Ind vs Ireland: दक्षिण आफ्रिकेविरुद्ध टी-20 मालिका खेळल्यानंतर भारतीय संघ आयर्लंड दौरा करणार आहे. या दौऱ्यात भारतीय संघ आयर्लंडशी दोन सामन्यांची टी-20 मालिका खेळणार आहे. या मालिकेसाठी बीसीसीआयनं बुधवारी भारतीय संघाची घोषणा केली आहे. आयपीएलमध्ये सनरायजर्स हैदरबादकडून चारशेहून अधिक धावा काढणारा त्रिपाठी हा एकमेव नवा चेहरा या संघात आहे.  याचप्रमाणे राजस्थान रॉयल्सला अंतिम फेरीपर्यंत नेणारा कर्णधार सॅमसनलाही कारकीर्द सावरण्याची आणखी एक संधी मिळालीय. भुवनेश्वर कुमार हा संघाचा उपकर्णधार आहे. या दौऱ्यात भारतीय संघात स्थान मिळालेल्या राहुल त्रिपाठीनं आपली प्रतिक्रिया दिलीय.


आयपीएलच्या पंधराव्या हंगामात राहुल त्रिपाठीनं धमाकेदार फलंदाजी केली. त्यानं 158.24 च्या स्फोटक स्ट्राइक रेटनं आणि 37.55 च्या फलंदाजीच्या सरासरीनं 413 धावा केल्या. मात्र, तरीही त्याला दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या टी-20 मालिकेत संधी मिळाली नाही. यावर माजी क्रिकेटपटूंपासून क्रिकेट चाहत्यांनी अनेक प्रश्न उपस्थित केले. मात्र, आता त्याची आयर्लंड दौऱ्यासाठी निवड झाल्यानं या प्रश्नांना पूर्णविराम लागलाय.


राहुल त्रिपाठी काय म्हणाला?
राहुल त्रिपाठी म्हणाला की 'ही खूप मोठी संधी आहे. हे स्वप्न सत्यात उतरल्यासारखे आहे. मी खूप आनंदी आहे की निवडकर्त्यांनी आणि सर्वांनी माझ्यावर विश्वास ठेवला. मी आजवर केलेल्या मेहनतीचे हे फळ आहे. मला आशा आहे की मला खेळण्याची संधी मिळाली तर मी माझे सर्वोत्तम देण्याचा प्रयत्न करेन.


राहुल त्रिपाठीची कारकिर्द
राहुल त्रिपाठीनं 2017 पासून आयपीएल खेळत आहे. तो आयपीएलमध्ये सर्वाधिक धावा करणारा अनकॅप्ड खेळाडू आहे. त्यानं आतापर्यंत 76 सामन्यांमध्ये 28.09 च्या फलंदाजीची सरासरी आणि 140.80 च्या स्ट्राइक रेटनं त्यानं 1 हजार 798 धावा केल्या आहेत. राहुलनं प्रथम श्रेणी क्रिकेटमध्येही 2 हजार 540 धावा केल्या आहेत. ज्यात सात शतक आणि 13 अर्धशतकांचा समावेश आहे. त्याचबरोबर लिस्ट-ए सामन्यांमध्ये त्याच्या नावावर 1 हजार 209 धावा आहेत. प्रथम श्रेणी आणि लिस्ट ए सामन्यांमध्ये त्याची फलंदाजीची सरासरी 30 पेक्षा जास्त आहे. तो महाराष्ट्राकडून देशांतर्गत स्पर्धांमध्ये खेळतो.


आयर्लंड दौऱ्यात भारतीय संघ-
हार्दिक पांड्या (कर्णधार), भुवनेश्वर कुमार (उपकर्णधार), इशान किशन, ऋतुराज गायकवाड, संजू सॅमसन, सूर्यकुमार यादव, वेंकटेश अय्यर, दीपक हुडा, राहुल त्रिपाठी, दिनेश कार्तिक (यष्टीरक्षक), यजुर्वेद्र चहल, अक्षर पटेल, रवी बिश्नोई, हर्षल पटेल, आवेश खान, अर्शदीप सिंग, उमरान मलिक.


हे देखील वाचा-