BCCI Meet IPL Owners: आयपीएल (IPL) संघ मालकांसोबत बीसीसीय अधिकाऱ्यांची बैठक हा चर्चेचा विषय राहिला. 31 जुलै रोजी मुंबईतील बीसीसीआयच्या मुख्यलयात ही बैठक झाली. या बैठकीत कोलकाता नाइट रायडर्स (KKR) संघाचे मालक शाहरुख खान (Shahrukh Khan) आणि पंजाब किंग्सचे (Punjab Kings) मालक नेस वाडिया (Ness Wadia) यांच्यात जोरदार वाद झाल्याची माहिती समोर येत आहे.


नेमकं काय घडलं?


क्रिकबझने एक अहवालानूसार, शाहरुख खानसह काही लोक मेगा लिलाव आयोजित न करण्याच्या बाजूने आहेत. बीसीसीआयच्या एका सूत्राने सांगितले की, खानचे पंजाब किंग्जचे सहमालक नेस वाडिया यांच्याशी एकदा जोरदार वाद झाला. किती खेळाडू कायम ठेवायचे हे त्यांच्या वादाचे कारण होते. एकीकडे शाहरुख खान अधिक खेळाडूंना कायम ठेवण्याच्या बाजूने असल्याचे दिसून आले. परंतु नेस वाडिया यांना संघांना अधिक खेळाडू ठेवण्याच्या बाजून नव्हते. 






बैठकीत कोण-कोण?


मेगा लिलाव करायचा की नाही यावर एकमत होऊन किती खेळाडूंना कायम ठेवायचे हे ठरवले जाईल. बीसीसीआयने मेगा लिलाव न करण्याचा निर्णय घेतल्यास कदाचित कायम ठेवण्याची गरज भासणार नाही. या बैठकीत दिल्ली कॅपिटल्सचे किरण कुमार आणि पार्थ जिंदाल, लखनऊ सुपर जायंट्सचे संजीव गोयंका, चेन्नई सुपर किंग्जचे रूपा गुरुनाथ, रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूचे प्रथमेश मिश्रा आणि राजस्थान रॉयल्सचे मनोज बडाले हे देखील उपस्थित होते. या व्यतिरिक्त, अनेक संघ मालक व्हिडीओ कॉन्फरन्सद्वारे बैठकीला उपस्थित होते, त्यापैकी मुंबई इंडियन्स देखील एक होता. बैठकीनंतर दिल्ली कॅपिटल्सचे मालक पार्थ जिंदाल यांनी सांगितले की ते मेगा लिलावाच्या समर्थनात आहेत. सध्याच्या परिस्थितीनुसार, आयपीएल 2025 मेगा लिलावात संघांना केवळ 3-4 खेळाडूंनाच ठेवण्याची परवानगी असेल.


आयपीएल 2025 मेगा लिलाव होणार की नाही?


बीसीसीआय आणि संघ मालकांमधील बैठकीचा सर्वात महत्त्वाचा मुद्दा म्हणजे आयपीएल 2025 मेगा लिलाव. कोलकाता नाइट रायडर्सचा मालक शाहरुख खान आणि सनरायझर्स हैदराबादची सह-मालक काव्या मारन यांनी थेट मेगा लिलावाला विरोध केला आहे. केकेआर आणि हैदराबाद हे IPL 2024 चे अनुक्रमे विजेते आणि उपविजेते संघ होते, परंतु आतापर्यंत बीसीसीआयने या संघांच्या मतांवर कोणताही औपचारिक निर्णय दिलेला नाही.


संबंधित बातमी:


गौतम गंभीर-सूर्यकुमार यादवचे 4 चक्रवणारे निर्णय; श्रीलंकेच्या थिंक टँकने विचारही केला नव्हता!