India tour of Ireland: डबलिनच्या (Dublin) द व्हिलेज स्टेडियमवर (The Village) रविवारी भारत आणि आयर्लंड यांच्यात पहिला टी-20 सामना खेळवण्यात आला. पावसानं व्यत्यय आणलेल्या या सामन्यात भारतानं सात विकेट्स राखून आयर्लंडचा पराभव केला. या सामन्यातील पॉवर प्लेमध्ये विकेट घेऊन भुवनेश्वर कुमारनं (Bhuvneshwar Kumar) नव्या विक्रमाला गवसणी घातलीय. टी-20 क्रिकेटच्या पॉवर प्लेमध्ये सर्वाधिक विकेट्स घेणारा भुवनेश्वर कुमार पहिला भारतीय ठरलाय. 

टी-20 मध्ये पॉवर प्लेमध्ये सर्वाधिक विकेट्स घेणाऱ्या गोलंदाजांच्या यादीत भुवनेश्वर कुमार सॅम्युअल बद्री आणि किवी वेगवान गोलंदाज टीम साऊथी 33 विकेट्ससह संयुक्तरित्या पहिल्या स्थानावर होता. मात्र, आयर्लंडविरुद्ध पहिल्या टी-20 सामन्यात भुवनेश्वर कुमारनं एक विकेट घेऊन सॅम्युअल बद्री आणि टीम साऊथीला मागं टाकलंय. 

टी-20 क्रिकेटच्या पावर प्लेमध्ये सर्वाधिक विकेट्स घेणारे गोलंदाज-

क्रमांक गोलंदाज विकेट्स
1 भुवनेश्वर कुमार   34
2 सॅम्युअल बद्री 33
3 टीम साऊथी 33
4 शकिब अल हसन 27
5 जोश हेझलवूड 30

आयर्लंडविरुद्ध भुवनेश्वर कुमारची गोलंदाजीया सामन्यात भुवनेश्वर कुमारनं शानदार गोलंदाजी करत पहिल्याच षटकात भारताला यश मिळवून दिलं. या सामन्यात भुवनेश्वरनं 3 षटकात 16 धावा दिल्या आणि एक विकेट घेतली. सुरुवातीला भुवनेश्वरच्या गोलंदाजीसमोर खेळणे आयर्लंडसाठी कठीण जात होतं. 

भारताचा आयर्लंडवर सात विकेट्सनं विजयदोन सामन्यांच्या टी-20 मालिकेतील पहिल्या सामन्यात सात विकेट्सनं विजय मिळवून भारतानं 1-0 आघाडी घेतली आहे. या मालिकेतील दुसरा सामना उद्या म्हणजेच 28 जून रोजी खेळला जाणार आहे. या सामन्यात विजय मिळवून मालिका जिंकण्याच्या उद्देशानं भारतीय संघ मैदानात उतरणार आहे. तर, या सामन्यात भारताला पराभूत करून मालिका बरोबरीत आणण्याचा आयर्लंडचा प्रयत्न असेल. 

हे देखील वाचा-