जेम्सची ओव्हर हॅट्र्टीक, 16 व्या षटकात भारताच्या तीन विकेट; टीम इंडियाच्या धावांच्या गतीला ब्रेक
Ind vs Nz Final : 18 षटकार, 18 चौकार अन् 255 धावा! सॅमसन-अभिषेक-ईशानच्या वादळात भारताने फायनलमध्ये इतिहास रचला; न्यूझीलंडसमोर मोठं आव्हान
18 षटकार, 18 चौकार अन् 255 धावा! सॅमसन-अभिषेक-ईशानच्या वादळात भारताने फायनलमध्ये इतिहास रचला; न्यूझीलंडसमोर मोठं आव्हान
अभिषेक शर्माची वादळी खेळी, संघानं दाखवलेला विश्वास सार्थ ठरवला, मास्टर ब्लास्टरकडून कौतुकाची थाप
अभिषेक शर्माची वादळी खेळी, संघानं दाखवलेला विश्वास सार्थ ठरवला, मास्टर ब्लास्टरकडून कौतुकाची थाप
Advertisement
Advertisement
Advertisement

व्हिडीओ

Satara Bavdhan Bagad Yatra : साताऱ्यातील बावधनमधील बगाड यात्रा सातासुमद्रापार  Special Report
Mumbai Metro Womens Day : महिला दिनानिमित्त, CSMT मेट्रो स्थानकाची जबाबदारी महिलांकडे
Womens Day Special Talk With Mayor : महिला दिन विशेष 'माझा'च्या मंचावर महिला महापौरांची 'महा'पॉवर
Bhiklya Ladkya Dhinda : तारपा वाजवणारा पद्मश्री आयुष्याचे धडे देणारा तत्त्वज्ञानी Majha Katta वर
AI Film on Shivaji Maharaj : संभाजीनगरच्या गृहिणीची कमाल, AI ने थेट शिवरायांवर सिनेमा बनवला!

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
IND vs NZ : जेम्सची ओव्हर हॅट्र्टीक, 16 व्या षटकात भारताच्या तीन विकेट; टीम इंडियाच्या धावांच्या गतीला ब्रेक
जेम्सची ओव्हर हॅट्र्टीक, 16 व्या षटकात भारताच्या तीन विकेट; टीम इंडियाच्या धावांच्या गतीला ब्रेक
Ind vs NZ: संजू सॅमसनचा वादळी तडाखा; मैदानावार 6,6,6 षटकारांचा पाऊस, शतक हुकलं पण न्यूझीलंडला धुव्वादार ठोकलं
संजू सॅमसनचा वादळी तडाखा; मैदानावार 6,6,6 षटकारांचा पाऊस, शतक हुकलं पण न्यूझीलंडला धुव्वादार ठोकलं
उदय शेट्टी, मजनुभाईचा 'वेलकम 4' येतोय; सुनिल शेट्टीनेच सांगितली स्टारकास्ट, कॉमेडीचा तडका कधी रिलीज होणार?
उदय शेट्टी, मजनुभाईचा 'वेलकम 4' येतोय; सुनिल शेट्टीनेच सांगितली स्टारकास्ट, कॉमेडीचा तडका कधी रिलीज होणार?
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 08 मार्च 2026 | रविवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 08 मार्च 2026 | रविवार
पुणेकरांसाठी डबल डेकर पुल सुरू, वाहतूक कोडींपासून सुटका; ब्रिजला अजित दादांचे नाव? पाहा फोटो
पुणेकरांसाठी डबल डेकर पुल सुरू, वाहतूक कोडींपासून सुटका; ब्रिजला अजित दादांचे नाव? पाहा फोटो
Abhishek Manu Singhvi: कोणतंही कर्ज नाही, फक्त पाच वर्षात 1 हजार 516 कोटींची वाढ; वरिष्ठ वकिल अभिषेक मनु सिंघवी यांची संपत्ती किती हजार कोटींच्या घरात?
कोणतंही कर्ज नाही, फक्त पाच वर्षात 1 हजार 516 कोटींची वाढ; वरिष्ठ वकिल अभिषेक मनु सिंघवी यांची संपत्ती किती हजार कोटींच्या घरात?
CM नितीश कुमार राज्यसभेवर जाणार, लेक निशांतने स्वीकारलं जदयुचं सदस्य; राजकीय प्रवेश होताच म्हणाला...
CM नितीश कुमार राज्यसभेवर जाणार, लेक निशांतने स्वीकारलं जदयुचं सदस्य; राजकीय प्रवेश होताच म्हणाला...
India vs New Zealand, Final T20 World Cup: 'अभिषेक शर्मा आणि वरुण चक्रवर्तीला बाहेर ठेवा' वर्ल्डकप फायनलला काही तास बाकी असतानाच गंभीर गुरुजी अन् कॅप्टन सूर्याला थेट सल्ला!
'अभिषेक शर्मा आणि वरुण चक्रवर्तीला बाहेर ठेवा' वर्ल्डकप फायनलला काही तास बाकी असतानाच गंभीर गुरुजी अन् कॅप्टन सूर्याला थेट सल्ला!
Embed widget