Rishabh Pant : ऋषभ पंत कसोटी मालिकेतून बाहेर, BCCIचा 'प्लॅन बी' रेडी, धडाकेबाज विकेटकीपरला इंग्लंडला बोलवणार!
England vs India 4th Test Update : इंग्लंडविरुद्ध सुरू असलेल्या पाच कसोटी सामन्यांच्या मालिकेदरम्यान टीम इंडियाला मोठा धक्का बसला.

Ishan Kishan likely to replace Rishabh Pant : इंग्लंडविरुद्ध सुरू असलेल्या पाच कसोटी सामन्यांच्या मालिकेदरम्यान टीम इंडियाला मोठा धक्का बसला. मँचेस्टर कसोटीत यष्टिरक्षक फलंदाज ऋषभ पंतच्या उजव्या पायाला दुखापत झाली असून, स्कॅनमध्ये फ्रॅक्चर असल्याचे निष्पन्न झाले. त्यामुळे पंत फक्त सध्या सुरू असलेली कसोटीच नाही, तर 31 जुलैपासून लंडनच्या ओव्हलवर होणाऱ्या अखेरच्या कसोटीतूनही बाहेर गेला.
ऋषभ पंतच्या दुखापतीमुळे ईशान किशन संघात परतणार?
मीडिया रिपोर्ट्सनुसार, पंतच्या अनुपस्थितीत ईशान किशन टीम इंडियात परत येण्याची शक्यता आहे. मुख्य निवडकर्ते अजित आगरकर यांनी ऋषभ पंतच्या दुखापतीमुळे ईशान किशनशी संपर्क साधल्याचे समजते.
Fingers crossed for our X-factor 🤞
— Sony Sports Network (@SonySportsNetwk) July 23, 2025
Speedy recovery, Rishabh!#SonySportsNetwork #GroundTumharaJeetHamari #ENGvIND #NayaIndia #DhaakadIndia #TeamIndia #ExtraaaInnings pic.twitter.com/ZHfyMvMfNx
ईशानने अखेरचा आंतरराष्ट्रीय सामना नोव्हेंबर 2023 मध्ये ऑस्ट्रेलियाविरुद्ध टी-20 स्वरूपात खेळला होता, तर दोन कसोट्या त्याच वर्षी वेस्ट इंडिजविरुद्ध खेळल्या होत्या. मँचेस्टर कसोटीत ध्रुव जुरेल यष्टीमागे भूमिका बजावत असून, ओव्हल कसोटीतही त्याच्यावरच विश्वास ठेवला जाण्याची शक्यता आहे. ईशान किशन ‘बॅकअप विकेटकीपर’ म्हणून संघात असेल.
कॉन्ट्रॅक्टमधून वगळले, पुन्हा मिळवले स्थान
2024 हे वर्ष ईशानसाठी चढ-उतारांनी भरलेलं होतं. त्याने घरगुती क्रिकेटमध्ये खेळण्याची सक्ती पाळली नव्हती, यामुळे बीसीसीआयने त्याला केंद्रीय करारातून वगळलं होतं. मात्र, झारखंडकडून चांगली कामगिरी करत त्याने पुनरागमन केलं आणि एप्रिल 2025 मध्ये पुन्हा कॉन्ट्रॅक्ट मिळालं.
🚨 PANT OUT FOR 6 WEEKS. 🚨
— Mufaddal Vohra (@mufaddal_vohra) July 24, 2025
- Rishabh Pant advised a 6 week rest for a fractured toe. (Express Sports). pic.twitter.com/d3oavEU1C1
सध्या इंग्लंडमध्ये काऊंटी क्रिकेटमध्ये चमक
ईशान किशन सध्या इंग्लंडमध्येच काऊंटी क्रिकेट खेळत असून, नॉर्थेम्पटनशायर काउंटी क्रिकेट क्लबकडून त्याने अलीकडे 87 आणि 77 धावांची झुंजार खेळी केली. ही फॉर्म त्याला कसोटी संघात संधी मिळवून देण्यासाठी उपयुक्त ठरली आहे.
आयपीएल 2025 मध्येही धमाका
आयपीएल 2025 हंगामात ईशानने सनरायझर्स हैदराबादकडून खेळताना पहिल्याच सामन्यात राजस्थान रॉयल्सविरुद्ध केवळ 45 चेंडूंमध्ये शतक ठोकलं होते. ह्या हंगामात त्याने एकूण 354 धावा केल्या. त्याआधी डिसेंबर 2022 मध्ये बांगलादेशविरुद्ध 126 चेंडूंमध्ये दोनशे धावा करत त्याने वनडे क्रिकेटमधील सर्वात वेगवान डबल सेंच्युरीचा विक्रम केला होता.
कसोटी संधी मिळेल का?
ईशान किशनने आतापर्यंत केवळ दोन कसोट्या खेळल्या असल्या, तरी मर्यादित षटकांच्या क्रिकेटमधील त्याचा अनुभव आणि सध्याची फॉर्म लक्षात घेता तो भारतासाठी महत्त्वाचा पर्याय ठरू शकतो. आता सर्वांच्या नजरा ओव्हल कसोटीकडे लागल्या आहेत, ईशानला संधी मिळते का, की ते फक्त बॅकअपच खेळाडू असणार?





















