IND vs IRE Live : भारत आणि आयर्लंड  (India vs Ireland) यांच्यातील पहिल्या सामन्याला पावसाच्या व्यत्ययामुळे उशीरा सुरुवात झाली. 11 वाजून 20 मिनिटांनी सामना सुरु झाला असून प्रथम फलंदाजी करणाऱ्या आयर्लंडने 108 धावा करत भारतासमोर 109 धावांचे लक्ष्य ठेवले आहे. जे 12 षटकांमध्ये भारताला पूर्ण करायचे आहे.

  



आजचा सामना सुरु होण्याच्या आधीपासून आयर्लंडमध्ये पाऊस होताच पण सामन्याला सुरुवात होण्यापूर्वी पावसाने विश्रांती घेतल्याने नाणेफेक पार पडली. भारताने नाणेफेक जिंकत प्रथम गोलंदाजी घेतली. पण त्यानंतर लगेचच पावसाला सुरुवात झाली. ज्यामुळे सामना सुरु होण्यास बराच वेळ गेला. आता सामना 11 वाजून 20 मिनिटांनी सुरु झाला. भारताच्या भुवनेश्वरने पहिल्याच षटकात आयर्लंडच्या सलामीवीर कर्णधार अँन्ड्रूला तंबूत धाडलं. त्यानंतर एका मागोमाग एक गडी भारतीय फलंदाज बाद करतच होते. पण हॅरी टेक्टरने एकहाती झुंज देत अर्धशतक लगावलं. ज्यामुळे भारतासमोर आला 109 धावांचे आव्हान आहे.


हॅरीचं दमदार अर्धशतक


आयर्लंडचे एकामागोमाग एक गडी बाद होत असताना हॅरी टेक्टरने टिकून तुफान फटकेबाजी केली.  29 चेंडूत अर्धशतक पूर्ण करणाऱ्या हॅरीने सामन्यात 33 चेंडूत 6 चौकार आणि 3 षटकार ठोकत नाबाद 64 धावा केल्या, ज्याच्या जोरावर आयर्लंडने 108 धावा स्कोरबोर्डवर लावल्या. भारताकडून हार्दिक पांड्या, भुवनेश्वर कुमार, चहल आणि आवेश खान यांनी प्रत्येकी एक विकेट घेतली. पदार्पण करणाऱ्या उमरानला मात्र एका षटकात 14 धावा खाव्या लागल्या.


अशी आहे दोन्ही संघाची अंतिम 11


भारत - ईशान किशन, ऋतुराज गायकवाड, सूर्यकुमार यादव, दीपक हुडा, हार्दिक पांड्या (कर्णधार), दिनेश कार्तिक (विकेटकिपर), अक्षर पटेल, भुवनेश्वर कुमार, युजवेंद्र चहल,आवेश खान, उमरान मलिक.


आयर्लंड - पॉल स्टर्लिंग, अँड्र्यू बालबर्नी (कर्णधार), मार्क अडायर, हॅरी टेक्टर, गॅरेथ डेलानी, जॉर्ज डॉकरेल, क्रेग यंग, कॉनर ऑफ्लर्ट, अँडी मॅकब्रायन, जोशुवा लिटिल, कोनोर ऑल्फर्ट 


भारत विरुद्ध आयर्लंड Head to Head


भारत आणि आयर्लंड यांच्यात आतापर्यंत 3 टी-20 सामने खेळवले गेले आहे. या सर्व सामन्यात अपेक्षेप्रमाणे भारताचचं पारडं जड दिसून आलं आहे. कारण तीन पैकी तिनही सामन्यात भारतानं बाजी मारली आहे. तर, आयर्लंड संघाला एकही सामना जिंकता आलेला नाही. त्यामुळे आता या दोन सामन्यांपैकी आजचा सामना जिंकून भारत आपला विजयी रथ कायम ठेवायचा प्रयत्न करेल. तर आयर्लंड सामन्यात विजय मिळवून भारताविरुद्ध पहिला-वहिला विजय मिळवू इच्छित असेल.



हे देखील वाचा-